निवडणूक रणसंग्राम 2024भारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय
“हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धडा”…
धनराज मोहोड
"मैं बाबाके बच्चोके वगैरे देश चलने नहीं दुॅंगा..." हे वाक्य आहे मान्यवर कांशीराम यांचे आहे...हे आता भारतीय राजकारणात तंतोतंत खरे ठरत आहे...जर लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर, बहनजी मायावती यांना सन्मानाने सामावून घेतले असते तर भारतभर यांचा फायदा कांग्रेसला झाला असता ह्या दोन्ही नेत्यांनी भारतभर प्रचार करत लाट निर्माण केली असती व आता राहुल गांधी प्रधानमंत्री असते...पण ह्या दोन्ही नेत्यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवले व वरून "बिटिम" म्हणून हिणवत कांग्रेस आघाडीने ह्या दोन्ही नेत्यांच्या विरोधात अतिशय जहरी अपप्रचार केला. याचा फटका काँग्रेस आघाडीला लोकसभेत बसला..
नुकत्याच झालेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत बिजेपीला पुन्हा एकदा बहुमत मिळाले...व जिंकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा राहुल गांधी व कांग्रेसच्या अति आत्मविश्वासाने हात चोळत बसावे लागले... २०२४ लोकसभेत ज्याप्रमाणे कोणतेही आंदोलन व मोर्चा न करताच फक्त "संविधान धोक्यात आले आहे ते वाचवायचे आहे" अशी बोंब ठोकत दिशाभूल करत जनतेची फुकटची मते मिळवली त्याप्रमाणेच आता भारतभर हाच पॅटर्न वापरून आपल्याला जनतेची दिशाभूल करत फुकटची मते मिळतील अशी कांग्रेस व राहुल गांधी तसेच त्यांच्या सल्लागारांची धारणा होती...ती हरयाणा निकालाने फोल ठरली आहे...
१७-१८ टक्के लोकसंख्या असलेल्या दलित समाजाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या राजकीय पक्षांना जोपर्यंत कांग्रेस आघाडी सन्मानाने सामावून घेऊन प्रतिनिधीत्व देणार नाही तोपर्यंत कांग्रेस आघाडी सत्तेपासून वंचित राहणार आहे.... वास्तविक कांग्रेसने हरयाणा मध्ये बिएसपी किंवा आप पक्षांसोबत समन्वय ठेवून युती करायला पाहिजे होती...पण राहुल गांधी व कंपुचा अति आत्मविश्वास नडला...
मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असलेल्या "कुमारी शैलजा" ह्या दलित नेतृत्वाला "चमारन" म्हणन्यापर्यंत वरीष्ठ कांग्रेस नेता हुडा समर्थकांची मजल गेलेली ह्याचासुध्दा नकारात्मक संदेश हरयाणा मधील दलित मतदारांपर्यंत गेला त्यामुळे सुध्दा कांग्रेसला हरयाणा मध्ये फटका बसलेला...
"सुप्रीम कोर्टाने दिलेल्या एससी एसटी आरक्षणाच्या वर्गीकरण व क्रिमी लेयर बाबतच्या दिलेल्या निकालाचे कांग्रेसने स्वागत व समर्थन केले होते" त्यामुळे सुध्दा आंबेडकरी विचारांचे मतदारांनी कांग्रेसला नाकारले कारण लोकसभा निवडणुकीत ह्या मतदारांनी कांग्रेसला भरभरून मते दिली होती आता मात्र ह्या मतदारांचा कांग्रेसने भ्रमनिरास केला..
बहुजन समाज पक्षाच्या नावाने आता काही दिवस कांग्रेसचा रोनाधोना सुरू होईल.... बिजेपी व कांग्रेस ह्या दोन्ही पक्षांमध्ये पारडे एकाच बाजूने झुकले दिसत नाही...त्यामुळे "बिएसपीने सत्ता समतोल साधला" असे मानायला वाव आहे... तसेच बिएसपीने आपला पुर्वीचा जनाधार मिळवण्यासाठी कंबर कसली दिसून येत आहे...बिएसपीचा एक उमेदवार निवडून आला आहे..
कांग्रेसने आपल्या समर्थकांना समजुन सांगितले पाहिजे.... जेवढे "बहुजन समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडी ह्या आंबेडकरी विचारांचे राजकीय पक्षांना" हिणवले जाईल तेवढा नकारात्मक संदेश आंबेडकरी समाजातील लोकांना जाऊन यांचा फटका काँग्रेस व त्यांच्या आघाडीला भविष्यात सुध्दा बसणार आहे......
धनराज मोहोड नवी मुंबई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत