देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

विक्रमापेक्षा विवेक हवा


(पण लक्षात कोण घेतो..? )

नुकताच अयोध्या येथे एकाच वेळी साडेपाच लाख पणत्या पेटवून जागतिक विक्रम केला गेला. त्याचा खर्च म्हणे दीडशे कोटीहून अधिक झाला. त्यानंतर अनेक लहान मुलं आणि महिलांचे, अर्धवट जळालेल्या पणत्यांमधलं तेल घेऊन जातानाचे फोटोही झळकले

भारतासारख्या विकसनशील देशात, अजूनही लाखो- करोडो लोक एक वेळ उपाशी आहेत, गरिबी आणि बेकारीने त्रस्त आहेत अशा वेळी केवळ जागतिक विक्रमासाठी असा करोडोंचा खर्च करणे कितपत योग्य आहे…? यापेक्षा याच दिवाळी सणाचं औचित्य साधून कितीतरी लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता आली असती. स्वच्छ पाणी, रस्ते आणि वाहतूक इ. अनेक योजना काही अंशी का असेना पूर्ण करता आल्या असत्या

पण लक्षात कोण घेतो…?

तसंच सरदार पटेलांच्या पुतळ्याबाबत म्हणता येईल. हजारो कोटींच्या पुतळ्यापेक्षा त्यांच्या नावाची एखादी योजना कायमस्वरूपी सुरु करून शाश्वत विकासाची मुहूर्तमेढ रोवता आली असती (‘उज्वला’ या चांगल्या योजनेसारखी दुसरी योजनाही राबवता आली असती )

पण लक्षात कोण घेतो…?

आता शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी लोकभावना म्हणत राजकारण सुरु आहेच
(इथंही शिवाजी महाराजांच्या नावे गडकिल्ले संवर्धन किंवा बाबासाहेबांच्या नावाने दलित समाजासाठी उद्योग आणि रोजगार निर्माण करता येऊ शकतील… पण ‘उत्सवप्रेमी’ लोकांना हे मान्य होईल का..?)

भारतीय सामान्य लोक विवेकापेक्षा भावनिक होऊन विचार करतात आणि विज्ञान, तर्कशास्त्र मागं पडतं. यातून समाजाचे कोणतेच तातडीचे प्रश्न सुटत नाहीत आणि सामाजिक विकासही होत नाही पण प्रत्येक राजकीय पक्षाला लोकांना झुलवत ठेवण्याचा कायमस्वरूपी मार्ग मिळत जातो. सामान्य माणूस यातून शहाणा कधी होणार…?

यावर अनेक मतमतांतरं असू शकतील… पण विवेकाने विचार करणे ही काळाची गरज आहे. एकीकडे आपण चंद्रावर स्वार होत आहोत आणि देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्षे होऊनही आज आपल्याला स्वच्छ हवा, पाणी, चांगले आणि कायमस्वरूपी रस्ते यासारख्या मूलभूत प्रश्नासाठी झगडावे लागते ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे

कधीतरी आपण आपल्या भावनिक अस्मिता, अव्यावहारिक आणि अतार्किक गोष्टींमधून बाहेर येऊन जित्या जागत्या गोष्टींचा विचार करणार आहोत का…?

पण लक्षात कोण घेतो…?

🐚9326365396🐚

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!