‘यमाई देवीमुळे आपण सरन्यायाधीश झालो.’
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे काल पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यात कन्हेरसर या आपल्या मूळगावी आले होते.
चंद्रचूड यांनी गावात यमाईदेवीचं दर्शन घेऊन म्हटलं की, ‘यमाईदेवीमुळे आपण सरन्यायाधीश झालो.’
जसं आमच्या गावाकडे बाबा-महाराजांच्या कृपेने कन्यारत्न-पुत्ररत्न जन्माला येतात तसंच. त्यात आई-वडिलांच्या अंग मेहनतीचं काही मोल नसतं.
पुढे ‘अयोध्या राम मंदिर निकालावेळी देवावरची श्रद्धा आणि विश्वासामुळे मार्ग निघाला.’ असं डीवाय चंद्रचूड यांनी म्हटलं.
देशाच्या संविधानिकपदी असताना आपण अशी विधानं करावी का? हा प्रश्न खरं तर उपस्थित करू नये. कारण ते देशाचे घटना रक्षक आहेत.
राम मंदिर आणि बाबरी मस्जिद या प्रकरणात साहजिक हिंदू म्हणून त्यांचा या निकालावर काहीच एक प्रभाव पडला नसेल का? याचा विचार होणंही गरजेचं आहे.
देव-धर्म-श्रद्धा ह्या साऱ्या तुमच्या घराच्या चार भिंतीआड, मात्र बाहेर पडल्यानंतर संविधान हाच तुमचा मार्गदर्शक ग्रंथ.
देशाच्या सरन्यायाधीशाकडून अशी विधानं होत असतील तर सर्वसामान्य जनतेने न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा तरी कसा? हा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहतो. सरन्यायाधीशाकडून हे अपेक्षित नाही. 🙃💜☘️
:
🖋लखन शोभा बाळकृष्ण
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत