रेल्वेमध्ये अधिस्वीकृती धारक पत्रकारांना दिली जाणारी सवलत पूर्वीप्रमाणे चालू करा अधिस्वीकृती धारक पत्रकार संघाची मागणी
सोलापूर -आधीस्वीकृती धारक पत्रकारांना रेल्वे प्रवासात दिली जाणारी पन्नास टक्के सवलत पूर्वीप्रमाणे चालू करा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे अधिस्वीकृती धारक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल चिंचोळीकर व सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णु कारमपुरी महाराज यांनी केली आहे.
या संदर्भातले निवेदन खासदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर येथे उपाध्यक्ष विश्वनाथ व्हनकोरे कार्याध्यक्ष विजयकुमार जुंजा व शहर अध्यक्ष सुदर्शन तेलंग यांनी प्रत्यक्ष दिले. आधिस्वीकृतीधारक पत्रकारांना रेल्वे प्रवासात 50 टक्के सवलत दिली जात होती मात्र कोरोना काळापासून ही सवलत केंद्र सरकारने बंद केली आहे तरी पत्रकारांना रेल्वे प्रवासात दिली जाणारी 50% प्रवास सवलत ही पूर्वीप्रमाणे चालू करावी अशी मागणी करणारा ठराव सोलापूर येथे अधिस्वीकृती धारक पत्रकार संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आला होता. केंद्रीय पातळीवरून या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात येत असून ही खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देऊन पत्रकारांना दिली जाणारी रेल्वे प्रवासात 50 टक्के सवलत पूर्वीप्रमाणे देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन खासदार प्रणिती शिंदे यांना देण्यात आले आहे.
लवकरच याबाबतचा विषय संसदेत मांडण्यात येईल असे खासदार प्रणिती शिंदे यांनी बोलताना सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत