प्रा.श्याम मानव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न
मागील लोकसभा निवडणुकी पासून महाराष्ट्रातील बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आदरणीय श्याम मानव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधानिक मूल्यांची कशी पायमल्ली होत आहे. यावर जनतेचे सातत्याने प्रबोधन करीत आहेत. हीच बाब संविधान विरोधी लोकांना खटकलेली आहे.हेच या गोंधळ घालणा-यांच्या प्रवृत्तीतून दिसून आले आहे. श्याम मानव कोणत्याही विषयावर बोलत असताना पुराव्यासह बोलत असतात.याची जाणीव सर्व कार्यकर्त्यांना आहे.परंतु त्यांची भूमिका समजून न घेता कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी सायं.6.00 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात* मा.दशरथ मडावी यांचे भाषण सुरु असताना भाजयुमोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जो धुडगुस घातला, तो लोकशाही मूल्य व संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक प्राध्यापक श्याम मानव संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या विषयावर आयोजित व्याख्यानाच्या निमित्ताने सभागृहात उपस्थित होते. ते नेहमीप्रमाणे आपल्या शैलीमध्ये उत्तर देणार होतेच. मात्र त्यांच्या भाषणाची सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रतीक्षा न करताच संविधानावरील मुद्यांवर मडावी साहेबांना प्रश्न विचारण्यास सुरुवात करून, जो गोंधळ घातला तो अनाकलनीय आहे. वास्तविक त्यांनी याविरुद्ध स्वतंत्र कार्यक्रम घेवून याचा प्रतिवाद करणे अभिप्रेत आहे. तात्पर्य भाजयुमोची ही कृती संविधानविरोधी असल्याचे निदर्शनास येते. किंबहुना ही मंडळी लोकशाहीच्या विरोधात व संविधानाच्या विरोधात आहे. हेच त्यांनी या कृतीतून सिद्ध केलेले आहे. प्रा.श्याम मानव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणा-यांचा सर्वप्रथम जाहीर निषेध
राहिला प्रश्न संविधान कसे बदलले? याचा! तर महाराष्ट्राचा विचार करता वाढती बेरोजगारी, महागाई, मागासवर्गीय कर्मचारी यांचे पदोन्नतील आरक्षण थांबविणे, सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून समाजात विद्वेष पसरविणे इत्यादी कारणे संविधान धोक्यात आल्याचे निदर्शक आहे. म्हणूनच संविधान बचाव , महाराष्ट्र बचाव या व्याख्यानांद्वारे भारतीय समाजाला जागृत करणे भारताचे नागरिक मह्णून आमचे नैतिक कर्तव्य आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत