कोणतेही पक्ष संघटना संपविण्यासाठी निष्क्रिय, अज्ञानी आणि बेईमान अनुयायी कार्यकर्ते जबाबदार असतात.
कोणतेही संस्था, पक्ष, संघटना संपविण्यासाठी त्याच संघटनेचे निष्क्रिय, अज्ञानी आणि बेईमान अनुयायी कार्यकर्ते जबाबदार असतात. त्यामुळे निष्क्रिय, अज्ञानी आणि बेईमान या तीन प्रकारच्या अनुयायी कार्यकर्त्यांना गृहित धरल्याशिवाय संस्था, पक्ष आणि संघटना यांचे संरक्षण आणि संवर्धन करता येणार नाही. संस्था, पक्ष आणि संघटना यांचे संरक्षण करायचे असेल यांची पुनर्बाधणी करायची असेल तर निष्क्रिय आहेत त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देऊन नवी उभारी देत सक्रिय करावे लागणार आहे. जे अज्ञानी आहेत त्यांना ऐतिहासिक वारसा, दाखले, पुरावे देऊन त्यांच्या हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ज्याचे रक्त सांडले, ज्यानी अविरतपणे संघर्षरत राहून आपणाला घडविण्याचे महान कार्य करून माणूस बनविण्याचे काम केले त्याबद्दल अज्ञानी मनमेंदूला चेतवावे लागणार आहे. तसेच स्वार्थी, आपमतलबी, बेईमान हे अस्तिनीतील साप असून त्यांच्यापासून सावधगिरी बाळगून सुनियोजित पद्धतीने सर्वेक्षण आणि रचनात्मक विधायक कार्य करीत राहावे लागणार आहे.
आमचे सांगनेच मुळात बाबासाहेबांच्या विचारांच्या रिपब्लिकन पक्षाच्या स्वाभिमानी आणि निष्ठावान पण निष्क्रिय आणि अज्ञानी अनुयायी कार्यकर्त्यांसाठी आहे. बाबासाहेबांना अर्थात बाबासाहेबांच्या पक्ष संघटना सोडून गेलेल्यासाठी नाही. जे बाबासाहेबांच्या पक्ष संघटना सोडून गेले त्यांचे बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते म्हणून अवतार संपले. बाबासाहेबांच्या पक्ष संघटना वाचल्या काय, नष्ट झाल्या काय बाबासाहेबांना सोडून गेलेल्याना याचे काय सोयरसुतक? त्यांना सांगणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी.
बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षांची पुनर्बाधणी करायची असेल तर खरी गरज ही अज्ञानी आणि निष्क्रिय अनुयायी कार्यकर्त्यांची आहे. कारण जे बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते पण ते जर बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेबाबत अज्ञानी असेल तर त्याला सदाचाराने सम्यक ज्ञानी करता येईल तसेच ज्यांना हे माहिती आहे की बाबासाहेबांनी तथागत बुद्ध यांचे अनुयायी कार्यकर्ते बनण्यासाठी तथागत बुद्ध यांचे बुद्ध धम्म हे संघटन स्वीकारले होते. तेव्हा कुठे बाबासाहेब हे तथागत बुद्ध यांचे अनुयायी कार्यकर्ते झालेत. आणि म्हणून आपणाला बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते व्हायचे असेल तर बाबासाहेबांच्या पक्ष संघटना स्वीकारून संविधानानुसार उभ्या करायचे आहे. पण हे कार्य करीत नसल्याने त्यांच्या निष्क्रियपणामूळे बाबासाहेबांच्या पक्ष संघटना मोडकळीस आलेल्या आहेत. यांची निष्क्रिय अनुयायी कार्यकर्त्यांना केवळ जाणीव करून द्यायची आहे. आणि हेच काम आम्ही करत आहोत.
कारण जगातील संस्थापक, प्रणेता आणि शास्ता यांचे मोठ्यातील मोठे संघटन निष्क्रिय, अज्ञानी आणि बेईमान या अनुयायी कार्यकर्त्यांनी नष्टप्राय करण्यासाठी हातभार लावलेला आहे. मग ते तथागत बुद्ध यांचे बुद्ध धम्म हे संघटन असो किंवा आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी संघर्षरत राहण्यासाठी दिलेल्या बाबासाहेबांच्या आदर्श आणि प्रेरणादायी पक्ष संघटना मोडकळीस आणण्यास निष्क्रिय, अज्ञानी आणि बेईमान या तीन प्रकारच्या अनुयायी कार्यकर्त्यांचाच सहभाग होता, आहे आणि राहणार आहे. ०४११२४
– अशोककुमार उमरे ८६९८८४२४०२
रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत