इव्हिएम ला पर्याय आहे
शिवराम पाटील
ईव्हिएम ला पर्याय आहे, बैलट पेपर.सरकारी इलेक्शन ला पर्याय आहे, पब्लिक इलेक्शन .असे पर्याय देणे ,प्रती इलेक्शन करणे आवश्यक आहे.
हरियाणा आणि तत्सम अनेक ठिकाणी इव्हिएम संशयास्पद ठरले आहे.प्रधानमंत्री, राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश, निवडणूक आयुक्त हे याची दखल घेत नाहीत.कारण सत्ता माणसाला बधीर बनवते.रावण काका आणि कंस मामा बधीर बनला होता.जनरल डायर बधीर बनला होता.आता पुतीन बधीर बनला आहे.भारतात मोदी बधीर बनले आहेत.
जेंव्हा सत्ताधारी माजावर येतो तेंव्हा तेंव्हा पब्लिक त्याचा माज उतरवू शकते.जसा इटलीत मुसोलिनीचा उतरवला होता.जसा इरकामधे सद्दाम हुसेनचा उतरवला होता.त्यासाठी पब्लिक त्या मानसिक स्थितीला आली पाहिजे.चूक खटकणे ही पहिली अवस्था.विचार करणे दुसरी अवस्था.पर्याय शोधणे तिसरी अवस्था.कृती करणे चौथी अवस्था.
हरियातात जे अनपेक्षित घडले, चुकीचे घडले अशी ज्यांची बौद्धिक, तांत्रिक खात्री झाली आहे त्यांनी विरोध करण्याची मानसिक तयारी बनवली पाहिजे.फक्त रडून, ओरडून ही हेराफेरी ,जादुगिरी,जगलरी थांबणार नाही.
जे हरियाणात झाले ते इलेक्शन कमीशन चे काम.
आता पब्लिक इलेक्शन घेतले पाहिजे.
जर ईव्हिएम चूक असेल, अमान्य असेल तर पर्याय शोधला पाहिजे.मी शोधला.जसा महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील नाना पाटील यांनी प्रती सरकार बनवले होते.जर ते स्पृहणीय होते तर त्याची पुनरावृत्ती करता येऊ शकते.आमचा सरकारी इलेक्शन कमीशन वर विश्वास नाही.ते पगार घेऊन काम करणारे नोकर आहेत.त्यांची मानसिकता नोकराची आहे.गुलामीची आहे.म्हणून ते प्रधानमंत्री चे हातचे बाहुले आहे.ते देशप्रेमी नाहीत, देशभक्त नाहीत.जर असते तर त्यांनी इव्हिएम नाकारले असते.कारण इव्हिएम जनतेला नको आहे.जी जनता सरकार निवडून देते.जनतेला जर संशय असेल, अमान्य करीत असेल,नाकारत असेल तर इलेक्शन कमीश्नर ने ते नाकारले पाहिजे.पण दुर्भाग्य!असे होत नाही.कारण इलेक्शन कमीश्नर एक पेड सर्व्हंट आहे.पगार आणि पैसा हेच त्यांच्या जिवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे.असा माणूस देशाला घातक असतो.
यावर मी पर्याय सुचवतो, कांग्रेस ने पब्लिक इलेक्शन घेतले पाहिजे.
ज्यात..
१) मतपत्रिकेत नावे हिच आणि हाच क्रम ,हेच चिन्ह राहिल.जे अधिकृत होते.
२) खाजगी जागेत बुथ लावले जातील.
३)भाषण ,बैनर, प्रचार न करता मतदारांना आमंत्रित केले जाईल.
४)मतदान मोजणी कांग्रेस, भाजप व्यतिरिक्त इतर सर्व पक्षांचे सभ्य सदस्य करतील.त्यात सरकारी नोकर असणार नाहीत.
५)याचा निकाल राज्य,देश, जागतिक स्तरावर केला जाईल
६)आम जनतेला अवगत केले जाईल,हे बघा इव्हिएम चे मतसंकलन,आणि हे मतपत्रिके चे मतसंकलन.
७)याचा परिणाम नक्कीच इव्हिएम जादूगार वर होईल.
भारतात लोकशाही आहे.मोदी लोकांची सुचना, विनंती, आग्रह मानत नसतील तर त्यांना लोकशाही मान्य नसावी.त्यासाठी जनता जागृत,सक्षम,समर्थ, कृतीशील झाली पाहिजे.भारत इंग्रजांनी जिंकला होता, तरीही महात्मा गांधी त्यांना “चले जाव” म्हणाले होते.असे करायला हिंमत लागते.तन मनाची तयारी लागते.ती झाली कि मग लोक नाना पाटील ची भुमिका घेतील.हे आमचे प्रती सरकार.हे आमचे पब्लिक गव्हर्नमेंट.
कंगना राणावत ने झाशीची राणीची भुमिका सिनेमात केली.का आवडली?राणीने झांशी पडल्यावर ग्वाल्हेर कब्जात घेतले.तुम्हाला तर फक्त किरदार आवडला.खासदार बनवले.तर खरी राणी का आवडत नाही? राणीचा पराक्रम का आवडत नाही?आवडत असेल तर तुम्हाला राणीचे अनुकरण करावे लागेल.आता कंगना राणावत ने झांशीच्या राणीचे अनुकरण केले पाहिजे.बोलले पाहिजे ” ये झुठा ईव्हिएम नहीं चलेगा.मोदी,मैं मेरा समर्थन आपको नहीं दुंगी .हम हरियाणा के क्षत्रप है.आपकी मनमानी नहीं चलेगी.”
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत