शरद पवारांनी तमाम दलितांच्या छातीत खंजीर खुपसला : दलित महासंघाच्या वतीने निषेध..!
-प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एक पुरोगामी नेता, अभ्यासू नेता, उपेक्षित समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेता, फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचारांचा नेता.. अशी शरदचंद्रजी पवार यांची ओळख सांगितली जाते. त्याचबरोबर “पाठीत खंजीर खुपसणारा नेता” अशी सुद्धा त्यांची ओळख सांगितली जाते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांचे सरकार पाडले आणि स्वतः मुख्यमंत्री बनले, त्या संदर्भात त्यांच्यावर ही टीका होत आली आहे. याच अनुषंगाने आजही शरद पवारांच्या बाबतीत “पाठीत खंजीर खुपसणारा नेता” असे बोलले जाते.
पण आज वयाच्या 85 पर्यंत पोहोचलेल्या, सर्वात ज्येष्ठ असलेल्या आणि आयुष्यभर फुले – शाहू – आंबेडकरांच्या नावाचा जप करणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांनी माळशिरस 254 या अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघांमध्ये धनगर जातीचे उत्तम जानकर यांना उमेदवारी देऊन महाराष्ट्रातल्या तमाम दलितांच्या पाठीत नव्हे, अक्षरश: छातीत खंजीर खुपसला आहे. शरद पवारांच्या या कृतीचा दलित महासंघाच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत. एवढेच नाही तर, महाराष्ट्रातील दलित समाजाच्या राजकीय हक्कांवर नख लावण्याचे पाप शरद पवारांनी केले आहे. या गोष्टीमुळे त्यांच्या आजवरच्या एकूण कारकिर्दीतील सर्वात मोठा “काळा डाग” त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर पडला आहे. जो आता कशानेही आणि कधीही पुसला जाणार नाही.
-प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे
(संस्थापक अध्यक्ष – दलित महासंघ, महाराष्ट्र राज्य)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत