
लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलगी मिसा भारती चौकशीला सामोरे जाण्यासाठी आज ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. बिहारमध्ये जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची पाटण्यात सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरू आहे. ईडीच्या पाटण्यातल्या प्रादेशिक कार्यालयात ही चौकशी सुरू आहे. राजदच्या समर्थकांनी ईडी कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. २००४ ते २००९ या कालावधीत लालू प्रसाद रेल्वेमंत्री असताना हा घोटाळा झाला होता. सीबीआयनं या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणी केंद्रीय संस्थेने लालू प्रसाद यांना समन्स पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्या आधारे ईडी आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत