14 ऑक्टोबर 1956 ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवे मन्वंतर घडविले दत्ता गायकवाड
अशोक विजयादशमी धर्मांतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या भूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. हजारो वर्षे गुलामीत जगणाऱ्या अस्पृश्यांना समतेची वाट दाखवली एक नवे मन्वंतर घडले बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धाचा धर्म स्वीकारला यात त्यांचे भारतीयत्व उजळून निघाले त्या राष्ट्राच्या संस्कृतीची मोडतोड होणार नाही उलट संस्कृतीला अर्थपूर्णता यावी हा दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी बुद्धाच्या बुद्धिप्रधान धर्माची निवड केली. कर्मठ परंपरा वाद्यांनी त्यांचा आणि दलित समाजाचा पदोपदी छळ केलेला होता. अवहेलना केली होती त्या सर्व प्रसंगात बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वाणीने आणि लेखणीने विषमता व जातीव्यवस्था यांच्यावर सतत हल्ले केले
भारत देशाचे वर्णन विषमतेचे माहेरघर असे बाबासाहेब म्हणत भारत देशात एक दुसरा बहिष्कृत भारत नांदतो आहे माणसासारखी माणसे गावकुसाबाहेर पशुपातळीवरचे जीवन जगतात आणि ते पिण्याच्या पाण्यालाही महाग होतात त्यांना विकासासाठी नव्हे तर जगण्याची संधी या समाज व्यवस्थेत मिळत नाही
हजारो वर्षे जातीय अहंकार येथे पोहोचले गेले आहेत 1935 साली त्यांनी येवले मुक्कामी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती 1956 साली विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेताना ते म्हणाले मी यापुढे मनुष्य जातीमध्ये समानतेचा प्रसार करण्यासाठी आयुष्य व्यतीत करेल हिंदू धर्माचा यांच्या चालीरीतीचा त्यांच्या परंपरांचा धिक्कार करून मी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे मी आज जुन्या धर्माचा त्याग करून पुन्हा नवा जन्म घेत आहे बाबासाहेब आपले अनुयायाना संबोधित करताना म्हटले होते तुम्ही जुन्या परंपरा देव देवसकी यांचा त्याग केला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला 22 प्रतिज्ञा देत आहे त्याचा तुम्ही अंगीकार केला पाहिजे बौद्ध धर्मातील पंचशीलेचा अनुकरण केले पाहिजे त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुखी समाधनी बनेल.
दत्ता गायकवाड
सोलापूर
7588266710
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत