प्रबुद्ध साठे त्यागमय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित आंबेडकरवाद माझ्या जीवनाचा सिद्धांत, ध्यास व श्वास :– प्रबुद्ध साठे

पुणे (खराडी) :- बौद्ध धम्माचे पुर्ण वेळ कार्य करीत असताना स्वतः साठी जगणे हे कधी कळलेच नाही, त्याग, इमान व चारित्र्य हीच माझी ताकद असून आंबेडकरवाद माझ्या जीवनाचा सिद्धांत, ध्यास व श्वास आहे असे प्रतिपादन चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियान प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले, ते पुणे येथील सारनाथ बुद्ध विहार कमिटी खराडी च्या वतीने आयोजित धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्यागमय जीवनगौरव पुरस्काराने प्रबुद्ध साठे यांना सन्मानित करण्यात आले, त्यानिमित्त सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते,, हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा असून प्रेरणा व जबाबदारीची जाणीव सुद्धा आहे यातून सारा महाराष्ट्र बौद्धमय केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही व मरणार नाही, अशी शपथ घेवून, माझ्या सारख्या बौद्ध धम्माच्या माणुसकीच्या चांगुलपणाचा उजेड वाटत फिरणाऱ्या माणसाला आपण त्यागमय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले याबद्दल सर्व संयोजक व कमिटीचा मी ऋणी आहे असे ही प्रबुद्ध साठे यांनी म्हटले, याप्रसंगी नितेश गायसमुद्रे, दिपक मोहिते, मधूकर मोकळे, बाळासाहेब जाधव, पंडित जाधव, देवेंद्र दिपके, राजू निकाडे, भास्कर भगत, नवनाथ कुचेकर, संदीप कांबळे, राजेश कांबळे, सोमा भोसले, आनंद शेलार, हेमंत गोफने, मोहन चक्रे, रूपेश लोखंडे, मनिष मोरे, चैतन्य कसबे आदी मान्यवर तसेच भन्तेजी सुमंगल उपस्थित होते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत