निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

उत्तमराव जानकर यांना खुले पत्र !!


ऍड अविनाश टी काले , अकलूज
मो न :-9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••
उत्तम राव जानकर साहेब यांना स न
महोदय ,
आपणास हे खुले पत्र पाठवत आहे ,
याचे कारण गेली कांहीं महिने आपल्यातील सवांद ही नष्ट झालेला आहे .
आज या पत्राद्वारे खुला संवाद साधण्याचे कारण इतकेच आहे की , गावठी कट्टा यावर विजय गोफणे यांच्या युट्यूब वरून धनगर समाजाच्या प्रश्नाची चर्चा केली जाते , अशी चर्चा पाहण्यात आली , ज्याचे टायटल च मुळात प्रस्थापित राजकीय पक्ष धनगर समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तिकीट देत नाहीत तसेच त्यांचे उमेदवार डावलले जातात या संबंधी आहे व पुढे काय? हा प्रश्न त्यांनी समाजाच्या पुढे उभा केलेला आहे ,
भाजप सारख्या पक्षाने ही आमचा डी एन ए ओबीसी आहे असे म्हणून “माधव” नावाचा पॅटर्न महाराष्ट्रात जन्माला घातला याचे कारणच मुळात महाराष्ट्रातील सत्ता ही मराठा समाजाच्या हातात केंद्रीभूत झालेली आहे , आर्थिक राजकीय सगळ्या नाड्या या समाजाच्या हातात एकवटलेल्या आहेत त्याला ब्रेक करण्या साठी ” मराठे तर” बहुसंख्याक जातींना ” हिंदुत्वाच्या आधारे संघटित करून ही सत्ता हातात घेण्याची रणनीती आखलेली होती .
1960 नंतर भाषावार प्रांत रचनेच्या आधारे संयुक्त महाराष्ट्र उभारल्या नंतर ज्या निवडणुका झाल्या त्यात एस सी चे म्हणजेच आंबेडकरी समाजाचे ही लोकप्रतिनिधी डझनाच्या पुढे होते , तसेच धनगर समाजाचे ही 15ते 16लोकप्रतिनिधी होते , ,
पण ही सत्ता या कुणाच्या हातात तितकी राहिली नाही ,
सहकार चळवळीचा उदय झाल्या नंतर शेती आधारित प्रक्रिया करणारी सहकार तत्वा वरील कारखानदारी ” मराठा समाजाच्या हातात एकवटल्या नंतर या परिस्थितीत खूप बदल झाला , आणि धनगर समाज हा राजकीय दृष्ट्या कमजोर सदरात गेला ,
मूळात आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेला व सामाजिक दृष्ट्या तिरस्करणीय उपेक्षित असलेला एस सी समाज हा त्याहून अधिक राजकीय दृष्ट्या खचला .
या दोन्ही समाजाचे वैशिष्ठ्य म्हणजे हे दोन्ही समाझे जात म्हणून संघटित आहेत , पण फक्त एका जातीच्या आधारे या देशातील कोणत्याही निवडणुका जिंकता येत नाहीत हे वास्तव आहे ,
एस सी , एस टी साठी राजकीय आरक्षित जागा असल्याने विधी मंडळात व कायदे मंडळात ही त्यांचा कोटा आहे , तसाच तो लोकसंख्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थेत ही आहे , पण असा कोटा ओबीसी प्रवर्गात नसल्याने विधिमंडळ ( विधासभा) व सर्वोच्य कायदेमंडळात (लोकसभा) नसल्याने ओबीसी ना ओपन मधून लढावे लागते ,
अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्था मधील आरक्षण ही सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने राज्य सरकारे इम्पिरिकल डाटा सादर करत नाहीत तो पर्यंत गोठवले गेलेले आहे ,
प्रस्थापित राजकीय पक्षांवर कुणाचे वर्चस्व आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही , त्या मुळे भाजपच्या 99 घोषित जागेत एखादा धनगर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श प)मध्ये तुम्हांला , तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून दत्ता मामा भरणे यांना तिकीट घोषित झाले आहे ,
काँग्रेस (राष्ट्रीय) मधून प्रा यशपाल भिंगे हे घोषित आहेत , अश्या प्रकारे सुमारे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला या जागा मिळालेल्या आहेत .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणून एस सी कोट्यातील जागेवर तुम्हास उमेदवारी दिली आहे ,
दुसऱ्या बाजूने जिथे धनगर समाजाचे उमेदवार उभे आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस , दुसरा गट वापरून तर शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पक्षाची तिकिटे देऊन प्रबळ मराठा उमेदवार दिले गेले आहेत , जसे की हर्षवर्धन पाटील , आ शहाजी बापू पाटील , दीपक आबा साळुंखे पाटील , करमाळयात ( जुनाच डाव नव्याने म्हणत) पुन्हा तिरंगी लढत येते आहे ,
हे घडत राहणार शेवटी हे राजकारण आहे ,
तुमच्या उमेदवारीने धनगर समाज फार आनंदित झालेला आहे , ही बाब सर्वश्रुत आहे , पण तुमच्या उमेदवारी मुळे भविष्यात धनगर विरुद्ध मागास वर्गीय समाज असे विभाजन सामाजिक पातळीवर घडून येईल आणि त्याचे पडसाद समग्र महाराष्ट्रात उमटतील , तेंव्हा धनगर समाज राजकीय दृष्ट्या आणखीन एकाकी पडेल ही बाब धनगर समाजाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे ,
एस सी सदृश्य जाती चे रूपांतरण करून जात दाखला काढता ही येईल , व निवडणुका ही लढवता येतील पण हीच बाब धनगर समाजाचे राजकीय अस्तित्वावर नक्कीच घाला घालेल आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात ही हा समाज मागे खेचला जाईल ,
मूळात राजकीय दृष्ट्या मजबूत असलेल्या मराठा समाजाची सर्वकष सत्ता स्थापित होण्या साठी तुम्ही तुमच्या अविवेकी निर्णयाने हातभार लावाल व तुमच्याच समाजाचे नुकसान करून घ्याल ,
आपल्या राजकीय अनुयायी समर्थक असलेल्या माणसांना याची जाणीव नसते , ते फक्त फायद्या कडे लक्ष देतात ,
मी तुमच्या खांद्याला खांदा लावून धनगर आरक्षणाचा “अखेरचा लढा ” लढलो आहे ,
व्यक्तिगत पातळीवर आम्ही तुम्हाला आमचे शत्रू मानत नाही , संसदीय राजकारणात व लोकशाहीत अश्या वैर भावनेला , द्वेषाला अर्थ नसतो ,
मी संसदीय राजकारणात आवड म्हणून सक्रिय आहे , यात यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांचे जाळे , आणि भरमसाठ पैसा हवा असतो तो माझ्या कडे नाही त्यामुळे मी तुमचा राजकीय स्पर्धक होऊच शकत नाही , इतकेच काय एखाद्या गल्लित्तील कार्यकर्ता ही निवडणुकीच्या क्षेत्रात माझ्या पुढे दहा पट पुढे राहील ,
मी हे खुले पत्र माझ्या व्यक्तिगत महत्व कांक्षेतून लिहीत नाही , पण तुम्ही तुमच्या निर्णयाचा फेर विचार करावा , व माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाने ही शांतपणे याचा विचार करावा एवढे आवाहन मात्र जरूर करेन ,,
शेवटी निर्णय तुमच्या सद्सद विवेक बुध्दी आधारे घ्यायचा आहे ,
तुमच्या ऊर्जेची , तुमच्या चेहऱ्याची आवश्यकता खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस श प पक्षास असेल तर ते तुम्हाला थेट मंत्री मंडळात घेऊन सहा महिन्यात विधान परिषदेवर घेऊन तुम्हाला सत्ता धारी बनवू शकतात , बाकी मर्जी तुमची ,,,,,!
जय भीम ,, जय शिवराय ,, जय अहिल्या देवी ,,,,!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!