मागास वर्गीय समाजा साठी”शिव रत्न ” चां संदेश ,,,,,,,,!
••••••••••••••••••••••••••••••••••••
ऍड अविनाश टी काले अकलूज
9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••
काल दिनांक 4/11/2024रोजी अकलूज येथील “शिव रत्न” बंगला येथे उत्तम राव जानकर यांच्या प्रचाराचा नारळ फोडला गेला •
” मोहिते पाटील ” घराण्याचा राजकीय निर्णय घेणारे श्री जयसिंह उर्फ बाळ दादा यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले की ,
जो पर्यंत आरक्षण राहणार आहे , त्यांचे उमेदवार उत्तम राव जानकर हे असणार आहेत •
कालच श्री मनोज दादा जरांगे पाटील यांची भूमिका जाहीर झाली , त्या नुसार त्यांनी सर्व मराठा उमेदवार निवडणूक रिंगणातून माघारी घेतले ,
त्यांनी तसे घ्यावे या साठी कायदे तज्ञ
असीम सरोदे यांनी त्यांचे शी दीर्घ कालीन चर्चा केली ,
आणि कथित लोकशाही वाचवायची असेल तर महा विकास आघाडी जिंकून येणे आवश्यक आहे या निर्णयापर्यंत ते आले •
मागास वर्गीय समाजाचे हक्क व अधिकार यांचे रक्षण करण्यासाठी म्हणून एक कृती समिती माळशिरस तालुक्यात निर्माण केली गेली •
या कृती समिती द्वारे खरोखर या हक्क व अधिकार यावर लक्ष केंद्रित करून व्यक्तिगत मोठे पण , आणि व्यक्तिगत महत्वकांक्षा बाजूला ठेऊन स्वतः ला समाज धुरीण समजणारे लोक एक पाऊल मागे ठेउन निर्णय घेतील असे वाटले होते ,
पण समोरचे आव्हान ज्ञात नसलेले आणि व्यक्तिगत मोठेपणा चे भ्रमातून बाहेर न पडलेले लोकच बहु संख्येने निघाले , आत्ता ते त्यांची फुटकळ लढाई जोर शोर से लढत राहतील •
या साऱ्या गदारोळात चळवळीचे एक नेते मला भेटले , त्यांची माझी चर्चा चालू असताना त्यांनी माझे अतिरिक्त संभाषण तोडून टाकत मला एकच प्रश्न विचारला ?
प्रस्थापित राजकीय पक्षांनी तुम्हाला का उमेदवारी द्यावी?
संसदीय राजकारणात जनशक्ती चां गठ्ठा महत्वाचा असतो,,,,
मी माझे अर्धवट ज्ञान पाजळले आणि ” नवबौध्द ” समाज हा “हिंदुत्व वादी ” नसल्याने आणि त्यांचे स्वंतत्र राजकीय पक्ष असल्याने ते त्यांना उमेदवारी देत नाहीत ,,,,
त्या नेत्याने मला पुढचा प्रश्न विचारला , ही नवबौध्द समाजाची कमतरता आहे असे धरू ,,,,
“मातंग” समाजाचे काय?
ते तर हिंदू आहेत ना?
माळशिरस तालुक्यात तुम्हा मागास वर्गीय सर्व मोठ्या छोट्या जात समूहाला एकत्रित येता येत नसेल ,,,,
स्वतः ची शक्ती दर्शवता येत नसेल ,,,,
समाज धुरिणांना व्यक्तिगत उमेदवारी लढविण्यात स्वारस्य असेल ,,
आणि जात उतरंडीत प्रत्येक जातीला त्यांचा नेता आमदार म्हणून हवा असेल ,,,
व त्या वरच तुमचा फोकस असेल , हक्क आणि अधिकार याचे रक्षण करण्यावर तो नसेल तर ,,,
तुम्ही किती मोठे आंबेडकर वादी बोलता ,, या ही पेक्षा तुम्ही व्यक्तिगत महत्वकांक्षा ने पछाडलेले लोक आहात ,
म्हणून तुम्ही विकेंद्रित आहात ,
तुमच्या कुजलेल्या चिंध्या गोळा करून त्याची “वाकळ” शिवत बसण्याचा” नादांनपणा ” मोहिते पाटील यांनी तरी का करावा?
या संपूर्ण मतदार संघात धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे , व समाज म्हणून ते एक गठ्ठा आहेत त्यांचे शी समेट करण्याचा राजकीय शहाणपणाचा मार्ग ते शोधतील •
तुमच्या हक्काचे संरक्षण करण्याचे उत्तरदायित्व त्यांच्या वर नाही •
मी खरोखर निरुत्तर झालो ,
व्यवस्थेतील दलाल , राजकीय शहाणपणा चां अभाव , आणि “मीच सर्व श्रेष्ठ ” या भावनेचा प्रत्येक फुटकळ उमेदवारांत झालेला अतिरेकी शिरकाव याने हे सातत्याने पराभूत च राहणार ,,,, !
मागासवर्गीयांनो तुम्ही तुमचे निष्प्रभ झालेले राजकीय हक्क आणि अधिकार याचे तुटलेले तुणतुणे खुशाल वाजवत रहा ,, त्याला तिलांजली मिळालेली आहे ,
भविष्यातील तुमच्या मुलांचे शैक्षणिक आणि नोकर भरती चे स्वप्न ही आत्ता विसरा ,,,
तुमच्या जागेवर जानकर , सुळ , देशमुख अशी मंडळी असतील , त्यांच्या यशात आपले यश मानुया ,,,
जात घुसखोरीचे शेकडो दाखले तयार झाले आहेत,ते हजारो दाखले आत्ता निर्माण झाले तरी त्याची पर्वा करायची नाही ,
उत्तमराव जानकर यांची पालखी खाली उतरवू देऊ नका ,,
आरक्षण संपल्यावर मोहिते पाटील यांची पालखी खांद्यावर घेऊ ,,,
हाच आपल्या जगण्याचा प्रशस्त मार्ग आहे ,,
डॉ बाबासाहेब आंबेडकर , क्रांतिकारी लेखक , लोकशाहीर अण्णा भाऊ साठे , विर लहुजी वस्ताद , उमाजी नाईक , छत्रपती शाहू महाराज , महात्मा फुले सारे सारे धन्य झाले असतील ,
आमची संतान खूप वैचारिक , सामर्थ्यशाली , हक्का प्रति जागरूक झाली याचा त्यांना मनस्वी आनंद झालेला असेल ,,
सर्व अपक्ष आणि फुटकळ पक्षाच्या उमेदवारावर ते अवकाशातून पुष्प वृष्टी करत आहेत असे चित्र माझ्या मन चक्षु समोर उभे राहिले ,,, !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत