९ ऑक्टोबर बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम साहेब स्मृतिदिन
जन्म – १५ मार्च १९३४ (रुपनगर,पंजाब)
स्मृती – ९ ऑक्टोबर २००६ (नवी दिल्ली)
बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांनी आपल्या कर्तृत्वानं राजकारणात एक वेगळी छाप टाकली आणि देशातला तिसरा सर्वात मोठा राजकीय पक्ष स्थापन केला. कांशीराम हे पुणे येथील डीआरडीओ येथे नोकरी करीत होते. १९७८ मध्ये त्यांनी ‘बामसेफ’, तर १९८१ मध्ये ‘डीएस फोर’ या संघटना बांधल्या. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक कर्मचाऱ्यांच्या हक्काकरिता लढणे, हा या संघटनांचा मूळ हेतू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कांशीराम यांचं प्रेरणास्थान. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या बाबासाहेबांनी दिलेल्या त्रिसुत्रीचा आधार घेत त्यांनी राजकारण केलं आणि देशाच्या राजकारणात प्रस्थापित राजकीय पक्षांना जोरदार धक्का दिला. सर्वांना त्याची दखल घ्यावी लागली.
‘राजकीय सत्ता ही तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आहे” हा बाबासाहेबांचा विचार त्यांनी आत्मसात केला होता. त्यांच्या प्रत्येक सभेत ते हे वाक्य वारंवार सांगत असतं. त्यामुळच मायावती या आपलं सर्व शिक्षण आणि IAS चं स्वप्न सोडून राजकारणात आल्या. कांशीराम यांनी स्थपन केलेल्या बामसेफच्या (BAMCEF) माध्यमातून ठरवलेलं उद्दीष्ट पूर्ण करणं शक्य नव्हतं. मायावतींनी बामसेफचा उत्तरप्रदेशात विस्तार करण्याचं मोठं काम केलं. कांशीराम हे पंजाबचे होते तरीही मायावती मुळे त्यांचा जम उत्तर प्रदेशात बसला.
उत्तर भारतात कॉंग्रेस मध्ये बाबू जगजीवनराम हे दलित समाजाचे महत्त्वाचे नेते होते. तेव्हा दलित समाज कॉंग्रेसला एकगठ्ठा मते देत असे. मात्र हळूहळू या समाजाचा भ्रमनिरास होण्यास सुरवात झाली. याच्या आसपास उत्तर भारतात कांशीराम यांचे नेतृत्व उदयास येत होते. त्यांनी १९८४ मध्ये ‘बहुजन समाज पक्ष’ स्थापन करून दलितांना स्वतःचा पक्ष मिळवून दिला. या पक्षाने बघता बघता दलित समाजाचा विश्वास मिळविला. तेव्हा पासून दलित समाज कॉंग्रेस पासून कायमचा दूर गेला.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत