तुळजापूर तालुक्याचा सर्वांगिण विकासासाठी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला :- मधुकरराव चव्हाण
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
तुळजापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासा साठी मी प्रामाणिक प्रयत्न केला याच बरोबर राष्ट्रीय कॉग्रेसशी एक निष्ठ राहीलो आहे तरीही वरिष्ठ राष्ट्रीय कॉग्रेस श्रेष्ठीने मात्र माझ्या उमेदवारी कडे पाठ फिरवली आहे म्हणून मला माझा उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला आणि अक्षरक्षा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी निवडणूकीचे मैदान गाजविले
तुळजापूर तालुक्यात शेकडो कार्यकार्त्या सह तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार तथा माझी कॅबीनेट मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताच तुळजापूर येथे श्रीनाथ मंगल कार्यालय येथे कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता
प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजन करून रॅली काढण्यात आली यावेळी रॅलीत हजारो कार्यकर्ते दाखल झाले होते . या मेळाव्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते रुषी मगर यांनी केले होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मुकुंद [ दादा ] डोंगरे , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबुराव चव्हाण , अमर माने , ॲड रामचंद्र ढवळे , जळकोट गावचे माजी सरपंप अशोक [ भाऊ ] पाटील , पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड , नळदुर्ग येथील माजी नगरसेवक विनायक अंहकारी , बसवराज धरणे , अजयकुमार बागडे , सुजित हंगरकर , लक्ष्मण सरडे , अशोक मगर , प्रकाश चव्हाण , सादु मुळे , दादासाहेब चौधरी , उमेश गायकवाड खडकीचे पंडीत गायकवाड सह तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत