केंद्राचे राज्यांना निर्देश आरोग्य सज्जतेचा तातडीने आढावा; चीनमधील नव्या साथीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार सावधगीरीची उपाययोजना

करोना संकटानंतर चीनमध्ये आता लहान मुलांच्या श्वसनविकाराची साथ आली आहे. यामुळे अनेक देशांनी सावधगिरीची उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सावधगिरीचा उपाय म्हणून आरोग्यविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पसरलेली इन्फ्लूएन्झाची साथ आणि हिवाळय़ामुळे श्वसनविकारांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्वसनविकार संसर्गाच्या वाढीवर एकात्मिक रोग देखरेख प्रकल्पांचे जिल्हा आणि राज्य विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहेत की नाही याची खातरजमा करण्याची सूचनाही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे. यात लहान मुले आणि अर्भके यांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, श्वसनविकारग्रस्त रुग्णांच्या नाक आणि घशातील स्रावांचे नमुने श्वसन विकार जनुकांच्या चाचणीसाठी राज्यांमध्ये असलेल्या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत