एससी उपवर्गीकरणाचा निकाल कायम सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळल्या
पीटीआय, नवी दिल्ली
अनुसूचित जातींमध्ये (एससी) वर्गीकरणासंबंधी निकालाचा
फेरविचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. आरक्षण देताना उपवर्गीकरण करण्याचा घटनात्मक अधिकार राज्यांना असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठाने १ ऑगस्ट रोजी दिला होता.
निकालामध्ये प्रथमदर्शनी कोणतीही त्रुटी दिसत नाही असा
शर्मा यांच्या सातसदस्यीय घटनापीठाने शुक्रवारी दिला. यापैकी न्या. त्रिवेदी यांनी १ ऑगस्टच्या निकालात असहमती नोंदवली होती. त्यांनीही याचिका फेटाळण्याच्या निकालाशी सहमती दर्शवली आहे.
निर्वाळा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. भूषण रामकृष्ण गवई, न्या. विक्रम नाथ, न्या. बेला त्रिवेदी, न्या. पंकज मित्तल, न्या. मनोज मिश्रा आणि न्या. सतीश चंद्र
यावेळी, फेरविचार याचिका खुल्या न्यायालयात सुनावणीसाठी सूचिबद्ध केल्या जाव्यात, अशी मागणी करणारे अर्जही न्यायालयाने फेटाळले. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी हा आदेश प्रसृत करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत