आरक्षणाच्या चंदन बनात “जात घुसखोरांच्या “वेली चां विळखा ,,,,,!
••••••••••••••••••••••••••••••••••••
ऍड अविनाश टी काले ,अकलूज
•••••••••••••••••••••••••••••••••••
ज्याचे आहे त्याचे रहावे हा साध्या पापभिरू माणसांचा स्वभाव असतो ,
कपटी , लुच्या , चोर अवलादी च्या माणसांचा स्वभाव हा दुसऱ्याचे चोरून , हिसकावून फसवून , आपल्या मालकीचे कसे होईल ? या कडे कल असतो ,
जेंव्हा ब्रिटिश सत्ता अस्तित्वात होती , तेंव्हा उत्तर प्रदेश पासून थेट महाराष्ट्रा पर्यंत ठग लोकांची टोळी असे ,
प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचा वेष परिधान करून अतिशय चातुर्य पूर्वक संभाषण करत ते व्यापाऱ्यांच्या कळपात मिसळत , त्यांचा विश्वास संपादित करत , मजल दर मजल करत ते त्यांच्या सोबतीने चालत राहत ,
आणि निबीड अश्या निर्जन जागी आले की अचानक ते त्यांच्या साथी दारा सह त्या व्यापाऱ्याच्या पाठीमागे येत असत आणि हातातील रुमाल त्यांच्या गळ्यात आवळून असा फास बसवत की व्यापारी तडफडून मरत असे ,
1725ते 1795हा पुण्याहलोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा कालखंड , पतीच्या निधनानंतर सासरे म्हलार राव होळकर यांनी त्यांना पुत्र वत मानले आणि त्यांच्या हातात राज्य कारभाराची सूत्रे सोपवली .
प्रजा हित दक्ष , आणि साध्वी चारित्र्य काय असते हे त्यांनी दाखवून दिले , पण राज्यकर्ते या नात्याने न्यायाची हमी त्यांनी जनतेला दिली ,
ठग लोक अनेकांचे जीव घेतात म्हणून त्यांनी त्यांच्या मुक्ता बाई यांचे स्वंयवर मांडले आणि घोषित केले
जो कोणी या चोर , लुटारू , ठगांचा बंदोबस्त करेल अश्या शुर विराची जात पात मी पाहणार नाही , त्याचेशी मी माझ्या कन्येचा विवाह लाऊन देईन ,,,,,,
यशवंत फणसे नावाच्या युवकाने तो पण जिंकला आणि ते पुण्यशलोक अहिल्यादेवी यांचे जावई झाले
याला अनेक दशके लोटली पण दुर्दैव असे की ज्या धनगर समाजाचा हा थोर वारसा आहे त्याच समाजात असे जात चोर पैदा झाले , की फक्त राजकीय सत्तेच्या हव्यासाने त्यांनी हा मार्ग स्विकारला ,
1990 साली धनगर समाजाचा भटके विमुक्त प्रवर्ग मध्ये समावेश करण्यात आला , त्याला अनेकांनी आक्षेप घेतले , पण एन टी मधील 3•50%आरक्षण त्यांना प्राप्त झाले ,
हा समुदाय ओबीसी मध्ये समाविष्ट झाला ,
पण ओबीसी समुदायाला राजकीय आरक्षण त्यांच्या लोकसंख्या प्रमाणात नसल्याने विधी मंडळ व लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी धनगर समाजाला ओपन मधून निवडणूक लढवावी लागते ,
धनगर समाजातील फार थोडे लोक या पातळीवरची लढाई लढतात , ज्यात स्मृती शेष आदरणीय आ भाई गणपत राव जी देशमुख साहेब , रासपा चे महादेव जी जानकर साहेब यांचा उल्लेख करावा लागेल , अण्णासाहेब डांगे , आर जी रुपनवर (आप्पा) राम शिंदे , दत्ता मामा भरणे , नारायण आबा पाटील , ऍड एस बी अण्णा पाटील , , ऍड अण्णाराव पाटील , अगदी अलीकडील आ प्रकाश अण्णा शेंडगे , आ गोपीचंद पडळकर , प्रा लक्ष्मण हाके , अशी अनेक नेते मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरली , कधी ते पराभूत झाले , कधी निवडून ही आले , पण त्यांनी सत्याचा मार्ग सोडला नाही ,
राजकीय फायदा घ्यावा म्हणून जातीची पात सोडून दुसऱ्या जातीच्या पातीत घुसण्या चे पाप कुणी केले नाही ,
ही सर्व मंडळी आमच्या साठी आज ही सन्मान जनक आहेत ,
पण याच माळशिरस तालुक्यात असा जात चोर निर्माण झाला , आणि एका चोराने गरुड भरारी घेतली म्हणून त्याची नक्कल करत अनेकांनी खोट्या जात दाखल्याचे निर्ल्लज्ज मुखवटे परिधान केले ,
अश्यांची संख्या इतक्या वेगाने वाढली की
एखाद्याला एच आय व्ही ची लागण झाली आहे याचे निदान व्हावे आणि पाहता पाहता माणूस एडस् चां पेशंट बनून जावा तसे हे झाले आहे
प्रशासकीय पेशीच्या केंद्रात शिरून सत्तेचे कवचात सुरक्षित रहावे आणि विषाणू सापडूच नये तशी अवस्था माळशिरस तालुक्यातील एस सी प्रवर्ग मधील 48जात समूहाची झाली आहे ,,
आपल्याला राजकीय स्पर्धेत मराठा समाजाने मागे टाकले आहे याचे श्यल्य त्यांना होते , पण त्या सत्तेला बाजूला सारून स्व सत्ता स्थापित करण्याची ऊर्मी , शक्ती आणि धमक हा समाज गमावून बसला ,
पराभूत माणूस एक तर रणांगण सोडून पळून जातो किंवा तो त्या सत्ताधिशा ना शरण तरी जातो
“उत्तमराव जानकर ” कितीही डरकाळ्या मारत असतील तरी ते पराभूत आहेत , पराभूत मानसिकतेचे आहेत , म्हणून विधानसभा किंवा लोकसभा स्वतः चे हिमतीवर त्यांनी ओपन मधून कधीच लढली नाही ,
या उलट त्यांनी ठगाच्या भूमिकेत शिरण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या चलाख मेंदूत ही कल्पना सुचली की , आपण जार धनगर चे धनगर खाटीक केले तर ?
त्यांच्या सुदैवाने त्यांचे गाव छोटे खाणी , शाळा ही लहानशी ,, झाले सेवा निवृत्त झालेल्या मुख्याध्यापक यांना त्यांच्या हस्ताक्षरात खाटीक लिहायला लावले , आणि आमच्या दुर्दैवाने ते मुख्याध्यापक हयात नाहीत ,
मोहिते पाटील यांच्या प्रवृत्ती विरुद्ध माझा प्रचंड राग आहे , आणि त्यांचा बीमोड झाल्या शिवाय मला चैन पडणार नाही , सत्तेची मला हाव नाही , पण ती सत्ता वापरून मीच त्यांचा नायनाट करू शकतो अश्या गप्पा ते नेहमी मारत ,
आंबेडकरी चळवळीचे विद्रोही तरुण या त्यांच्या शब्द जालात फसले , आणि सर्व प्रकारचे बनावट पुरावे निर्मितीत त्यांचे ही योगदान लाभले ,
मला आठवते , 2014साली लोकसभा निवडणूक होती , माढा लोकसभा साठी माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह जी मोहिते पाटील साहेब उभे होते , त्यांचे विरोधात कै “लोक~ नेते ” प्रतापसिंहजी मोहिते पाटील साहेब उभे होते ,
मी त्यांचा स्टार प्रचारक वक्ता होतो ,
नेमके सांगोला कडे जाताना वेळापूर येथील पालखी मैदानावर उत्तम राव जानकर यांच्या मुलीचे लग्न होते ,
मी पप्पा साहेबाना प्रश्न विचारला तुम्ही लग्नाला जात नाही का?
आणि पप्पा साहेब म्हणाले उत्तम राव जानकर हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस नाही .
मोहिते पाटील विरोधक म्हणून लाखो लोकांनी त्यांचे वर विश्वास ठेवला हे वास्तव आहे , हा विश्वास कमावण्या साठी वाटेल ते प्रयत्न या माणसाने केले , डॉ धवल सिंह मोहिते पाटील यांनी विकत घेतलेल्या जमिनीचा ताबा कुळ सोडत नव्हते त्यांनी तो सोडावा म्हणून त्यांची बोलणी सुरू असताना त्या वादात घुसून थेट आत्महत्या करण्यास त्या माणसाला उद्युक्त केले , स्वतःचे अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतल्याने पाठीला झालेली जखम घेऊन त्या रुग्णास पुणे येथे हलवले , आणि तिथे मृत्यू पूर्व जबाब नोंदवून खुनाच्या केस मध्ये डॉ धवल सिंह मोहिते पाटील यांना अडकवण्याचा प्रयत्न केला , पण त्या काळात असलेले शूटिंग आणि मी दैनिक महा पर्व चां संपादक असताना ती दर्शवलेली सर्व चित्रीकरण पाहून त्यांना जामीन ही मिळाला ,
त्यांच्या साथी दाराने नाना आसबे यांचे वर थेट गोळीबार केला , ज्यात त्यांना मोका लागला होता ,
विद्यमान खा धैर्यशील जी मोहिते पाटील यांच्या शो रूम मध्ये घुसून गोळीबार करण्याचे नियोजन त्या काळी फक्त गुन्हे गाराचे मनोधैर्य खचल्याने पूर्णत्वाला जाऊ शकले नाही ,
अश्या अनेक विकृत चाळ्यानी भरलेलं हे आयुष्य घेऊन ते राजकारणात सक्रिय राहिले , 2019 मध्ये मोदीजी यांना थेट पाठिंबा देऊन मोहिते पाटील यांच्याशी सलगी साधली पण त्यांच्या दुर्दैवाने भाजप ने आ राम सातपुते यांना संधी दिली , आणि याच रागातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडे कुस वळवली ,
2024साली लोकसभा उमेदवारी रणजितसिंह निंबाळकर यांनाच मिळणार आणि मोहिते पाटील ही या उमेदवारी साठी आग्रही राहणार , हा सत्ता संघर्ष त्यांना अनुमनित होता ,
सोलापूर लोकसभेची राखीव उमेदवारी स्वतः ला मिळावी म्हणून माझा डी एन ए भाजप चां आहे हे सांगणारे उत्तम राव जानकर , लोकसभेला आ राम सातपुते यांच्या उमेदवारी ने क्रोध मय झाले आणि त्यांनी निर्णय घेतला , आपल्या लोकांचा विश्वास तोडू पण ही आमदारकी मिळवू च मिळवू ,, म्हणून धैर्यशील जी मोहिते पाटील यांच्या समवेत ते पाठिंबा घेऊन उभे राहिले ,
आपल्या पूर्व साथी दारांचा विश्वास आपल्या समवेत आहे व ते आपला प्रवेश रोखण्याचा प्रयत्न करतील हे त्यांना माहीत होते , तसे घडत गेले आणि त्यागमुर्ती म्हणून ते जनते समोर स्व प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाले ,
पाठीबा देऊन फक्त चालणार नव्हते , उमेदवारी चां शब्द ही हवा होता त्या प्रमाणे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना सूचना देऊन ती मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर रेटली गेली , आणि आत्ताच ए बी फॉर्म दिला असा शब्द घेतला गेला ,
पुढे हाच शब्द जयसिंह जी मोहिते पाटील यांच्या कडून ही घेण्यात आला , त्यांचे मिशन यशस्वी झाले
पण या दरम्यान 2009ते 2024चे काळात धनगर समाजातील देशमुख ते सुळ अश्या 36लोकांनी एस सी चे दाखले काढले
“पाचाचे पन्नास होऊ से वेल मांडवा ला जाऊ दे” म्हणत या जात चोरांच्या अमर वेली ने एस सी आरक्षणाच्या चंदनाच्या बागेत जाळे गुंफण्यास सुरुवात केली आहे ,
या वेलीचे वैशिष्ठ्य हे असते की झाडाचा अन्नरस ते शोषून घेते ,
या जात चोरांच्या वेली मागास वर्गीय मुलांच्या शैक्षणिक , प्रशासकीय नोकर भरती यातील रस शोषून घेतील ,, आणि आमचा दुर्बल समाज अजून लुळा पांगळा होईल ,,,,,
लक्षात ठेवा मी या निवडणुकीत स्पर्धक नाही , कोणत्याही उमेदवारी साठी इच्छुक नाही , ही लढाई न लढण्यात माझा स्वतः चां आर्थिक फायदा होता
पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी मी कधीच प्रतारणा केली नाही ,
माझे पोट भरण्या साठी माझ्या दलीत बहुजन समाजाचे मारेकरी होणे मी टाळले ,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे दिव्य करून अनेक संकटे झेलून , जीव मारण्याच्या धमक्या येत असताना ही फक्त आपल्या साठी हे आरक्षण निर्माण केले ,
मी जे मिळवले त्यात वाढ करता येत नसेल तर आहे ते तरी टिकवा , म्हणून त्यांनी कळकळून केलेले आव्हान मला झोपू देत नाही ,
मातंग समाजातील लाला साहेब अडगळे सारखा माणूस सुप्रीम कोर्टा पर्यंत लढतो आहे , माझ्या कडे पैसे नाहीत पण लेखणी आहे ,
मी ही आत्ता वयाची 60ओलांडली आहेत , मी उद्या असेन किंवा नाही हे मला माहीत नाही , पण “इंद्राय स्वाहा टक्षकाय स्वाहा” या उक्ती प्रमाणे मी राष्ट्रवादी काँग्रेस शी ही लढाई करण्यास तयार आहे ,,
ए वादे सबा हमसे ना टकराना
बिखर जाऊ तो आसमा बन जाऊ गा ,,,,,,
त्या वादळाला जाऊन सांगा आमच्याशी टक्कर घेण्याचा नादान पण करू नको , तुटले गेलो तर आकाश व्यापून राहीन ,,,,,,,!
उत्तमराव जानकर यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची छाटणी करण्याची वेळ जवळ आली आहे , आपल्या आरक्षणाचे चंदन वृक्ष जगवायचे असतील तर ते करावेच लागेल , आणा भाऊ साठे यांच्या वारसदारांनो , तुमच्या कत्ती बाहेर काढा ,,,,, शिंदोळया ची बने केरसुणी निर्माण करण्यासाठी छाटली आत्ता या जात चोरांच्या वेली छाटण्या साठी एकत्रित येऊयात
जय भीम ,,, जय लहूजी ,,, जय अण्णा भाऊ ,,,,!
आपला विश्वासू
ऍड अविनाश टी काले , अकलूज
मो न 9960178213
25/ 10/ 2024
••••••••••••••••••••••••••••••••••••
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत