“कमलाकांत वासुदेव चित्रे”


संपादन… विजय सुरवाडे.
(१८९४- १९५७) यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
(बाबासाहेबांचे निकटचे सहकारी) “डॉ. आंबेडकरांच्या दलितोद्धाराच्या चळवळीला आपले जीवन सर्वस्व वाहणारे जे काही डॉ. आंबेडकरांचे स्पृश्य सहकारी होते त्यात कमलाकांत चित्रे यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल.”
त्यांचा जन्म १८९४ मध्ये कायस्थ कुटुंबात झाला. “मार्च १९२७ साली डॉ. आंबेडकरांनी आपल्या सामाजिक चळवळीच्या लढ्याची मुहूर्तमेढ महाड चवदार तळ्याचे पाणी पिऊन रोवली, तेव्हापसून कमलाकांत चित्र्यांचा आंबेडकरी चळवळीतील सहभाग होता.”
ते मुंबई महापालिकेत टायपिस्ट म्हणून नोकरीस होते. “नोकरी व घरप्रपंच सांभाळून जो काही फावला वेळ त्यांना लाभत होता तो चित्रे आंबेडकरांच्या समाज कार्यासाठी खर्च करीत”. ‘
“समाज समता संघ'” स्थापनेत चित्र्यांचा पुढाकार होता. “या संघात डॉ. आंबेडकरांचे बरेच स्पृश्य सहकारी होते.” या संघाच्या माध्यमातून मुंबई/ कोकणातल्या अस्पृश्य वस्त्यांमधून प्रचार, व्याख्यानांद्वारा अस्पृश्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याचे कार्य सुरू झाले. स्पृश्यांस्पृश्यांकडे आळीपाळीने सहभोजनांचे कार्यक्रम सुरू झाले. त्यात चित्रे उत्साहाने सहभागी होत असत.
“२७ मे १९३५ रोजी रमाबाईंचे निधन झाले तेव्हा चित्रे प्रेतयात्रेत बाबासाहेबांना धीर देत सहभागी झाले होते.”
१९३६ साली बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष (Independent Labour Party) स्थापन केला. ७ ऑगस्ट १९३७ रोजी स्वतंत्र मजूर पक्षाची सर्वसाधारण सभा नागपाडा, नेबरहूड हाऊस (मुंबई) येथे डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाली. “या सभेत चित्रे यांना उपशाम गुरुजी समवेत पक्षाचे सहकार्यवाह तसेच संघटक म्हणून नेमण्यात आले.”
पुढे १९४२ साली नागपूर मुक्कामी डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष बरखास्त करून ‘शेड्युल कास्टस् फेडरेशन’ची स्थापना केल्याने
डॉ. आंबेडकरांच्या स्पृश्य सहकाऱ्यांना प्रत्यक्ष शे.का.फे.मध्ये भाग घेता येत नसला तरी त्यांचा शे.का.फे. च्या वाटचालीत सक्रीय सहभाग होताच.
” याबाबत बाबासाहेब चित्रे, दोंदे यांच्याशी सल्लामसलत करीत व हे स्पृश्य सहकारी जरी शे.का.फे.चे पदाधिकारी नसले तरी त्यांच्यावर पक्षाची अनेक कामे सोपवीत असत. “
१९४५ साली डॉ. आंबेडकरांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. व मुंबईत २० जून १९४६ पासून त्यांनी पी. ए. सोसायटीच्या अधिपत्याखाली सिद्धार्थ कॉलेज सुरू केले.
“डॉ. आंबेडकरांचे वास्तव्य दिल्लीत असल्याने कॉलेजची जबाबदारी त्यांनी चित्रे, टिपणीस, चिटणीस, मोहिते गुरूजी, दोंदे व राव आदी आपल्या सहकाऱ्यांवर सोपविली.”
” त्यावेळी चित्रे दिवसा आपली महापालिकेतील नोकरी करून सायंकाळी सुटल्यावर ते सरळ सिद्धार्थ कॉलेजच्या हटमेंट (मरीन लाईन्स) मधील ऑफिसात रात्री उशिरापर्यंत बसून सिद्धार्थ कॉलेजचे कार्यालयीन कामकाज विनामूल्य करीत असत.”
” डॉ. आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्याची धुरा चित्र्यांनी अत्यंत निष्ठेने, सचोटीने व समर्थपणे पेलली”
. पुढे कॉलेजचा व्याप वाढल्याने
डॉ. आंबेडकरांनी चित्र्यांना नोकरीचा राजीनामा द्यावयास लावून त्यांना “संस्थेचे रजिस्ट्रार ” नेमले.
पुढे संस्थेचा व्याप वाढत जाऊन मुंबईत तीन कॉलेजेस व रात्र शाळा तसेच औरंगाबादची कॉलेजेस व तत्सम इतर प्रकल्प आदीचे नियोजन, नियंत्रण व प्रशासन आदी जबाबदाऱ्या अगदी “तुटपुंज्या पगारावर” समाधान मानून
“डॉ. आंबेडकरांवरील निष्ठेपोटी कमलाकांत चित्रे यांनी अखेरपर्यंत समर्थपणे पार पाडल्या”
. १५ एप्रिल १९४८ रोजी डॉ. आंबेडकरांनी डॉ. शारदा कबीर यांच्याशी दिल्ली येथे नोंदणी पद्धतीने द्वितीय विवाह केला. “त्याप्रसंगी वधू शारदा कबीर (माईसाहेब) यांच्या वतीने विवाहाचे साक्षीदार म्हणून माईंचे बंधू वसंत कबीर व कमलाकांत चित्रे यांनी सह्या केल्या होत्या.”
“१९५५ च्या सुमारास बाबासाहेबांच्या जवळच्या काही महत्त्वाकांक्षा सहकाऱ्यांनी चित्र्यांबद्दल बाबासाहेबांचे मन कलुषित केले व चित्रे यांना खुलासा करण्याचीही संधी न देता चित्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले.”
“बाजीप्रभूच्या निष्ठेने चित्र्यांनी “
“डॉ. आंबेडकरांच्या कार्यात मोठ्या सचोटीने व निःस्वार्थपणे तीस वर्षे कार्य केले.”
“डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक कार्याच्या रोपट्याचे विशाल वृक्षात रूपांतर करण्यासाठी जीवाचे रान केले.”
” त्या चित्र्यांवर राजीनामा देण्याची पाळी आल्याने ते खचले. बाबासाहेब आजार व व्याधीनी त्रस्त होते.”*”
“कदाचित त्यामुळे त्यांना या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालता आले नसल्याने चित्र्यांबाबत घेतलेला निर्णय योग्य नव्हता असे वाटते, चित्र्यांनी प्रचंड हाय खाल्ली. “
पुढे अर्धांगवायुच्या विकाराने त्यांचे मुंबईच्या के.ई.एम. हॉस्पिटलात
दि. ११ जूलै १९५७ साली वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले.”
बाबासाहेबांचे समकालीन सहकारी
“कमलाकांत चित्रे” यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
????????????
” समकालीन सहका-यांच्या आठवणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर”. पृ. १८१, १८२.
संपादन… विजय सुरवाडे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत