आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

आटपाडी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करावी

सुहास बाबर यांचे ना. गडकरी यांच्याकडे मागणी

कवठेमहंकाळ – शेटफळे – दिघंची – म्हसवड -फलटण राष्ट्रीय महामार्गाची मागणी

आटपाडी-प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातून महत्त्वाचा मानला जाईल असा कवठेमहंकाळ – शेटफळे – दिघंची – म्हसवड -फलटण हा राष्ट्रीय महामार्ग करावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सुहास बाबर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे आज केली.
ना. गडकरी यांना बाबर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की माझ्या मतदारसंघातील आटपाडी तालुक्यातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही. आटपाडी तालुक्यातील लोकांची पुणे-मुंबई येथे व्यवसायानिमित्त वारंवार ये-जा होत असते. तसेच सिमावर्ती भाग कवठेमहांकाळ, जत व आटपाडी तालुक्यातील नागरिकांना पुणे-मुंबई येथे जाणेसाठी सोईचा व जवळचा मार्ग म्हणून कवठेमहंकाळ – शेटफळे आटपाडी दिंघची म्हसवड फलटण हा आहे. सदर रस्ता हा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत खराब झालेला आहे. आटपाडी तालुक्यातील व परिसरातील नागरिकांनी कवठेमहांकाळ-आटपाडी-म्हसवड-फलटण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग करण्याची मागणी केलेली आहे. सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग झालेस वाहतुकीच्या दृष्टीने सोपे होणार आहे.आटपाडी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या कवठेमहंकाळ शेटफळे – आटपाडी – दिघंची म्हसवड फलटण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग व्हावा असेही बाबर यांनी दिलेल्या पत्रात नमूद आहे
आटपाडी तालुका संपूर्ण महाराष्ट्रात एक आगळावेगळा तालुका म्हणून ओळखला जातो दुष्काळी असला तरी हा तालुका सांस्कृतिक, क्रीडा, डाळिंब बागा अशा वैविध्यपूर्ण गोष्टींसाठी ओळखला जाते परंतु हा असा तालुका आहे या तालुक्यातून अद्याप एकही राष्ट्रीय महामार्ग गेलेला नाही. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी या तालुक्यात आले आहे. नुकत्याच या योजनेत वंचित राहणाऱ्या गावांचा समावेश होऊन टेंभूच्या सहाव्या टप्प्याचे ही काम सुरू झाले आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्याबाबतीत हा तालुका आता स्वयंपूर्ण बनला आहे. भविष्यात दळणवळणाच्या दृष्टिकोनातून तसेच व्यापार उदीम वाढवण्याच्या उद्देशाने या तालुक्यातून लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करावी अशीही मागणी बाबर यांनी या पत्राद्वारे ना. गडकरी यांच्याकडे केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!