डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी खिन्न आणी उदास राहून रडत होते का ?….
पहिले कारण –
ज्यांच्या हितार्थ डॉ,बाबासाहेब आंबेडकरांनी जीवन वेचले आहे. त्यांच्यात त्यांनी तूम्ही कर्तबगार कसे बनाल ह्यासाठी अतोनात प्रयत्न केले. व तळागाळातील जनता ही कर्तबगार बनवी ही समाजाविषयीची चिंता त्यांना सतावत होती , बोचत होती. ही त्यांची चिंता दूर करणारी माणसे त्यांच्या हयातीत तर काय अजूनही ह्या मातीत तयार झाली नाहीत ..म्हणून ते आयुष्य भर चिंता करत होते व मनातल्या मनात रडत होते.
दुसरे कारण –
माझ्या उच्चशिक्षणामुळे मी माझ्या समाजाला कवटाळु शकलो त्यांना व त्यांना माझ्यापासून मी दूर करू शकत नाही. कारण माझे समाज बांधव हे अज्ञानी आहेत. माझ्या शिवाय माझ्या समाजाला कोणीच न्याय देऊ शकत नाही. ही त्यांना चिंता होती…. म्हणून ते आयुष्यभर मनोमन रडत होते.
तिसरे आणी फारच फारच महत्वाचे कारण –
माझ्या उच्चशिक्षणामुळे आणी बुद्धी चातुर्याच्या भरोशावर मी अनेक धर्माची पुस्तके वाचलीत, पान आनि पान चाळले आणी स्वतः अनेक खंड लिहिलेत . पण आपल्यातुन मी निघून गेल्यानंतर माझे लिखित खंड ग्रँथ रूपात कोण प्रकाशित करेल ? व माझ्या समाजापर्यत पोचवून त्यांना वाचण्याची संधी मिळेल की नाही किंवा त्यांच्यात जागृतता निर्माण होणार की नाही. ही चिंता त्यांना भेडसावत होती….. आणी म्हणून ते मनोमन रडत होते.
आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या दुरदर्शीत विचारामुळे , त्यांचे उपदेश आणी मार्गदर्शन हे तंतोतंत खरे ठरत आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना आपण समजून घ्यायचे असेल तर ही जागृतता त्यांच्याविषयी आपल्या मनात असायला पाहिजे. ही जागृतता आपल्या मनात केव्हा येईल जेव्हा आपण त्यांची लिखित पुस्तके वाचू आणि खरे मर्म समजून घेऊ तेव्हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खरी विचारप्रणाली आणी समाजाविषयी असलेली त्यांची चिंता , तळमळ ही आपणास समजून येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे बालपण , त्यानंतर संघर्षात केलेले शिक्षण , लग्नानंतर माता रमाईने तूटकां - मुटका चालविलेला संसार , चार मुलांचे मरण - दफन , माता रमाई दुर्धर आजाराने निघून जाणे ( तेव्हा डॉ. बाबासाहेब खूप ओक्साबोक्शी रडलेत ) , डॉ. बाबासाहेबांना मधुशुग्रूणीचा आणी पायाचा त्रास , स्वहितापेक्षा देशहित आणी समाजहित जपणे ह्यात भारतातील संस्कृतीला धोका न पोहोचता आपापल्या धर्माचा सगळ्यांनी अवलंब करावा टीससाठी त्यांनी भारताला सक्षम असे भारतीय संविधान दिले. आणी त्यानंतर - 14 ऑक्टोंबर 1956 रोजी त्यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समाजाचे बोट धरून तथागत बुद्धाच्या मूर्तीला वंदन करून स्वतः धम्मदिक्षा घेऊन आपल्या समाज बांधवांना बौद्ध धर्मात सामील केले. आणी शेवटी 6 डिसेंबर 1956 रोजी ते आपल्यातुन निघून गेलेत.
ते म्हणाले होते -
दुसरा माझ्या ठिकाणी असता तर त्याचा समूळ नाश झाला असता. जसे गांधीजींना महात्मा पदावर पोचवूनही त्याच लोकांनी गोळ्या घालून ठार केले ह्यावरून त्यावेळेस कीती विखारी जातीयता आणी कट्टर ब्राम्हणी विचारांचे विषारी लोकं होती याचा विचार जरी आला तर अंगावर रोमांच उभे राहतात. आणी आजही आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो आहे की , अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधील पानसरे आणी इतर , न्याय क्षेत्रातील लोहीया , खैरलांजी मधील भोतमांगे कुटुंब , मनीपूर मधील क्रूर घटना भारता तील दलित समाजावर होणारे अमानुष अत्याचार अशा कित्येक घटनाचा पडदा सामोरे येईल….
पण ब्राम्हणांच्या या असमान व जातीपातीचे विषारी विष भिनवलेल्या समाज व्यवस्थे बद्दल आपली जहाल मते भारताच्या कोपऱ्यात कोपऱ्यात जाऊन निर्भीड पणे खुले आम जरी सभेत जाहीर पणे मांडून सुद्धा अख्या भारतात कोणाची आय व्यायली नाही की डॉ,बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगाला इजा करण्यासाठी बोटाने तरी स्पर्श केला असेल इतके त्यांची विदवत्ता, नीतिमत्ता,व शील सदाचार सूर्य प्रकश्या इतके पारदर्शी तेजोमय होते.
आज कितीही त्यांच्या पुतळ्या ची व विचारांची वीटम्बना बीनडोक लोकं करीत असतील तर त्यांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो की नामर्दांनो त्यावेळेस तुमच्या बाप दादांना तरी विदवत्ता
परखण्याची अक्कल होती पण तुमच्या तर ती अक्कल पासंगा इतकीही तुमच्यात नाही.
दि. 09 ऑक्टोबर 24.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत