देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

जिथं भारतीय महिलांना “राम” वाचवू शकत नाही,तिथं गाईच्या पवित्र्याचं काय !

विजय अशोक बनसोडे

भारतातील 10 मोठ्या कत्तलखान्यांचे मालक हिंद आहेत.तर गोमांस निर्यात करणारा,हाच मोठा उद्योजक समूह हिंदूचं आहे.भारतासह उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात भाजपची सत्ता असताना ही या बड्या बीफ निर्यातदार कंपन्यावर कोणती कार्यवाही केली की नाही केली, याची माहिती मिळत नाही.त्यामुळं कार्यवाही कोणावर ? कोणाचे कट्टलखाने बंद ? तसेच कत्तलखाने बंद झाल्यामुळे अनेकांच्या रोजगारांवर आलेली गदा आणि या व्यवसायात विशिष्ट धर्माचेच लोक काम करतात का,हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.साधारणपणे गोमांस निर्यात करणारा समूह विशिष्ट धर्माशी संबंधित असतो,असा समज आहे.मात्र,यासंबंधी नुकतीच एक आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.‘बी.बी.सी’ ने दिलेल्या वृत्तानुसार भारतामध्ये गोमांसाची निर्यात करणारे सर्वात 10 मोठे निर्यातदार हे हिंदूधर्मीय आहेत.केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचा भाग असलेल्या शेती व प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात प्राधिकरणाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशातील 74 कत्तलखान्यांपैकी 10 सर्वात मोठ्या कत्तलखान्यांचे मालक हिंदू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.तसेच या भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण सरकार संपूर्ण बहुमताज सरकार आल्यानंतर भारत देश हा जगामध्ये “बीफ” व्यवसायामध्ये ब्राझीललाही मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.यावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे की ज्या भारतीय जनता पार्टीने “गाई” सांभाळणाऱ्या संस्था संघटना उभा केल्या त्यांच्या हातामध्ये लाठ्या काट्या दिल्या त्यांना मुस्लिम आणि आदिवासींना मारण्याचे परवाने दिले. त्यास भारतीय जनता पार्टीला चंद्रपूर होणाऱ्या “बीफ” कंपन्या मग त्यांनी गाय कापल्या काय आणि खाल्ल्या काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीला काही फरक पडत नाही. फरक पडतो,तो फक्त भारतातील आदिवासी आणि मुस्लिमांनी जर “पवित्र गायी” कापल्या किंवा त्यांचे “मटन” सुद्धा खाल्ले तर हा प्रचंड मोठा देशद्रोहासारखा गुन्हाच आहे.

देश व पुरोगामी महाराष्ट्रातील “आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं” ही परिस्थिती घातकच !

देश आणि राज्याच्या राजकारणामध्ये आंधळा दळत आणि कुत्रं पीठ खातं असेच चित्र सध्या तरी दिसून येत आहे. या सुप्रसिद्ध अशा म्हणीतील कुत्रं म्हणजे भारतीय जनता आहे असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही. कारण भारतीय संसदीय लोकशाहीचा तिसरा मुख्य कणा असलेली व्यवस्था म्हणजे न्यायव्यवस्था होय. आणि काल ही न्यायव्यवस्था तिरुपतीच्या लाडू प्रकरणात म्हणते की, देवाला तरी भ्रष्टाचारापासून मुक्त ठेवा !

तर दुसऱ्या बाजूला पुरोगामी आणि परिवर्तनवादी महाराष्ट्राचे सरकार, महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडून दोन तासाची कॅबिनेट घेऊन चाळीस निर्णय जाहीर केले. गोमातेला “राज्यमाता-गोमाता” दर्जा प्रधान करण्यात येऊन,गो-संरक्षण गो-अनुदान, राज्यातील गोशाळांना देशी गाईच्या देशी गाय देशी गायीच्या पाठीमागे पंधराशे रुपये अनुदान असे जाहीर केले आहे.

तर दुसऱ्या बाजूला भारत हा जगातील एक नंबरचा मटन उत्पन्न उत्पादन करणारा आणि निर्यात करणारा एक नंबरचा देश आहे. भारत जगामध्ये मटण निर्यातीमध्ये एक नंबरचा देश असेल तर हे मांस केवळ म्हशी बकरीचेच असेल काय ? याची शहानिशा सरकार करणार आहे की नाही.त्यातही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मांस विकणाऱ्या कंपन्यांमध्ये दहा हिंदू समूहाच्या कंपन्या आहेत पैकी चार ब्राह्मण होय. तर मग अशा परिस्थितीमध्ये जे मौंस निर्यात केलं जातं त्यात गाईचं मांस नाही कशावरून ? उत्पादनाचे स्त्रोत म्हणून गायीकडे पाहिलं जात असेल तर भोळ्या-भाभड्या जनतेची फसवणूक कशासाठी ? हे सरकार करत आहे,ही पुरोगामी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील SC/ST/OBC या सर्व बहुजन बांधवांनी समजून घेतले पाहिजे.

मुस्लिम नाम सदृश्य नावे “बीफ” कंपन्यांना ठेवण्याचा मुख्य उद्देश काय ?

भारतातील जगात अव्वल असलेल्या दहा बीप कंपन्या पैकी अनेक नावे मुस्लिम समाजाच्या नावासमानच आहेत. मग अशा प्रकारे बीफ कंपन्यांच्या नावामध्ये मुस्लिम सदृश्य नावे का ठेवण्यात येतात यावरून तरुण यावरून तरी या देशातील उच्चभ्रू कंपनी मालकांचा उद्देश स्वच्छ आहे असे वाटत नाही. भारतातील हे टॉपच्या दहा कंपन्या हिंदू मालकाच्या असून पैकी चार कंपन्या ह्या ब्राह्मण व्यक्तीच्या मालकीच्या आहेत.तर मग या एकूण कंपन्यापैकी मुस्लिम नावाशी संबंधित कंपन्यांची नावे ठेवण्याच्या पाठीमागे काय राजनीति आहे ? एक बाजूला या “बीफ” कंपन्यातून अब्जावधी रुपयाची माया कमवायची,याच कमावलेल्या पैशातून भारतातील Congress, RSS आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेनेसारख्या देश्यातील राज्यस्तरीय इतर राजकीय पक्षांना इलेक्ट्रॉल बॉण्ड म्हणून पैसा पुरवायचा आणि भारतात गाईवरून हिंदू-मुस्लिम वाद पेटवत राजकारण करायचे.मुस्लिमांना आणि आदिवासींना जिवानिशी मारायचे, गोरक्षक दलासारख्या संघटना पोहोचायच्या हे तर राजकारणातील खूप मोठे षडयंत्र असल्याचे दिसते आहे.

अल कबीर (ब्राह्मण मालक ) :-

अल कबीर हा देशातील सर्वात मोठा कत्तलखाना तेलंगणाच्या मेडक जिल्ह्यात आहे.सतीश सब्बरवाल हे या तब्बल 400 एकरांच्या परिसरात पसरलेल्या कत्तलखान्याचे मालक आहेत.मुंबईच्या नरिमन पॉईंट परिसरात अल कबीरचे मुख्यालय असून या कत्तलखान्यातून अनेक आखाती देशांमध्ये गोमांसाची निर्यात केली जाते.दुबई,अबुधाबी, जेद्दा,कुवेत,मदीना,रियाद, खरमिश,सित्रा,मस्कत आणि दोहा या आखाती देशांमध्येही अल कबीरची कार्यालये आहेत.अल कबीरचे मालक सतीश सब्बरवाल यांनी धर्म आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी पूर्णपणे भिन्न असल्याचे म्हटले आहे.या दोन्हींची गल्लत करता कामा नये,असे मत सब्बरवाल यांनी मांडले.अल कबीरने गेल्या आर्थिक वर्षात 650 कोटींचा व्यवसाय केला होता.

अरेबियन एक्स्पोर्टस (ब्राह्मण मालक) :-

अरेबियन एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडचे मालक सुनील कपूर आहेत.अरेबियन एक्स्पोर्टसचे मुख्यालय मुंबईत आहे.अरेबियन एक्स्पोर्टसकडून गोमांसाबरोबर मेंढ्याचे मांसही निर्यात केले जाते. अरेबियन एक्स्पोर्टसच्या संचालक मंडळात विरनत नागनाथ कुडमुले , विकास मारूती शिंदे आणि अशोक नारंग यांचा समावेश आहे.

एमकेआर एक्स्पोर्टस :-

भारतामधील बीफच्या प्रमुख निर्यातदारांपैकी एक असलेल्या एमकेआर फ्रोजन फूड एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडचे मालक मदन एबट आहेत.या कंपनीचे मुख्यालय दिल्लीत आहे.या कंपनीचा कत्तलखाना पंजाबच्या मोहालीत असून या सनी एबट एमकेआर एक्स्पोर्टसचे संचालक आहेत.

अल नूर एक्स्पोर्टस :-

सुनील सूद यांच्या मालकीच्या अल नूर एक्स्पोर्टसचे मुख्यालय दिल्लीत आहे.मात्र,यांचा कत्तलखाना आणि मांस पक्रिया केंद्र उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये स्थित आहे.मेरठ आणि मुंबईमध्ये अल नूर एक्स्पोर्टसच्या शाखा आहेत. १९९२ मध्ये स्थापन झालेली अल नूर एक्स्पोर्टस सध्याच्या घडीला ३५ देशांमध्ये गोमांसाची निर्यात करते.

एओवी एक्स्पोर्टस 2001 :-

एओवी एक्स्पोर्टस 2001 साली स्थापन झालेल्या एओवी एक्स्पोर्टसचा कत्तलखाना उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये आहे. याठिकाणी कंपनीचे मांस प्रक्रिया केंद्रही आहे. एओवी एक्स्पोर्टस मुख्यत्तेकरून बीफची निर्यात केली जाते.अभिषेक अरोरा हे एओवी एक्स्पोर्टसचे संचालक आहेत.

स्टँटर्ड फ्रोझन फूडस एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड
कमल वर्मा हे स्टँटर्ड फ्रोझन फूडस एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये या कंपनीचा कत्तलखाना आहे.

पोन्ने प्रॉडक्टस एक्स्पोर्टस :-

एस.सस्ति कुमार हे पोन्ने प्रॉडक्टस एक्स्पोर्टस संचालक आहे.ही कंपनी मुख्यत्वेकरून बीफ आणि अंड्यांच्या निर्यातीचा व्यवसाय करते.तामिळनाडूच्या नमक्कालमध्ये कंपनीची शाखा आहे.

अश्विनी ऍग्रो प्रॉडक्टस :-

अश्विनी ऍग्रो प्रॉडक्टसचा कत्तलखाना तामिळनाडूच्या गांधीनगरमध्ये आहे.या कंपनीचे संचालक के.राजेंद्रन यांच्या मते धर्म आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. आपल्याला व्यवसाय करताना स्थानिक अधिकाऱ्यांच्या त्रासाला अनेकदा सामोरे जावे लागल्याचे के.राजेंद्रन यांनी सांगितले.

महाराष्ट्र फुडस प्रोसेसिंग :-

महाराष्ट्रातील फलटणमध्ये महाराष्ट्र फुड प्रोसेसिंग अँण्ड कोल्ड स्टोरेजचा कत्तलखाना आहे.सनी खट्टर या कंपनीतील भागीदार असून त्यांनीदेखील धर्म आणि व्यवसाय या दोन्ही भिन्न गोष्टी असल्याचे म्हटले आहे.

धर्म आणि व्यवसाय ह्या दोन भिन्न गोष्टी असतील तर भारतात गायी वरून मुस्लिमांना का टार्गेट केला जातो !

भारतातील टॉप मोस्ट दहा कंपन्याचे मालक जे विशेषता हिंदू आणि खुद्द ब्राह्मण आहेत.या बीफ कंपन्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपली जी मते प्रदर्शित केली आहेत त्या एकूण मताचा अभ्यास जर आपण केला तर आपल्या असे लक्षात येईल की,भारताच्या भूमीवर पवित्र समजली जाणारी “गाय” आणि तिची मावशी “म्हैस” व इतर सजीव नातेवाईक बैल,रेडा,बकरी,बछडे ही त्यांच्यासाठी फक्त एक व्यवसायाचे उद्योगाचे बिझनेसचे माध्यम आहे.

भारतामध्ये 1950 पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे मुक्त उद्योग आणि व्यवसायाचे अधिकार भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळाले.आणि याच मुक्त उद्योग व्यवसाय अधिकाराचा फायदा घेऊन गल्ली-बोळा मध्ये “गाईच्या” नावावर हिंदू-मुस्लिम दंगे पेटवणारे नॅशनल आली इंटरनॅशनल लेव्हलवर “बीफ” व्यवसायामध्ये जगामध्ये नंबर एकला आहेत.त्यामुळे “बीफ” व्यवसायामध्ये गोमांस विक्री निषिद्ध नसेल तर मग भारताच्या राजकारणामध्ये गोमांस,गोमाता,गोरक्षक दल आणि या सर्वातून हिंदू-मुस्लिम दंगे पेटविण्याचे कारण काय ? देशातील आदिवासी आणि मुस्लिमांना मारहाण तरी करण्याचे कारण काय ? याचा विचार खुद्द हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या तरुण पिढीने करणं गरजेचं आहे.आणि आपण असा विचार केला तरच हिंदू आणि मुस्लिम समाजातील भावी पिढी मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या निकोपपणे वाढीला लागेल हे ही आपण लक्षात घ्यावे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे “अस्पृश्य कोण” या शोध निबंधात ब्राह्मण व गैर ब्राह्मणांनी गोमांस खाल्ल्याचे दाखले दिले !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या “अस्पृश्य” कोण ? या शोध निबंधात म्हणतात की,एक काळ असा होता की हिंदू,जे ब्राह्मण आणि गैर ब्राह्मण यांनी फक्त मांसच नाही तर गोमांस सुद्धा खात होते.आणि या भक्कम पुराव्यावर कोणी शंका ही घेऊ शकत नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी “मधुपर्क” नावाचे अन्न पदार्थचा उल्लेख करताना सांगितले की, मांस ते पण गाईचे मांस होते.घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास गाईला मारून पाहुणचार करण्याची पद्धत इतकी रूढ झाली होती की त्याकाळी घरी येणाऱ्या पाहुण्यांना “‘गोघ्न” असे म्हटले जाऊ लागले. ज्याचा अर्थ असा होता की, “गाय का हत्यारा.”

— हिन्दू धर्मशास्त्र विख्यात विद्वान पी.वी काणे लिहितात की, असे नाही की वैदिक काळामध्ये गाय पवित्र नव्हती,परंतु तिच्या पवित्र ते मुळेच गरुड पुराणामध्ये (गरुड संहिता) असे म्हटले आहे की,गोमांस खाल्ले पाहिजे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या “अस्पृश्य कौण और अस्पृश्य क्यू बने” या शोधनिबंधात गोमांस खाण्याची परंपरा ही ब्राह्मण आणि इतर सवर्ण घर ब्राह्मणांची होती हे सिद्ध केले आहे.तर मग आज काही ठराविकच ठराविक समाजाला वेठीस धरण्याचे कारण काय ? राजकीय सत्ता मिळवण्यासाठी हिंदूतील बहुसंख्य ओ.बी.सी समाजाला हिंदूशी लढण्यात गुंतवून ठेवायचे आणि सत्ता मात्र आपण उपभोवायची या षडयंत्र आता बहुजन समाजाने ओळखले पाहिजे.

“गाय” प्रेम जिवंत माणसाचा बळी घेतो, ही धर्माची शिकवण की राजकारणाची गरज !

विश्वातील सुप्रसिद्ध BBC ने महत्त्वपूर्ण बातम्या दिल्या आहेत. त्यातील काही उदाहरणे म्हणून आपण येथे घेऊ शकतो.
— 29/8/2024 ला हरियाणा मध्ये गोमाऊन्स खाल्ल्यामुळे का समृद्धी नामक मुलाला जीवे मारण्यात आले.
— तसेच उत्तर प्रदेश दादरीमध्ये मुस्लिम परिवाराला परिवाराला वेदम मारहाण करण्यात आली 31/8/ 2024 रोजी एकाचा बळी घेण्यात आला.
— मध्य प्रदेशातील मंडला गावातील अकरा आदिवासी परिवारांना जबर मारणार करण्यात येऊन त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला.
— जळगाव महाराष्ट्र चाळीसगाव मध्ये 72 वर्षीय आश्रफअली सय्यद हुसेन यांना शंकेतून प्रचंड मारहाण करण्यात येऊन हिंदू मुस्लिम वाद पाठवण्याचा प्रयत्न झाला.

अशा प्रकारची हजारो उदाहरणं आपल्यासमोर मांडता येतील.जे भारतातील सर्वसामान्य नागरिकांना विचलित करू शकतात.त्यामुळे आपणच विचार केला पाहिजे की गोमांस एका बाजूला काही उच्चभ्रू लोकांसाठी प्रचंड मोठा बिजनेस आणि व्यवसाय आहे तर यांच्याशी शहरावर चालणाऱ्या सरकारसाठी किंवा राजकीय पक्षांसाठी तो एक राजकीय मुद्दा असून भारतात हिंदू मुस्लिम वाद सतत तापत ठेवण्याचे मुख्य कारण आहे. हे आता खुद्द सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेऊन अशा या लबाड ढोंगी गाय प्रेमी राजकीय नेत्यांना आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदार- खासदारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

लेखक,विजय अशोक बनसोडे
भारतीय बौद्ध महासभा, उस्मानाबाद (द)
जि.सं.उपाध्यक्ष 8600210090

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!