धमचक्र प्रवर्तन दिन विषेशांकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

धम्मक्रांतीने पोटजातीपार संपविल्या !

प्रा रणजित मेश्राम लेखक प्रसिद्ध विचारवंत अभ्यास क आहेत

           

       वर्तमानपत्रात समाजभवन भूमिपूजनाची सचित्र पानभर जाहिरात वाचली.  तीत वेगवेगळ्या आकर्षक भवनासह 'खैरे कुणबी समाज भवन' व 'तिरळे कुणबी समाज भवन' हे वाचले. तिथे नजर थांबली. एकाच कुणबी समाजात असे वेगळेपण ? तेही जाहिरात करुन ? शिवाय शासकीय अधिकृतता ! 

यासंदर्भात मित्रवर नागेश चौधरी व ज्ञानेश्वर रक्षक यांना सहज विचारले. ते साडेबारा पोटजाती व खूपकाही सांगते झाले.

       हे ऐकून 'ते' दिवस आठवले. एकदम दचकावे असे झाले. असेच टोकाचे वेगळेपण आजच्या बौध्दातही होते. ६८ वर्षांपूर्वी महारातून जे बौद्ध झाले त्यांचेविषयी बोलतोय. आठवून थरार आला. तशाच पोटजाती होत्या. आता उल्लेख करायलाही संकोच होतो. कडक .. कट्टर. उगाचचा अभिमान बाळगून ! राजकारणातही ते वेगळेपण आले होते. विवाह संस्थेतही झिरपले होते. बरेच कट्टर झाले होते.

       आज .. प्रामाणिकपणे सांगतोय .. ते वेगळेपण शोधायला शोधून दिसत नाही. पार विस्मरणात गेले. अवशेषही नाहीत. आडनावे हयात असली तरी ती भयंकर बाब पार संपली. मनोरचनाच तशी झाली. सहज .. नैसर्गिकपणे हे घडत गेले. आजच्या पिढीला तर कालचे काहीच ठाऊक नाही. अनुल्लेखात कायम मुठमाती देण्यात आली. सारे आंबेडकरी वा बौध्द .. एकमेव ओळख शिलालेखित झाली.

एखादे भुक्कड अपवाद असेल तर त्याला तेव्हढे महत्व नाही.

हे एका धम्मक्रांतीने झाले. सोबत आलेल्या मन:क्रांतीने केले. हे विशेष !

       हा बदल एका दालनातून निघून दुसऱ्या दालनात प्रवेशित झालो एव्हढाच मर्यादित नाही. तो वैचारिक बदल आहे. जगण्याचा आमुलाग्र बदल आहे. जीवनाकडे .. जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन आहे. तो पूढे पाहतो. पुढचे पाहतो. कालच्या स्वरात रमत नाही. त्याला कळते .. कळायला लागते हे महत्त्वाचे ! ईश्वरीय, अपौरुषेय, अज्ञात असे काही नसते. कालच्या गुणगाणीत किती रमायचे ? उद्याच्या निर्मितीत गुंतावे ! 

धम्मस्वीकाराने असे अनेक हितावह घडले. घडत राहील. त्या अनेक हितावहतेतील जात .. पोटजात जाणे हेही एक आहे !

० रणजित मेश्राम

👤

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!