प्रशासकीय घुशी आणि गिधाड राज्य कर्त्या नी पोखरलेली भारतीय लोकशाही व्यवस्था,,,,,!
ऍड अविनाश टी काले , अकलूज
तालुका , माळशिरस , जिल्हा सोलापूर , मो न 9960178213
भारतीय राज्य घटना प्रदान करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत त्यावर भाष्य केले होते की , कोणतीही घटना किती ही चांगली असली तरी ते राबवणारे लोक चांगले नसतील तर परिणाम ही वाईट च दिसतील ,
आणि घटना कितीही खराब असली तरी प्रामाणिक माणसे राबवणारे असतील तर त्याचे परिणाम चांगलेच दिसतील .
मी तुम्हाला “एक व्यक्ती एक मूल्य ” ही राजकीय समता दिली आहे , पण सामाजिक व आर्थिक विषमतेची दरी आहे तशीच ठेवली तर ही लोकशाही पोकळ डोलारा ठरेल ,
इमानदार राज्यकर्ते , आणि इमानदार प्रशासकीय सेवा याचे माध्यमातून राज्याने कल्याणकारी स्टेट ची भूमिका घ्यावी .
अर्थात लोकशाहीला सुवर्ण महोत्सवा कडे घेऊन जात असताना आपण या कल्याणकारी भूमिका बासनात गुंडाळून ठेवल्या , सार्वजनिक सेवा चे खाजगीकरण करून आपण हा देश सीमित भांडवलदार वर्गाच्या उत्कर्षा साठी मुक्त केला .
निवडणुका हा पैश्याचा आणि बड्या जात समूहाच्या नेत्यांच्या घराणे शाही व वारस दारात सीमित झाला .
शिक्षण , आरोग्य , वाहतूक , दूर संचार , बँकिंग , खाणी , नैसर्गिक वायू , बंदरे , विमान सेवा , क्रिकेट बोर्ड , सहकार , विमा , या सगळ्या व्यवस्था कांहीं घराण्याच्या हातात एकवटल्या , कोट्यवधी भारतीय माणूस फक्त मतदार झाला .
बेरोजगारी पाहून तो अस्वस्थ झाला , पण त्या कशातून झाल्या आहेत याचा शोध घेण्याचे प्रयास कुणी केले नाहीत ,
उपेक्षित घटकांनी एक मेकाच्या विरोधात बोट दाखवणे सुरू ठेवले , आणि संकुचित झालेल्या आरक्षण संधी साठी ही एक मेकाची डोकी फोडण्या पर्यंत ते जाऊन पोहचले ,
या सर्व लढाया एका बाजूने चालू असताना दूर राहून प्रशासनातील अधिकारी वर्ग राज्यकर्त्या वर्गाच्या मदतीने “एक मेका सहाय्य करू ,, आपण दोघे मिळून खाऊ “
या वृत्तीने बेभान आणि बेफाम होऊन व्यवस्थेला ओरबाडून खात राहिले ,
ते खाणे इतके ओंगळवाणे आहे की त्याची ही शिसारी यावी ,,,
पण निर्लज्ज होऊन ते देशाला लुटत राहिले , आणि अश्या वर्गा पुढे लाचार होऊन जनता मात्र अंध बनून त्यांच्या समोर भिकेचा कटोरा घेऊन उभी राहिली ,
वृद्ध व्यक्तींना तटपुंजे पेन्शन , महिलांना अर्धे एस टी तिकीट , लाडकी बहिण म्हणून 1500रुपये मानधन ( निवडणूक डोळ्या समोर ठेऊन ) शेतकरी आत्म् सन्मान म्हणून दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये ,,
या व अश्या अनेक योजना .
पण शिक्षणाचा मूलभूत अधिकार मान्य करून सर्वांना मोफत शिक्षण ,
आरोग्याचा मूलभूत अधिकार मान्य करून सर्वांना विमा देऊन आरोग्य सुविधा मोफत , आणि
प्रत्येक हाताला काम हा अधिकार मान्य करून किमान वेतन कायद्याने जीवनाला शाश्वत बनवण्याचे काम कोणत्याच शासनाने केले नाही ,
आणि या बाबतीत मी पक्षीय मतभेद करत नाही.
पक्ष कोणतेही असले आणि सत्ता कुणाच्या ही आल्या तरी त्यातील सत्ता धारी कोण असावेत हे ठरलेले आहे , आणि यात आपण कोणी ही सहजा सहजी बदल करू शकत नाही हे ही वास्तव आहे .
राजकारण हे जनतेच्या सेवेसाठी करायचे असते , हा फार जुनाट विचार झाला , तो आत्ता धंदा बनलेला आहे ,
आणि
“धंदे मे कोई किसिका होता नही”
हे तत्त्व प्रचलित होऊन वापरात ही आणले गेले .
मला राजकारणातून थेट आर्थिक लाभ मिळवता येत नाहीत , त्या साठी मला कायदेशीर मार्गाने जावे लागते , कामाचे प्रस्ताव पाठवावे लागतात, त्या साठी आर्थिक निधी ची तरतूद करावी लागते , पुन्हा त्यात अधिकची वाढ करावी लागते , त्या नंतर निविदा निघतात , त्या भरण्या साठी मला कंपन्या ची गरज लागते , आणि हे सारे मार्ग प्रशासकीय मंजुरी तून जातात .
मग प्रशासनातील अधिकारी मला एकट्याला लाभार्थी का बनवेल? त्याला ही त्याचा वाटा हवा असतो , अश्या प्रकारे प्रशासकीय अधिकारी व राज्यकर्ते यांची अभद्र युती जन्माला येते आणि यातून निर्माण झालेला भ्रष्टाचार काळा पैसा व सत्ता निर्मिती करत असतो .
“राधेश्याम मोपलवार” हे नाव तुम्ही आता ऐकले असेल , आ रोहित पवार यांनी त्यांचे कारनामे जाहीर रित्या मराठी मीडिया समोर मांडले आहेत.
या प्रशासकीय अधिकाऱ्याचा शासकीय सेवा काळ हा 26 वर्षाचा ,,, यात त्याची कमाई किती होऊ शकते ?
कोट दोन कोट? म्हणत असाल तर तुमच्या इतके भोळे कोणी नाही !
या माणसाच्या कडे व त्याच्या कुटुंबिया कडे 3000कोटी रुपयाची संपत्ती आहे
तो मुस्लिम आहे का?
नाही ,,,,,,
तरी त्याला तीन बायका आहेत,,,
ना खाऊंगा ना खाणे दुंगा
म्हणणाऱ्या मोदी सरकार चे काळात त्यास अभय आणि सेवा निवृत्ती नंतर ही वाढीव सेवा काळ मिळाला आहे.
तो देवेंद्र जी फडणवीस आणि मुख्यमंत्री ना एकनाथ जी शिंदे साहेब यांचा लाडका आहे
2018*साली समृद्धी महामार्ग चे टेंडर *49000 हजार कोटी चे काढण्यात आले ,
अवघ्या 4महिन्यात त्यात बदल करण्यात आला आणि ते 55000कोटी चे करण्यात आले व त्यास मान्यता घेण्यात आली .
तब्बल 6000 कोटी ची वाढ करण्यात आली .
पॅकेज क्रमांक 11
2018साली
गायत्री प्रोजेक्ट ला काम देण्यात आले 1900कोटीला
काम करण्यास असमर्थता व्यक्त केली
2021ला
800 कोटी ची वाढ करून ते देण्यात आले “हूजुर मल्टी प्रोजेक्ट ला”
या कंपनीचे शेअर आहेत
1कोटी 52लाख
यातील 3लाख 98हजार शेअर आहेत तन्वी मोपलवार यांचे
ही त्यांची मुळगीआहे
तिचीच एक कंपनी आहे ,”मेलेरो इन्फ्रा”त्याचे शेअर आहेत 4लाख 58हजार शेअर
आत्ता आपण त्यांच्या कुटुंबीयां कडे असलेली संपत्ती पाहुयात
राधेश्याम मोपलवार 1500कोटी
दुसरी बायको 150कोटी
तिसरी बायको200कोटी
पहिली मुलगी500कोटी
दुसरी मुलगी 350कोटी
भाऊ सदानंद मोपलवार 200कोटी
कोट्यवधी लोकसंख्या असलेल्या समाजाच्या विकास महा मंडळाच्या तरतुदी असतात 100ते 150कोटी , आणि मायक्रो ओबीसी साठी महा मंडळ निधी ही असतो 20ते 25 कोटी ,,,,
हे वास्तव असताना ही आपणास राग येत नाही , चीड येत नाही हेच आपले वैशिष्ठ्य आहे जे राज्यकर्त्या वर्गाने फार पूर्वी जाणले आहे .
आपण गुलाम म्हणून जन्मलो आणि गुलाम म्हणूनच मरणार हेच या लोकशाहीतील वास्तव आहे .
आत्ता दुसरे असेच निवृत्त सनदी अधिकारी पाहुयात
त्यांचे नाव आहे दिलीप खेडकर
हे ओबीसी प्रवर्गातील ,,,,, यांनी नगर दक्षिण मधून लोकसभेची निवडणूक वंचित कडून लढवली
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञा पत्रा द्वारे त्यांनी त्यांची प्रॉपर्टी
40कोटी दर्शवली आहे
त्यांची मुलगी पूजा खेडकर हिने
दृष्टी आणि मानसिक अपंगत्व कोट्यातून स्वतः चे क्रीमी लेअर सर्टिफिकेट सादर करून आय ए एस द्वारे भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश मिळवला .
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हे सर्व प्रकरण उघडकीस आणले ,
2020पासून *Central Administretive Tribunal
मध्ये तिच्या विरोधात केस चालत आहे ,
आणि वारंवार 6 वेळा मेडिकल तपासणी साठी एम्स सारख्या संस्था मध्ये शाररिक तपासणी साठी बोलावून ही त्या टाळाटाळ करून ही त्यांच्या सेवेवर कोणताच परिणाम अद्याप पर्यंत झालेला नाही .
एका प्रामाणिक होतकरू विद्यार्थ्याची संधी हिरावून घेणाऱ्या अवलादी आणि त्यांना पाठीशी घालणारे शासन दिव्यच आहे
मी आ रोहित पवार व विजय कुंभार यांचे आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी या व्यवस्थेतील बटबटीत भीषण वास्तव उघडे करून दाखवले .
मला ज्ञात आहे की या 73वर्षाच्या कालखंडात राजकीय घराण्यांनी अशीच बेहिशोबी मालमत्ता कमावली आहे , आणि ते आमचे आयकॉन बनलेले आहेत
जे या देशाचे लुटारू आहेत आणि त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून देशाला लुटले आहे
देश गरीब नव्हता पण यांनी तो बनवला आहे
सडके शिळे विषारी खाऊन हासती जे ,,,,,,,,
कबरी वरील चिंध्या नेसून नाचती जे ,,,,,
रस्त्यात या पिलांचा थोडा आधार झालो
उरलित काय त्यांची ,,,,,?
उरलीत फक्त हाडे
ती ही कुठे विकावी ,,,,,,?
सर्वत्र ही गिधाडे
अश्या गिधाडांच्या टोळ्या सर्वत्र असताना आपणास चळवळ चालवायची आहे
आणि एस सी / एस टी/ एन टी/मायक्रो ओबीसी/ अल्पसंख्यांक
यांच्या हक्क आणि अधिकाराचे संरक्षण करत सत्ता भागीदारी चां संघर्ष ही चालवायचा आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत