मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

नळदुर्ग येथे राज्यातील पहिल्यांच ” बसवश्रुष्टी ” स्तंभ पुजनाचा कार्यक्रम संपन्न


बसवश्रुष्ठी मुळे नळदुर्ग सारख्या ऐतिहासिक शहराच्या सौदर्यात भर पडणार

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग येथे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातुन उभारण्यात येत असलेल्या भव्य, दिव्य अशा राज्यातील पहिल्या “बसवश्रुष्टी” च्या पहिल्या टप्प्याचा स्तंभ पुजनाचा कार्यक्रम दि. २२ ऑक्टोबर रोजी नळदुर्ग येथील गोलाई चौकात मोठ्या उत्साहात व शेकडो वीरशैव समाज बांधव व इतर नागरीकांच्या उपस्थितीत पार पडला.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या अथक प्रयत्नानंतर राज्य सरकारने नळदुर्ग येथे भव्य अशी बसवश्रुष्टी उभारण्यास मान्यता दिली आहे. यासाठी लागणारी जमीन व निधी राज्य सरकारकडुन उपलब्ध झाला आहे.या बसवश्रुष्टी मुळे ऐतिहासिक नळदुर्ग शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी उभारण्यात येणारी भव्य, दिव्य बसवसृष्टी ही राज्यातील पहिली बसवसृष्टी आहे. त्यामुळे तुळजापुर तालुक्यातील वीरशैव समाज बांधवानी समाधान व्यक्त केले आहे.
बसवश्रुष्टी उभारण्याच्या कामाचा पहिला टप्पा म्हणुन नळदुर्ग येथील गोलाई चौकात दि. २२ ऑक्टोबर रोजी स्तंभ पुजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रारंभी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर वीरशैव समाज बांधवांच्या हस्ते स्तंभ पुजन करण्यात आले
या कार्यक्रमास भाजपचे सुशांत भुमकर, माजी नगरसेवक संजय बताले, बसवराज धरणे,नय्यर जहागिरदार, शफीभाई शेख, नळदुर्ग वि का से सो माजी चेअरमन दत्तात्रय कोरे, सुधीर हजारे,तुळजापुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. आशिष सोनटक्के, माजी जि. प. सदस्य ऍड. दीपक आलुरे, वसंत वडगावे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सिद्धेश्वर कोरे, नळदुर्ग सोसायटीचे माजी चेअरमन रणजितसिंह राजाभाऊ ठाकुर ,दयानंद मुडके, सोमनाथ शेटे, दहिटण्याचे सरपंच पप्पु पाटील, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, दयानंद स्वामी, खोबरे गुरुजी, नळदुर्ग शहर भाजपचे अध्यक्ष धीमाजी घुगे, भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार, माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, सिंदगावचे सरपंच विवेकानंद मेलगिरी, माजी पंचायत समितीचे सदस्य साहेबराव घुगे, होर्टीचे महादेव पाटील,शिवसेनेचे बंडप्पा कसेकर, भाजपचे संजय विठ्ठल जाधव यांच्यासह नळदुर्ग, लोहगाव, खुदावाडी, अणदुर, होर्टी, सिंदगाव, बोळेगाव, खानापुर यासह परीसरातील गावांतील वीरशैव समाज बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!