प्रज्ञा शील करुणा मैत्री चे सौंदर्य म्हणजे बौद्ध धम्म:– प्रबुद्ध साठे

पुणे (देहूरोड) :- माणसाने स्वतः मधला माणूस विकसित करणे, म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे अत:दीप:भव: स्वयंप्रकाशीत बनणे, बौद्ध धम्मानुसार स्वतः मध्ये बदलाची परिवर्तनाची प्रक्रिया सुरू करणे त्याच्याशी प्रमाणीक राहणे, म्हणजेच स्वतःशी प्रमाणीक राहणे म्हणजे बौद्ध होणे, प्रज्ञा शील करुणा मैत्री चे सौंदर्य म्हणजे बौद्ध धम्म असे प्रतिपादन चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले, ते देहूरोड धम्म भूमी येथे साप्ताहिक बुद्ध वंदना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते, बौद्ध धम्मानुसार स्वतः मध्ये व समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे म्हणजे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारी धम्म क्रांती करण्यासाठी या धम्म भूमीला साक्ष ठेवून संकल्प करून धम्म कार्य करुया असेही प्रबुद्ध साठे यांनी म्हटले, याप्रसंगी देहूरोड धम्म भूमीचे विकास प्रणेते भीम पुत्र टेक्सास दादा गायकवाड, अशोक गायकवाड, बहुजन संघटक चॅनेल चे राहुल खांडेकर आदी मान्यवर व उपासक, उपासिका बंधू भगिंनी उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत