समता स्वातंत्र्य न्याय बंधुता व मानवतेच्या जन कल्याणासाठी बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली
पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे
नळदुर्ग येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते परिवर्तनवादी विचारातून घडतात आणि त्यांना खुप मोठी प्रेरणा मिळते . कारण शैक्षणिक , राजकीय, सांस्कृतिक सामाजिक आणि संस्कारासाठी धार्मिक प्रेरणा महत्वाची आसते म्हणून तथागताचा धम्म हा मानवी कल्याणाचा खुप मोठा खजाना आहे समता स्वातंत्र्य न्याय व बंधुता आणि त्यांची निती नवमुल्यदृष्टी निर्माण करणारी धम्मक्रांती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विजया दशमीच्या दिनी घडवुन आणली बौद्ध धम्म हा कल्याणाचा मार्ग सांगतो तो धम्म संस्कारक्षम पिढी निर्माण करणारा आहे तो अचरणात आनावा आसे परखड मत नळदुर्ग ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी केले
नळदुर्ग डॉ आंबेडकर नगर मध्ये
धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला त्यावेळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी केले या नंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे व त्यांच्या पत्नी शितलताई गजेंद्र सरोदे यांचा सत्कार बौद्धाचार्य तथा पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केले
यावेळी शितलताई गजेंद्र सरोदे पार्वती वाघमारे , मनिषा कांबळे , सांची बनसोडे , पुजा बनसोडे , रोहीणी बनसोडे , सुजाता कांबळे , यशोदा बनसोडे
गोपाबाई कांबळे , शिलाबाई वाघमारे , नानिमॉ कांबळे , शिताबाई चिमणे ,
आदिजन उपस्थित होते . प्रथमता पाहुण्यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पुजन करण्यात आले . बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी निलेश बनसोडे , प्रशिक बनसोडे , कार्तिक बनसोडे , साहील बनसोडे , अतिश वाघमारे , प्रजित सुरवसे ,
प्रबुद्धपाल बनसोडे , ओम गायकवाड , महेश गायकवाड
अमर कांबळे , अतिश बनसोडे
अतिश कांबळे , नामदेव बनसोडे
ओमप्रकाश बनसोडे , सुभाष कांबळे , विद्यासागर कांबळे आदिजन उपस्थित होते
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार दादासाहेब बनसोडे यांनी मानले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत