मी तुमचा संविधान बोलतोय…
यशवंत गायकवाड
मी तुमचा संविधान बोलतोय !
सांगा बरं मी तुम्हाला काय नाही दिले? !!
तुम्ही माझी उद्देशिका नीट नाही वाचली !
त्यात आहे ते सर्व जे जे मी तुम्हाला दिले !!
अहो मी आहे आदर्श संविधान आणि माझी आदर्श उद्देशिका !
नागरिकांना समोर ठेऊन केली आहे प्रस्ताविका !!
प्रत्येकाला सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक न्याय दिला !
प्रत्येकाला अभिव्यक्ती व विचार करण्याचा शब्द दिला !!
तुम्हाला विश्वास, उपासना आणि श्रध्दा यांची स्वातंत्र्यता दिली उत्तम दर्जाची व संधीची समानता दिली !!
प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जपली !
आपल्या राष्ट्राची एकता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता दिली !!
काय नाही दिले मी ते स्वतःला विचारा !
संविधान निर्मितीसाठी किती कष्ट घेतले ते जाणकारांना विचारा !!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मेहनत माझ्यासाठी खूप झाली होती !
संविधान स्वतंत्र देशासाठी बाबासाहेबांनी जिद्द केली होती !!
दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसांने साकारले संविधान !
झाले पुरते यथायोग्य आदर्श संविधान !!
अहो मी भारतीय संविधान बोलतोय !
संविधानात एकूण तिनशे पंच्याण्णव अनुच्छेद दिले म्हणतोय !!
छानपैकी देशाचे नाव मी भारत ठेवले !
कारण इतिहास साक्षी आहे म्हणून ते आवडले !!
पहा बरं मी तुम्हाला समनतेचा हक्क दिला !
स्वातंत्र्याचा हक्क दिला शिक्षणाचा अधिकार दिला !!
इतकेच काय शोषणाविरुद्ध लढण्याचा अधिकार दिला !
धर्म स्वातंत्र्याचा हक्क दिला !!
अल्पसंख्यांकाचे हित जपले, संरक्षण दिले !
धर्म जात, लिंग, वंश किंवा जन्मस्थान यांना भेदभाव करण्यास मनाईचे आदेश दिले !!
सर्व नागरिकांना नोकरीधंद्यामध्ये समान संधी दिली !
कुठेही बोलण्याची, भाषण करण्याची बहुमोल संधी माझ्यामुळे मिळाली !!
लोकांनी लोकांसाठी चालवण्यासाठी लोकशाही दिली, संसदीय प्रणाली दिली !
लोकसभा, विधानसभा दिली !!
राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रीमंडळ दिले !
कायदे मंडळ न्याय मंडळ दिले !!
स्थानिक लोकांसाठी पंचायती आणि नगरपालिका दिल्या !
कारभार कसा चालवायचा त्याच्या सूचनाही दिल्या !!
शेती आणि पाण्याचे नियोजनाची दिशाही दिली !
एवढेच काय राज्यांनी केंद्रानी महसूल कसा वाढवावा, याची रुपरेषाही दिली !!
केंद्राची सत्ता, राज्यांची सत्ता कशी भोगावी याची शिस्त आखून दिली !
व्यापार उद्योग कसे वाढवावे याची वाटही दाखवली !!
राज्य व केंद्राची सत्ता एक हाती राहू नये म्हणुन निवडणूक आयोग नेमला !
निवडणूक आयोगाने दर पाच वर्षाने निवडणुका घ्याव्यात असा नियम केला !!
संधीच्या समानतेसाठी आरक्षणाची तरतूद केली !
त्यामुळे अनु जाती जमाती शासनकर्ती जमात झाली !!
महिला जेष्ठ नागरिकांना भरभरून मी दिले !
म्हणून तर सारेजण प्रगतीत आले !!
मी संविधान तुम्हाला सुचवतो मला तुम्ही जाणून घ्या!
नेमके काय आहे माझ्याकडे ते समजून घ्या!!
मला आदर्श का मानतात ते कधी समजेल तुम्हाला?
वाचाल तर नक्की जयजयकार कराल, आनंद होईल माझ्या मनाला !!
जय संविधान जय भारत देशा
नमन करतो वंदन करतो माझ्या देशा
यशवंत गायकवाड
सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारीमी तुमचा संविधान बोलतोय…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत