राग येवू द्या…आत्मचिंतन करा ..,!
■ महार, मांग, चांभार, ढोर, डकलवार, रायंदर, कैकाडी, वडार, मसनजोगी, वरटी, तेली, तांबोळी, वारीक, लम्हाणी, कोळी, माळी, हटकर, धनगर, कुंभार, सोनार, वंजारी, कोष्टी, आणि आठरापगड जातीच्या बेईमान लोकांनो….
वेळ काढून वाचा……………..
आणि राग आला तरीही तुम्ही काहीच करू शकत नाहीत, हे ही सत्य आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त महारांचे म्हणजेच आजच्या बौद्धांचे हा गोड गैरसमज डोक्यातून काढून टाका.
जसा तुमचा देव कोण्या एकट्याचा, ठराविक लोकांचा नसतो, तसाच महापुरूष सुद्धा कुण्या एकट्याचे नसतात.
★ आज काल जे कट्टर हिंदुत्ववाद घेऊन बोंबलत फिरत आहेत, त्याच हिंदुत्ववादाने तुमच्या हजारो पिढ्या गुलाम बनवून छळल्या आहेत.
तुम्ही माणुस असुन तुम्हाला जनावरांसारखी वागणूक दिली आहे. मान्य आहे तुमच्या पेक्षा जास्त झळा महारांनी सहन केल्या, पण तुमचे पुर्वज याला अपवाद नव्हते.
तेली, न्हावी, वरटी, कोळी, मांग,चांभार, ढोरांची लोकं उरलेले विटके मागुन खायचे, मिळाले त्या मोबदल्यात दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे राबावे लागले आहे.
याला महार सुद्धा अपवाद नाहीत. पण महार बौद्धधम्माच्या वाटेला लागले आणि तुम्ही कट्टर हिंदू … ?
तुमच्या माईला-बापाला, असतील तर आजा-आजीला विचारा, तुमच्या पुर्वजांचे कसे शोषण ह्या जातीव्यवस्थेने केले आहे.
नुसतं हक्क मागितला तर तुमच्या पुर्वजांना गावाच्या चौकात पारावर बांधून निर्दयी ढोरा सारखे मारलं आहे.
ना पोलीस ना यंञणा, कित्येक हत्या, कित्येक बलात्कार, कुठलीच दाद ना फिर्याद होती.
लोकांच्या शेतात कामाला गेल्यावर तुमच्या पुर्वजांना ढोरांसारखे राबवून घेतले जाई. कामाला गेलेल्या महिला-मुलींचे शोषण केलं जाई. ह्या सर्व गोष्टी-घटना तुमच्या मायबापाने सहन केल्या आहेत.
●तुम्हांला लिहण्याचा अधिकार नव्हता,
●लिहिलेले बघितले तर हात कापले जायचे,
●तुम्ही वेद मंञ उच्चारले तर जिभ कापली जायची,
●ऐकले तर कानात गरम शिसे ओतले जायचे.
या गोष्टी मनघडत नाहीत.
तुमच्या पुर्वजा सोबत घडलेल्या आहेत, त्यांनी त्या नरक यातना भोगल्या आहेत. आणि तुम्ही त्याच धर्माला आणि प्रथा परंम्परेला चिटकून बसला आहात… ?
जातीव्यवस्थेतील ऊच्चवर्णीयांनी जर तुमच्या पुर्वजांच्या आई-बहिणी, बायकोवर बलात्कार केला तर त्यांना साधारण शिक्षा, माञ तुम्ही त्यांच्या बायकोकडे साधं बघितलं तर तुमचे डोळे काढले जातील, एवढ्यात भागलं तर ठीक, अनेक वेळा तर मृत्यदंड दिला जाई.
हा आहे हिंदू धर्म.
अशा नरकातुन बाबासाहेबांनी तमाम अठरापगड जातींना बाहेर काढलं. तुम्हाला मान-सन्मान आणि स्वभिमानाचं जीवन दिलं आणि तुम्ही काय करताय …?
आम्हा-तुम्हाला बोलण्याचा, राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा, शिक्षणाचा, नोकरीचा, पैसा-धन संपत्ती साठवण्याचा, आमच्या-तुमच्यावर अन्याय-अत्याचार झाला तर न्याय मागण्याचा हक्क आणि अधिकार मागण्याचा, अधिकार बाबासाहेबांनी तुम्हां – संविधानाच्या माध्यमातून दिला आहे.
आमच्या-तुमच्या घरात येणारे राशन, आम्ही-तुम्ही ठोकत असलेली भाषणे, नोकरीत आरक्षण, शाळेत रिझर्वेशन, आणि आज आम्ही-तुम्ही करताय ती फॅशन, हे सर्व बाबासाहेबांचे देणे आहे.
बाबासाहेबांनी महारांचा विचार करण्याअगोदर ओबीसीना आरक्षण दिले, पण या ओबीसीनी बाबासाहेबांना काय दिले ..?
बौद्ध समाज सोडला तर बाबासाहेबांचा फोटो कुठेच दिसत नाही. 99% ओबीसी समाज बाबासाहेबांचा द्वेष करतो,
एस् सी मधल्या जातीसुद्धा बाबासाहेबांना फक्त बौद्धांचे समजतात.
बाबासाहेब जन्माला आले नसते, त्यांनी संविधान लिहले नसते, तर तुमचे-आमचे हाल कुञे खाले नसते. पहिले तुम्हा-आम्हाला ढोरां-गुरांचे शेण काढावे लागायचे, आता आम्हा-तुम्हाला त्यांच्या लेकरांचे ढुंगण धुवावे लागले असते.
आमच्या-तुमच्या रहाण्यावरच नाही, तर आमच्या-तुमच्या श्वास घेण्यावर सुद्धा ह्या ऊच्चवर्ण लोकांनी टॅक्स लावला असता आणि तुम्ही-आम्ही काहीच करू शकलो नसतो.
आज आम्ही-तुम्ही जे माणसासारखे कपडे घालतो, नोकरी करतो, घर बांधतो, ऐशोआरामचं जीवन जगतो, ही बाबासाहेबांची देण आहे.
त्या महामानवासाठी तुम्ही एक दिवस काढू शकत नाही ?
त्यांचा फोटो घरांत लावू शकत नाही ? अरे, त्यांचा फोटो नका लावू घरांत, पण जर बाबासाहेबांची विटंबणा झाली तर तुम्ही रस्त्यावर सुद्धा येवू नये, हे दुर्दैव आहे. छाती ठोकून, तुम्ही असेच बायकाच्या पदराखाली रहा. संविधानाचा बलात्कार होतोय, तुम्ही बघत रहा. आम्ही आहोत मरायला आणि संविधान वाचवायला. असे पण आम्ही मेलेलेच होतो, बाबासाहेबांमुळे जीवंत आहोत. त्यांच्या सन्मानासाठी आणि आमच्या भावी पिढीच्या संरक्षणासाठी आम्ही मरायला तयार आहोत.
★ तुम्ही बसा चाटत तुमच्या धर्माला आणि त्यातल्या परंपरांना…!
🙏🙏🙏🙏🙏🙏
एक संविधान प्रेमी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत