निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

पुढील लोकसभेत सुमारे 800 सांसद असतील?

पुढील लोकसभेत सुमारे 800 सांसद असतील, असा अंदाज आहे. आणि हीच बाब प्रसंगी देशाची फाळणी करू शकेल, असं वाटतं.

लोकसंख्येच्या आधारे संसद सदस्य निवडून जातील.

दक्षिण भारतातील राज्ये शिक्षित, उद्यमप्रेमी, कष्टाळू, कायदा पाळणारे, छोटी कुटुंबे असणारी अशी आहेत.
साहजिकच त्या राज्यातील लोकसंख्या आटोपशीर आहे.

त्या उलट उत्तरेतील गोबरपट्टा घ्या….
धार्मिक कर्मकांडाचा उच्छेद, शिक्षणाची ऐसी की तैसी,
बेरोजगारी, अफाट लोकसंख्या, वैचारिक मागासलेपण, कायदा फाट्यावर मारण्याची प्रवृत्ती, गुन्हेगारी….
मात्र तेथून संसद सदस्य अधिक निवडून येणार!

म्हणजे, जिसकी लाठी उसकी भैस…
ज्याचे खासदार जास्त त्याची राजवट… 😂
धर्माचे पांघरून घेतलेल्या बीजेपीसाठी अगदीच अनुकूल परिस्थिती!

**
शिक्षण, रोजगार, उद्योग, दळणवळण, रस्ते,… इतर सुविधा..राज्यात असणे हा दक्षिणी लोकांचा गुन्हा आहे?
म्हणून, त्यांना गोबरपट्ट्यातील कावडवाल्यानी गुलाम सममजायचं? बहुमत आहे म्हणून त्यांना नेहमी डावलायचं? त्यांनी ज्यादा टॅक्स द्यायचा, मात्र त्याचा परतावा कमी घ्यायचा?

हा प्रश्न उद्या उभा राहणारेय…!

**

आम्ही महाराष्ट्रीयन….
भौगोलिकदृष्ट्या आम्ही दक्षिणीच… आमची सांस्कृतिक नाळ दक्षिणेशी जुळलेली.
पण गेल्या काही काळात सनातनी वैदिक बामणांनी आमच्या डोक्यात उत्तरेचं धार्मिक खूळ भरविण्यास सुरुवात केलीय…
म्हणून आम्हीही ” गर्व से कहो हम… “सारख्या निरर्थक घोषणा छाती पिटत देऊ लागलोय!

दक्षिणेत काय राम नाहीय की हिंदू नाहीयेत….?
दोन्हीही आहेत.!

म्हणून आम्हाला उत्तरेच्या गोबरपट्ट्या ऐवजी सुसंस्कृत दक्षिणेचा हात हातात घेण्याची आवश्यकता आहे!

**

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!