महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ
ज्ञानेश महाराव झाले , शाम मानव झाले आता पुढे कोण ?
प्राजक्ता_पाटील
ज्यांच्याकडे शून्य विचार आहेत.गाय ,गोमुत्र आणि शेण याच्या पलीकडे यांचा विचार जायला तयार नाही .असे लोक हल्ले करत आहेत .
याचं लोकांनी
1.बिल्कीस बानोच्या बलात्कारी आणि तिच्या कुटुंबाचे मारेकरी असलेल्यांचा संस्कारी ब्राम्हण म्हणून सत्कार केला .
2.याचं लोकांनी गौरी लंकेशचे संशयित हत्यारे जामिनावर सुटल्यावर सत्कार केला .
- बलात्कारी राम रहीम ,आसाराम यांच्याबाबत यांची आस्था बघा त्यांना वारंवार पॅरोलवर सोडले जाते. स्वतःच्या बायकोच्या हत्येचा आरोप ज्यांच्यावर आहे ते सद्गुरू यांचेच.लोकांना पतंजलीच्या नादी लावून विदेशात ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेणारा रामदेव बाबा यांचाच
- आसिफा नावाच्या 8 वर्षाच्या मुलीचा बलात्कार मंदिरात करणाऱ्या आणि तिची हत्या करणारची बाजू घेण्यासाठी मोर्चा काढला .
5.याचं लोकांनी मणिपूरच्या स्त्रियांची धिंड निघत असताना . सगळा देश हळहळत असताना .सोनू किन्नरच्या आंदोलनाचा व्हिडिओ टाकून या भगिनींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला .
6.कुकी समाजावर अत्याचार होत असताना कधीही बातम्या न देणारा यांचा मीडिया बांगलादेशमध्ये हिंदूना कसा त्रास होत आहे या बातम्या देवून देशातील नागरिकांना भडकवत होते.
7.हेच आहेत जे तुम्हाला भडकवून, तुमच्या मुलांना भडकवून रस्त्यावर उतरायला लावतात मात्र स्वतःची मुलं अमेरिका, युरोपला शिक्षणासाठी आणि स्थायिक होण्यासाठी पाठवतात.
8.हे मेले तरी यांची मुलं परदेशातून येत माहीत .पण हे म्हातारा म्हातारी तरी सुद्धा इकडून भारतीय संस्कृती आणि धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि तो टिकवण्या साठी तुम्ही कसे बलिदान दिले पाहिजे याचे मेसेज ,पोस्ट फिरवत अतात .
9.अमेरिका ,युरोप मधून यांच्या लेकी ,सूना शॉर्ट्स घालून 12 महिने फिरणार आणि एक दिवस सणाला साडी घालून आम्ही संस्कृती जपतो हे दाखवणार आणि तुम्ही भुलणार . आई,बाप मेले तर न येणारे .तिकडून फंडिंग करणार देशात काड्या करण्यासाठी मनुस्मृति प्रमाणे यांचा पगडा जाऊ नये म्हणून..
या लोकांचं वैशिष्ट्य असं की यांच्याकडे बिनडोक स्त्रियांचा ताफा आहे .हे त्यांना पुरुषांच्या अंगावर घालायला शस्त्रा प्रमाणे वापरत आहेत .
या मूर्ख स्त्रियांना एवढं लक्षात येईना आज जे त्यांनी शिक्षण घेतलं आहे ,आंदोलन करत आहेत ,बोलत आहेत ,मत देत आहेत तो अधिकार त्यांना संविधानाने दिला आहे .धर्माने त्यांना कोणताच अधिकार दिला नव्हता .ना संपत्ती बाळगण्याचा ,ना बोलण्याचा ,ना शिक्षणाचा . मनुवाद्यांच्या हातातील बाहुले होऊन त्यांनी हे सिद्ध केले आहे .संविधानाच्या अधिकारातून त्यांनी शिक्षण घेतले पण वर्षानुवर्ष गंजलेला मेंदू त्यांनी अजूनही वापरात आणलेला नाही .
कोणत्याही वक्त्याच्या बोलण्याचा विपर्यास करणे हे यांचं वैशिष्ट्य
भारतात आरक्षण रद्द करण्याबाबत राहुल गांधी जे म्हणाले,
“भारत जेंव्हा फेअर प्लेस (म्हणजे समानता असणारे किंवा समानते साठी योग्य असणारं ठिकाण) होईल तेंव्हा त्याचा विचार आम्ही करू शकतो .पण सध्या भारतात ती स्थिती नाही .”
काय आहे या वाक्यात भारत फेअर प्लेस व्हायला अजून100वर्ष तरी लागतील तोपर्यंत ना राहुल गांधी रहातील ना यांचा विश्र्वगुरू.
यांचे षडयंत्र ओळखा …….जागे व्हा .नाहीतर देश मध्ययुगात जाईल आणि आज तटस्थ आणि राजकारणापासून दूर असलेल्या बायकांना कळणार पण नाही आज पर्यंत तर आपण स्वतंत्र होतो , अधिकार होते आपल्याला आणि अचानक एवढी बंधनं कुठून आली.
प्राजक्ता_पाटील
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत