देशदेश-विदेशधमचक्र प्रवर्तन दिन विषेशांकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
तथागत बुद्धाने काय स्वीकारले…
- माणसाचे मन हे प्रचंड शक्तिमान आहे.
2 . मनाची शुध्दता व अशुद्धता हिच सुख दुःखाचे मुख्य कारण आहे.
- मनावर जसे संस्कार करावे तसे होऊ शकतात (चांगले/ वाईट)
- मनाला मेडिटेशन(ध्यान) द्वारा निर्मळ , नितळ व शुद्ध बनवले जाऊ शकते.
- व्यक्तीच्या सुख दुःखाला तोच मुख्यता जबाबदार असतो. (इतर केवळ मार्गदर्शक असू शकतात.)
- व्यक्तीला या जन्मातच दुःख मुक्त होता येते.
- जगात कारणाशिवाय काहीच घडत नाही.
- जसे कारण तसाच परिणाम होतो.
- विकारयुक्त मनच शारीरिक मानसिक दुःख निर्माण करते.
- मनाची शुद्धता, निर्मलता हा बुद्ध धम्माचा मूळ केंद्रबिंदू आहे.(कारण त्यातच सुख दडले आहे).
- विश्वात सर्व काही अनित्य आहे, परिवर्तनशील आहे.
- मूर्खापासून संगत करण्यापेक्षा एकटे राहावे.
- क्रोध हा अग्नी आहे, तो मनुष्यमात्राला जाळतो.
- वैराने वैर कधीच मिटत होत नाही ते अवैरानेच मिटते.
- अष्टांगिक मार्गाने जगणे हाच बुद्धाचा श्रेष्ठ धम्म आहे.
- अरहंत पद, संबोधी, बुद्धत्व, निब्बान मानवी जीवनातील सर्व श्रेष्ठ अवस्था आहेत.
- बुद्ध धम्म हा नैसर्गिक सत्यावर आधारलेला एकमेव धम्म आहे.
- कोणतीही गोष्ट जर विचार, तर्क व विवेकाच्या कसोटीवर सिद्ध होत नसेल तर ती स्वीकारू नये.
- आळस, अनैतिकता, दूराचार, द्वेष, अहंकार, घृणा, तिरस्कार, आसक्ती, लोभ हेच व्यक्तिच्या सर्वनाशाला कारण ठरतात.
20.मनातिल विकार (मी व माझे प्रती आसक्ती, क्रोध द्वेष, इर्षा, अहंकार) नष्ट केल्यास आपण सर्व श्रेष्ठ सुख प्राप्त करु शकतो.
!! भवतु सब्ब मंगलम् !!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत