संसदीय राजकारणाच्याआखाड्यातून नवबौध्द , व मातंग समाज बाहेर फेकले गेले आहेत काय?
ऍड अविनाश टी काले , अकलूज
मो न :-9960178213
स्वातंत्र्य पूर्व काळात वसाहत वाद संपून देशाला स्वातंत्र्य बहाल करत असताना विविध समूहाचे राजकारण आकाराला येत होते ,
हिंदू महासभा , मुस्लिम लीग स्वतंत्र होऊन फाळणीच्या दिशेने वाटचाल करत होते , अश्या काळात तत्कालीन अस्पृश्य समाजा साठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी न करता अस्पृश्य समाजाने सांस्कृतिक एकता म्हणून हिंदू सुवर्ण समाजा सोबत राहण्याचा निर्णय घेतला .
भारतातील राजवट लोकशाही नुसार चालणार ही बाब स्पष्ट झाली आणि कायदे मंडळात सर्व वर्गाचे लोक प्रतिनिधी हे प्रातिनिधिक स्वरूपात कश्या प्रकारे निवडून आणायचे ? यावर चर्चा सुरू झाल्या .
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जाणत होते की अस्पृश्य समाजाचे खरे लोकप्रतिनिधी निवडून जाण्यासाठी याच समूहातील मतदारांनी आपला लोकप्रतिनिधी निवडल्यास तो अस्पृश्य समाजाच्या व्यथा , वेदना , समस्या , याचे प्रश्न संसदेत विधानसभेत मांडेल आणि ते प्रयोजन यशस्वी असेल ,
परंतु महात्मा गांधी जी यांच्या मता नुसार असे मतदार संघ निर्माण झाले तर हिंदू मध्ये उभी फूट पडेल , समाज दुभंगेल , म्हणून मतदान प्रक्रिया राबवताना ती सुवर्ण व अस्पृश्य यांच्यात परस्परावलंबी असावी ,
याचाच अर्थ ओपन मधील उमेदवार निवडताना ही अस्पृश्य लोक मतदान करतील , तसेच राखीव जागेवर लोकप्रतिनिधी निवडले जात असताना त्यांच्या तील कोणता लोकप्रतिनिधी असावा ? हे ठरवण्यासाठी त्याला सुवर्ण समाज ही मतदान करेल .ज्याला आपण
” पुणे करार” म्हणून ओळखतो .
सर्व समाजाने आपल्या सदसद विवेकबुद्धी ने चांगले लोकप्रतिनिधी द्यावेत , ही बाब यात गृहीत होती ,,
त्या नंतर स्वातंत्र्य मिळाले , बरेच पाणी पुला खालून गेले , अस्पृश्यता विरोधी लढाई अधिक धारधार बनली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या निष्कर्षाला पोहचले की , वर्ण व्यवस्था , व जाती व्यवस्था ही हिंदू ची अविभाज्य व्यवस्था आहे , यातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणून त्यांनी धम्म चक्र गतिमान केले .
सांस्कृतिक दृष्ट्या नवबौध्द समाज हा हिंदू पासून वेगळा झाल्याची भावना सार्वत्रिक तीव्र असताना ही हळू हळू गाव गाड्यात व संसदीय राजकारणात नागरिक म्हणून हा समाज ही मिसळला ,
भारतीय राज्य घटना निर्माण केल्या नंतर त्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या धर्म , रूढी , परंपरा , उपासना , आणि श्रद्धा या नुसार वागण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले .
नवबौध्द समाजाचा जुना अध्याय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपवून नवीन अध्याय सुरू करून दिला होता , त्याची अंमलबजावणी करणे नवबौध्द समाजाच्या अंतर्गत सुधारणेचा भाग होता , पण त्या न करता नवबौध्द समाजाने आपले लक्ष
हिंदू धर्मातील चिकित्सा , टीका , टिप्पणी यावरच केंद्रीय केले ,
सामाजिक , राजकीय , आर्थिक सर्व पातळ्यांवर मागास असलेल्या समाजाचा फार मोठा कार्य काळ या साठी वापरला गेला ,
त्याची परिणीती म्हणून उलट पक्षी हा समाज इतरांच्या दृष्टीने तिरस्करणीय ठरला ,
पूर्वी तो बहिष्कृत होता त्याच्या जोडीने तो तिरस्करणीय बनला ,
संसदीय लोकप्रतिनिधी निवडले जात असताना सांस्कृतिक दृष्ट्या आपणास जवळ असणाऱ्या व निरुपद्रवी समाज म्हणून अस्तित्वात असलेल्या मातंग समाजाची निवड
सुवर्ण हिंदू समाजाने करण्यास सुरुवात केली , ही नवबौध्द समाजासाठी त्यांनी केलेली
रीपलेस्मेंट होती , यातून बराच काळ महाराष्ट्रात या समाजाला लोकप्रतिनिधित्व मिळाले .
व्यक्तिगत सुधारणा , आणि समग्र समाजाची सुधारणा यात मूलभूत फरक असतो , अनेक लोकप्रतिनिधी मिळून ही सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक पातळीवर मातंग समाज हा मागास राहिला ,
आंबेडकरी चळवळीचा परिणाम म्हणून आलेल्या आत्मभानातून आंबेडकरी समाजाने शिक्षणास अधिक महत्व दिले , आणि याचा परिणाम म्हणून प्रशासकीय सेवेत ही हा वर्ग सामावला गेला ,
आंबेडकरी विचारधारा जात बंधने तोडून व्यापक झाल्याने , या शिवाय महाराष्ट्रात नवबौध्द समाजाची लोकसंख्या लक्षणीय असल्याने या चळवळीतील पक्षीय नेत्यांना सोबत घेण्याचे प्रकार सुरू झाले , त्यातून कांहीं मंत्री , आमदार , खासदार म्हणून ही निवडले जाऊ लागले ,
तत्कालीन काँग्रेस मध्ये असलेल्या पवार साहेबांनी नवबौध्द समाजात असे “ठेकेदार” निर्माण केले ,
ठेकेदारांना सत्ता दिली की उर्वरित समाजाला इतरत्र सत्ता न देता ही त्यांची मते आपल्या कडे वर्गीकृत करून घेण्याची ही त्यांची रणनीती कमालीची यशस्वी झाली ,
पण याचा अनिष्ट परिणाम म्हणून असे अनेक नवे ठेकेदार निर्माण होऊ लागले , आणि चळवळ अधिक विघटित होण्यास सुरुवात झाली .
चळवळ सुरू केली आणि समाजाचे ठेकेदार बनले की सत्ता प्राप्त होते ही बाब इतर समाजात ही प्रक्षेपित झाली आणि जात निहाय ठेकेदार निर्माण होऊ लागले ,
मातंग समाजाला अण्णा भाऊ साठे यांच्या रूपाने नवा आयकॉन प्राप्त झाला , क्रांतिकारी साहित्य , शाहिरी या समवेत” लाल बावटा “ची विचारधारा या मुळे हा समाज ही राजकीय दृष्ट्या जागरूक झाला , आणि तो ही गुरगुरू लागला ,
हिंदुत्व वाद्यांच्या दृष्टीने अण्णा भाऊ साठे हे फारसे उपयुक्त नव्हते , त्यांची कम्युनिस्ट विचारधारा ही त्यांच्या दृष्टीने त्याज्य अशीच होती ,
महात्मा फुले यांच्या काळात असलेले लहुजी वस्तादांचे वडील हे पेशवाईत
“शिकांरखाणा” प्रमुख होते ‘
म्हणजे जिथे वाघ , सिंह हे हौसेने पाळले जात ,,
पुरंदर किल्ला , त्याची रखवालदारी असा इतिहास असलेले हे साळवे घराणे , त्यांच्या तालमीतील वस्ताद होते , आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारे सैनिक या तालमितून निर्माण केले गेले असा संदेश समाजात दिला गेला ,
लहुजी वस्ताद हे पेशवाई समर्थक होते काय? याचे उत्तर सकारात्मक देण्यात अडचणीची बाब ही ठरते की , महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीस त्यांनी संरक्षित केले , त्यांची नात मुक्ता साळवे यांनी इयत्ता चौथीत असताना लिहिलेला निबंध आणि त्यांनी
” आमचा धर्म कोणता “? म्हणून विचारलेला प्रश्न याची सोडवणूक कुणालाच करता आली नाही ,
बंडखोरी आणि चळवळीची भाषा बोलणारा ” मातंग” समाज ही प्रस्थापित सुवर्ण जाती समूहाच्या राजकीय नेत्यांना नकोसा झाला ,
हे वास्तव भीषण आहे .
म्हणूनच महाराष्ट्रात या दोन समाजाला वगळून त्यांच्या व्यतरिक्त असलेल्या अस्पृश्यां मधील “अनुसूचित जाती” प्रवर्गातील , चर्मकार , हिंदू खाटीक , बुरुड , इतकेच काय कैकाडी , लिंगायत , आणि आत्ता धनगर , अश्या इतर कोणत्याही जाती समूहातील नेत्यांना प्रथम पसंती देण्याचे त्यांनी ठरवले ,
माळशिरस तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सकल मराठा समाजाची बैठक त्यांच्या पाणिव येथे बोलावली होती ,
सकल मराठा समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माळशिरस तालुक्यात जाहीर केलेली बोगस धनगर खाटीक उमेदवाराची उमेदवारी नको आहे ,
पण त्याला रीप्लेसमेंट म्हणून , त्यांना नवबौध्द किंवा मातंग समाजाचे लोक उमेदवार म्हणून नको आहेत , ही त्यांची मानसिकता आहे .
पूर्वी डेमोक्रेटिक ( सुकुमार कांबळे) चे कार्यकर्ते असलेले अजय सकट , जे आज उत्तमराव जानकर यांचे कार्यकर्ते आहेत ,
माळशिरस तालुक्यातील विधानसभा उमेदवारी मिळावी म्हणून ते भाजप मध्ये असताना आग्रही होते , तेंव्हा भाजपचे माळशिरस तालुक्यातील नेते के के पाटील यांनी थेट सांगितले की नवबौध्द आणि मातंग म्हणजेच एस सी नाहीत ,
मराठा समाजाचे पाठबळ या दोन समाजाला का मिळत नाही याचे कारण “एट्रोसिटी” चां गैरवापर हे सांगितले जाते , पण” एट्रो सिटी” च्या अनेक केसेस चां अभ्यास केल्या नंतर “(ज्या बनावट केसेस आहेत) त्याच्या मुळाशी मराठा समाजाच्या राजकीय गट बाजीचे समर्थन आढळून येते .
मागासवर्गीय समाजाचा वापर करण्याचे कसब या गट बाजीत असते ,
मागासवर्गीय समाजातील कांहीं नेत्यांनी याची ही दुकानदारी खोलली असल्याने त्याचा अनिष्ट परिणाम सर्व समाजाला भोगावा लागत आहे .
सामाजिक राजकीय पटलावर हिंदुत्व वादी , अल्पसंख्यांक वादी, धर्म निरपेक्ष , समाज वादी , साम्यवादी , आंबेडकर वादी हे प्रवाह अस्तित्वात राहणारच आहेत , कुणाच्या विरोधाने कोणता ही प्रवाह थांबणार नाही ,
समाज व्यवस्थेत निकोप सामाजिक अभिसरण साधन्यासठी परस्पर समज गैरसमज बाजूला सारणे आवश्यक आहे ,
नवबौध्द समाजातील व्यक्तीने भाजप चे राजकारण अंगीकारलेले असेल तर तो त्याचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे , हे मान्य केले पाहिजे ,
नवबौध्द म्हणून त्याची श्रद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धम्म यावर असते , हे ही मान्य केले पाहिजे ,
हिंदू असलेल्या समुदायाच्या श्रध्देला तो नकार देत नाही , त्यांच्या श्रध्देचा तो अवमान करत नाही ही बाब स्पष्टपणे त्याला ही सांगता आली पाहिजे ,
आमच्या माळशिरस तालुक्यात अतुल सरतापे नावाच्या युवकाने स्व कर्तुत्वाने भाजपच्या युवक राज्य पातळीवरील सरचिटणीस पद मिळवले आहे , अश्या युवकांचा ही विचार भाजप सारख्या पक्षाने उमेदवारी देताना केला पाहिजे असे मला वाटते .
राजकीय स्पर्धे मध्ये सत्ता हसगत करण्यासाठी प्रस्थापित पक्ष व त्यांचे नेते वेगवेगळी भूमिका घेतात , त्यांच्या या भूमिका आपणास खऱ्या वाटतात आणि इथेच आपली फसगत होते
सत्ता कारणात कोणी प्रतिगामी नाही आणि कोणी पुरोगामी ही नाही , ब्राम्हणेतर चळवळीचा आधार घेऊन महात्मा फुले यांची पगडी धारण केल्याने पवार साहेब पुरोगामी नसतात , आणि सर्व गरीब सर्वसामान्य मराठा समाजाचे
उध्दारकर्ते ही नसतात ,
महाराष्ट्राचा स्वाभिमान इत्यादी भाषा ह्या राजकीय भाषा आहेत त्यात वाहवत गेल्याने आपल्या लोकप्रतिनिधित्वाचा प्रश्न निकाली निघणार नाही
त्यांच्या राजकीय समीकरणांचां भाग म्हणून धनगर समाजाचा नवा ठेकेदार उत्तमराव जानकर यांच्या रूपाने ते निर्माण करू पहात आहेत ,
मातंग समाजात त्यांना नवीन चेहरा दिसत नसल्याने प्रा लक्षण राव ढोबळे या जुन्या ठेकेदारास ते पुनर्जीवित करत आहेत ,
नवबौध्द समाजाचा ही चेहरा म्हणून भविष्यात ऍड राहुल मखरे यांच्या रूपाने प्राप्त होईल ,
पण राखीव जागेवर बहुतांश ठिकाणी नवबौध्द व मातंग समाजाला उमेदवारी मिळणार नाही , हे दोन्ही समाज प्रस्थापित पक्षाच्या राजकीय पटलावर वजा बाकित गेले आहेत हे मात्र नक्की ,,
म्हणून या दोन्ही समाजाला आम्ही आवाहन करतो की शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ला मतदान करू नका ,
तुमचे मत या पक्षाला पराभूत करतील अश्या उमेदवाराला द्या ,,, !
तुमच्या भागातील प्रस्थापित नेत्याला तुम्ही चालत नसाल तर भविष्यात त्यांना ही मतदान करू नका ,
ही वजाबाकी करणे तुंम्हाला जमले तरच संयुक्त मतदार संघात लोकसंख्येच्या प्रमाणात नवबौध्द मातंग समाजाचे उमेदवार दिसतील
जय भीम ,,, जय अण्णाभाऊ ,,,,!
25 /10 / 2024
••••••••••••••••••••••••••••••••••••
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत