संविधानाचे रक्षण म्हणजेच देशाचे संरक्षण
अशोक तुळशीराम भवरे
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संविधान जागरण उपक्रम अंतर्गत दिनांक २८ ऑक्टोबर पासून दर सोमवारी रात्री सात वाजता नंदीग्राम बुद्ध विहार संभाजी चौक सिडको येथे संविधानाची क्रमवार माहिती संविधान प्रचारक अशोक तुळशीराम भवरे करुन देत आहेत.
दिनांक ४ नोव्हेंबर रोजी संविधान निर्माण प्रक्रिया तसेच संविधान सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेश या विषयावर सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमात ८ विद्यार्थी, विद्यार्थिनी,५ युवक,१७ उपासक उपासिका उपस्थित होते, हळूहळू उपस्थिती संख्या वाढत आहे. विहार कार्यकारणी तसेच सुप्रिया महिला मंडळ यांनी लाऊड स्पीकर ची व्यवस्था केली त्यामुळे गल्लीतील सर्व लोकांना घरबसल्या ऐकता येत होते. उपस्थिती वाढल्या नंतर हा कार्यक्रम विहाराच्या प्रांगणात घेण्यात येणार आहे.
भारतीय संविधानाचे माहिती साध्या सरळ सोप्या भाषेत संविधान प्रचारक अशोक तुळशीराम भवरे हे सांगत असल्याने श्रोत्यांत समाधान आहे.
संविधान हे सर्व भारतीयांचे आहे त्यामुळे सर्व जाती धर्मातील लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नंदीग्राम बुद्ध विहार, संभाजी चौक सिडको नांदेड तसेच सुप्रिया महिला मंडळ करीत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत