धमचक्र प्रवर्तन दिन विषेशांकनागपूरमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

दीक्षा भूमीवर शाक्य संघ, महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची मानवंदना

निमित्त धम्मचक्र परिवर्तन दिनाचं !

सोलापूर : शाक्य संघ सामाजिक बहुउद्देशिय संस्था सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी (पेन्शनर्स संघटना) व शाक्य महिला बिग्रेड सोलापूर, नागपूर, नांदेड, लातूर, अमरावती, वाशिम, बुलढाणा, अहमदनगर, परभणी या जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, अधिकारी विशेष ड्रेस कोडमध्ये पथसंचलन करुन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ऐतिहासीक दीक्षा भूमीवर बिगूल वाजवून जय भिमचा नारा देत सुमारे 500 सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली.

तसेच दीक्षा भूमीवर “शाक्य संघ महाराष्ट्र दीक्षा भूमी नागपूर स्मरणिका ” सन 2024 चे प्रकाशन भदंत आर्य नागार्जुन (अध्यक्ष – सुरई ससाई दीक्षा भूमी स्मारक) यांच्या हस्ते या स्मरणिकेचे प्रकाशन लाखो बौध्द, उपासक व उपासिका यांच्या साक्षीने दीक्षा भूमीवर करण्यात आले.

तसेच सामाजिक कार्याबद्दल शाक्य संघ दीक्षा भूमी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी सामाजिक संघटना नागपूर यांचेकडून सामाजिक कार्य चांगले केल्याबद्दल सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ट्रॉफी प्रमाणपत्र व पंचशील उपरणे देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आयु.भदंत आर्य नागार्जुन, (सुरई ससाई दीक्षा भूमी स्मारक अध्यक्ष व भिक्कु संघ), आयु. राजरत्न बनसोड (सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक, नागपूर), धर्मेश प्रसेनजित (सेवानिवृत्त तहसिलदार), पी.आय. नगराळे (नागपूर शहर), सुरेश बोधी (सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक), रत्नाकर मेश्राम, अशोककुमार दिलपाक, राजेंद्र हजारे, यलदास वामने (सर्व सोलापूर), शाहूराज कांबळे, शिवाजी कांबळे (सर्व लातूर), विजयकुमार उजेडकर, उत्तम हणमंते (सर्व नांदेड), महाळू पांचारणे (अहमदनगर), रविंद्र नरवाडे (बुलढाणा), दिलीप नरवाडे (वाशिम), उदय रंगारी, दिंगबर इंगळे, नागसेन वरगट (सर्व अमरावती), सुनिता दिलपाक, जिजा वामने, वैशाली हजारे, (शाक्य संघ, महिला बिग्रेड, सोलापूर), छाया शिरसाट, सुनंदा वानखेडे, वैशाली गेडाम, अनिता शिरसाट (शाक्य संघ, महिला बिग्रेड, नागपूर) बहूसंख्य बौध्द उपासक व उपासिका हजर होत्या.

सामाजिक कार्याबद्दल यांचा झाला सत्कार !
राजरत्न बनसोड (शाक्य संघ, दीक्षा भूमी नागपूर), अशोककुमार नामदेव दिलपाक (शाक्य संघ, सोलापूर),
सुरेश बोधी (शाक्य संघ, दीक्षा भूमी नागपूर), विजयकुमार उजेडकर (शाक्य संघ, सुभेदार रामजी आंबेडकर, नांदेड),
शाहूराज कांबळे, (शाक्य संघ, माता भिमाई, लातूर)

“”””””””

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!