बहुजनांचा मित्र कोण व शत्रु कोण?
संविधान निर्मितीनंतर निर्माण झालेला सर्वस्तरीय संविधान लाभार्थी वर्ग व संविधान विरोधी वर्ग यांच्यामधील सुरु असलेला वैचारिक व सांस्कृतिक संघर्ष…. एक तर्कसंगत विश्लेषण
हे वाचलं,तर बहुजन व ब्राम्हणी व्यवस्था समजेल…? आमच्या बहुजनांचा मित्र कोण व शत्रु कोण? हे समजेल! अन येणा-या गुलामी विरोधात बंड करण्याची धारणा निर्माण होईल..
या देशात दोन विचारधारा आहेत.या विचाराधारेशी आजीवन प्रामाणिक रहाणा-या महापुरुषांची गुरु शिष्य परंपरा देखील आहे.या विचारधारांचा व विचारधारा मानणा-यांचा आपसी संघर्ष हजारो वर्षापासुन ते आजदेखील सुरुच आहे.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि न्याय या चतुसुत्रीरुपी विचारधारेला मानणारी व पारतंत्र्य,विषमता,गैरबराबरी,अन्यायाला मानणारी दुसरी विचारधारा आहे. या विचारधारांचा संघर्ष हजारो वर्षापासुन सुरु आहे.
अवैदिक×वैदिक
वर्णव्यवस्था×गणव्यवस्थाबहुजन×अल्पजन,*
अब्राम्हणी× ब्राम्हणी
ब्राम्हण× ब्राम्हणेतर
शेटजी,भटजी,लाटजी× शुद्रातिअतिशुद्र आणि वर्तमानातील मुलनिवासी× विदेशी असा हा संघर्ष आहे.
हा संघर्ष व्यवस्था बहुजनांची की अल्पजनांची,स्वातंत्र्याची की गुलामीची,समतेची की विषमतेची,न्यायाची की अन्यायाची यासाठीचा आहे.
स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायावर आधारित जी विचारधारा आहे ती येथील मुलनिवासी बहुजनांची म्हणजेच आजचे SC,ST, NT ,DNT, OBC & MINORITIES यांची विचारधारा आहे……जी त्यांच्या पुर्वजांनी त्यांना विरासत स्वरुपात दिली आहे.
बहुजनांच्या स्वातंत्र्याला,समतेला,बंधुतेला व न्यायाला नाकारणारी विचारधारा म्हणजेच अल्पजनांना पोषक अशी ब्राम्हणी,वैदिक विचारधारा….या विचारधारेचे निर्माते,संचालक, दिग्दर्शक आणि १००% लाभार्थी ब्राम्हण मानले जातात.
भगवान महावीर,तथागत बुध्द,सम्राट अशोक,संत कबीर,गुरु रविदास,गुरुनानकसाहेब,संत नामदेव,संत तुकोबा,संत गोरोबा,संत चोखोबा,संत सेना,संत गाडगेबाबा,इत्यादि बहुजन संत,छत्रपती शिवाजी महाराज,म.फुले, राजर्षी शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,धरतीआबा बिरसा मुंडा,आण्णाभाऊ साठे,राजमाता जिजाऊ,राजमाता अहिल्यामाता,माता सावित्रीमाई,माता फातिमाबी शेख,माता रमाई हे महानायक व महानायिका समता,न्यायाला मानणारे व त्यासाठी संपुर्ण जीवनाची आहुती देणारे…..हे बहुजनांचे महापुरुष..
मनु, द्रोणाचार्य, आदिशंकराचार्य व त्यांचे चार पीठापती,पुष्यमित्र शुंग, अनाजीपंत व त्याचे वंशज व त्याच्या विचाराचे वारसदार,नथुराम,हेडगेवार व आताचे मोहन भागवत ही मंडळी ३.५ %चे आदर्श….
या देशाचा इतिहास म्हणजे क्रांती व प्रतिक्रांतीचा इतिहास…..क्रांती बहुजन महापुरुषांनी तर प्रतिक्रांती अल्पजनांनी केली.
फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुर्वीचा भारत…
म.फुले, राजर्षी शाहु महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्वीचा किंवा इंग्रजांच्या आधीचा कालखंड म्हणजे मनुस्मृती चा कालखंड….
या कालखंडात बहुजन म्हणजे SC, ST, NT,DNT, OBC यांना माणुस म्हणुनच नाकारले.यालाच प्रतिक्रांती म्हणतात. त्यामुळे हा वर्ग सत्ता, संपत्ती, हक्क,राजकारण, अधिकार,शिक्षण,रोजगार,नोकरी,व्यापार यापासुन वंचित राहिला.वंचित राहिल्यामुळे गुलाम झाला.
🍀२६ जानेवारी १९५० नंतर झाली क्रांती…
फुले, शाहु व बाबासाहेब आंबेडकर यांच्या १०८ वर्षाच्या संघर्षानंतर भारतीय संविधान निर्माण झाले. संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी सुरु झाली.यामुळे ब्राम्हणी व्यवस्थेचे पुरस्कृत केलेले सर्व कायदे रद्द झाले.
यापुर्वी बहुजन समाजातील प्रत्येक जात पोटजातीला शिक्षण,रोजगार,नोकरी,व्यापार ,सत्ता,संपती,राजकारण यात संधी नाकारली होती.संविधानामुळे या सर्व संधी बहुजनांना प्राप्त झाल्या.या संधीचा फायदा २६ जाने.१९५० पासुन बहुजनांच्या तिस-या पिढी पर्यंत मिळाला.यामुळे या तिन्ही पिढ्यांनी गुलामीचे जखडलेले साखळदंड तटातटा तोडले.प्रत्येक क्षेत्रात बहुजन व स्त्रियांनी आपली काबिलियत सिध्द केली.वैदिकांनी लाटलेले १००% प्रतिनिधित्व संविधानामुळे कमी झाले.यातील १०० पैकी ४९.५ वाटा संविधानाने कायद्याने बहुजनांना दिला….
या गोष्टींचा पोटशुळ ब्राम्हणी व्यवस्था मानणारे व संवैधानिक व्यवस्था नाकारणा-यांच्या पोटात उठला.व त्यांनी अगदी शांत डोक्याने प्लॅनिंग करुन संवैधानिक ढाचा उखडण्यास सुरुवात केली.
ज्या बहुजनांना संवैधानिक अधिकार मिळाले,ते गाफील राहिले.बहुतांश बहुजन समाजातील शिक्षित,पाढरपेशी व नवनिर्मित धनको वर्ग साडी,गाडी,माडी(बंगला) यात मश्गुल राहिला.अचानक धनप्राप्ती झालेल्या दरिद्री माणसासारखी बहुसंख्य बहुजनांची अवस्था झाली.त्यांनी आपआपली व्यवस्था पाहिली.
ज्या महापुरुषांच्या त्याग व समर्पणामुळे व विचारधारेमुळे हे सर्व वैभव प्राप्त झाले त्या महापुरुषांच्या त्याग व समर्पणाचा विसर या बहुसंख्य शिक्षित वर्गाला पडला.बहुसंख्य बहुजन प्रचारक होण्याऐवजी भौतिक सुखामागे पळत राहिला…बहुजन महापुरुषांच्या विचारधारेचे प्रचारक कमी झाले.ते पण गट,तट,जात,पोटजातीत विभागले गेले अन आम्हीच योग्य असा अविर्भाव ठेवल्यामुळे इथेच घात झाला.
🟣वैदिकांनी डाव साधला
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १०८ वर्षाच्या संघर्षाने या वैदिक शक्तीपुढे आव्हान उभे केले.इंग्रजांच्या राजवटीत प्रशासकीय मांड बसविण्यासाठी मनुच्या कायद्यांना फाट्यावर (नाकारत)मारले.अन या ३.५% लोकांनी काळाची पावले ओळखली.आणि १९२५ ला आर.एस.एस.नावाची एक संघटना ब्राम्हणी व्यवस्था मजबुत करण्यासाठी कॉंग्रेस मधल्या उच्चभ्रु ब्राम्हणांनी निर्माण केली.
ज्या विचारधारेकडे जनमत,त्या विचारधारेकडे जनसमर्थन असते.ज्याच्याकडे जनसमर्थन त्या विचारधारेची व्यवस्था असते.ज्या विचारधारेची व्यवस्था त्याची सत्ता असते.ज्या विचारधारेची सत्ता असते तिच्याकडे निरंकुश अधिकार असतात.
जनसमर्थन मिळविण्यासाठी प्रचारकांची भलीमोठी निष्ठावंत,त्यागी,समर्पित कार्यकर्त्यांची प्रशिक्षित फळी लागते.
ब्राम्हण व ब्राम्हणवाद्यांची व्यवस्था हजारो वर्ष भारतावर होती व आहे.त्यांच्या व्यवस्थेला संविधानामुळे खिंडार पडणार व त्यांच्या महापुरुषांनी निर्माण केलेली व्यवस्था खिळखिळी होणार अशी खात्री पटताच काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंतचे सगळे ब्राम्हण एकत्र आले.
यात आर.एस.एस.शी प्रत्यक्ष संबंधित ते “सनातनी ब्राम्हण” व आर.एस.एस.शी संबंध नाहीत असं दाखविणारे “पुरोगामी ब्राम्हण” या दोघांनी ब्राम्हणी व्यवस्था व ब्राम्हणी राष्ट्र प्रस्थापित करण्यासाठी ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या आर.एस.एस. ला प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष खतपाणी घातल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत
डॉक्टर,वकील, प्राध्यापक,शिक्षक, इंजिनिअर,सरकारी कर्मचारी,अधिकारी, व्यापारी,पुजारी, पुरोहित,संत,महंत एकत्र आले.विषमतेची व्यवस्था पुर्नप्रस्थापित करण्यासाठी आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा नियमितपणे देऊ लागले.
शिक्षित ,पांढरपेशी,बुध्दिवादी वर्ग संविधानविरोधी विचारधारा प्रस्थापित करण्यासाठी आपला सुटीचा प्रत्येक दिवस बहुजन समाजातील लोकांमध्ये घालवु लागले.
त्यांना संघाच्या शाखांमध्ये बोलवु लागले..सांघिक खेळ खेळवु लागले.गोड आवाजात संस्कार वर्ग बहुजनांच्या वस्त्यांत भरवु लागले.प्रशिक्षण वर्गात खोटा इतिहास सांगु लागले.शेकडो वर्ष मोगलांची चाकरी करुन पोट भरणारी ही जमात मुसलमान विरोधी विषारी गरळ बहुजनांच्या माथी मारु लागले.मतलबासाठी ब्राम्हणी धर्माची व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी बहुजनांच्या गळी संघाच्या शाखांमध्ये हिंदु…मुसलमान…हिंदु …. मुसलमान करु लागले.बहुजनांच्या तरण्याबांड पोरात खोटा राष्ट्रवाद भिनवु लागले.संस्कृतीच्या नावाने चौकाचौकात बहुजन पोरांकडुन गौरी गणपती बसवु लागले.धार्मिक उन्माद वाढवु लागले.
एक पिढीच्या समर्पणाने पुढील अनेक पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकत त्यांनी त्यांची स्वत:ची उच्चशिक्षित तरणीबांड पोरं,पोरींना नोक-या न लावता पुर्णवेळ कार्यकर्ता म्हणुन आर.एस.एस.ला देऊ लागले.त्यांच्या उच्चविद्याविभूषित मुलांनी देखील आर.एस.एस.ची Requirement पाहुन स्वतःच्या जीवनाची आहुती देण्यास मागेपुढे पाहिले नाही
ब्राम्हण राष्ट्र निर्माण करता यावे यासाठी ब्राम्हणेतरांची पोरं या कामासाठी वापरता यावीत म्हणुन आर.एस.एस.ने अनेक शाखा निर्माण केल्या.या शाखांमध्ये बहुजनांच्या पोरांचे संविधान विरोधात ब्रेन वॉश करण्यात आला.बहुजन समाजातील विद्यार्थी,युवक,बेरोजगार, डॉक्टर, प्राध्यापक, वकील, इंजिनिअर,शिक्षक,कामगार कर्मचारी,राजकारणी यांच्यासाठी वेगवेगळ्या संघटना निर्माण केल्या. यांच्या षडयंत्राला मात्र आमचे बहुजन बळी पडत गेले.मनुस्मृतीच्या कायद्याने ज्यांना माणुस म्हणून जगण्याची मुभा नव्हती त्या लोकांची नवी पिढी मनुस्मृतीचे गोडवे गाऊ लागली.
ब्राम्हणी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी यांनी बहुजन महापुरुषांची पुजा अर्चा,जयंत्या मयंत्या सुरु केल्या.सिव्हिल हॉस्पीटल व इतर अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी गरजु व गरीब लोकांसाठी आपल्या वेतनातील पैशातुन खास फुलपगारी माणसं नेमुन अन्नछत्र सुरु करुन बहुजन गरजवंतांच्या मनात स्वतः विषयी अनुकंपा निर्माण केली.शाळा,कॉलेज निर्माण केली.लोकशाहीच्या चारही स्तंभात म्हणजे…… (शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था, मिडिया) यात त्यांच्या विचारधारेची माणसं घुसवली.त्यांच्याद्वारे गरीब,गरजु व्यक्तींना मदत करुन ,पुतळा मावशीचे खोटे प्रेम दाखवून संवैधानिक लोकशाहीचे चारही स्तंभ पोखरले.आणि निरंतर प्रचार प्रसार करुन संविधानाचे लाभार्थी असलेल्या बहुजनांना त्यांच्या विचारधारेचे कार्यकर्ते, हितचिंतक बनवले.आणि याच कार्यकर्ते, हितचिंतकांतुन प्रचारक नेमुन त्यांच्यामार्फत बहुजन समाजात घुसुन ,बहुजन समाजाचे जनसमर्थन प्राप्त केले.
आमच्या बहुजन महापुरुषांनी निर्माण केलेली आमच्या बहुजनांच्या भल्याची व्यवस्था आमच्याच बहुजनांकडुन उध्वस्त करवुन घेतली.आज त्यांच्याकडे प्रचंड जनसमर्थन असल्याने ते संविधान बदलण्याची भाषा उघडपणे,निर्भय व निर्भिडपणे करत आहेत.संविधानविरोधी वक्तव्य करुन,विषारी भाषा वापरुनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.यालाच निरंकुश ब्राम्हणी व्यवस्था म्हणतात.
🔥अवैदिकांनी संधीची माती केली
ब्राम्हणी व्यवस्थेच्या पुरस्कर्त्या कार्यकर्त्यांनी संवैधानिक व्यवस्था नष्ट करण्यासाठी व त्यांची व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी जी मेहनत घेतली, त्याच्या १/६ जरी काम आमच्या बहुजन तरुण,तरुणी, विद्यार्थी,युवा, बेरोजगार,निवृत्त कर्मचारी, शिक्षक, पांढरपेशी वर्ग,कामगार,अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक,वकील,व्यापारी,राजकारणी,लेखक, साहित्यिक यांनी त्यांच्यासारखे संघटितपणे राष्ट्रीय पातळीवर केले असते तर आज मजुर,शेतकरी,कर्मचारी,उध्वस्त झाला नसता.या ८५% बहुजनांचे जनसमर्थन आम्हाला असते.आमची व्यवस्था असती.आमची सत्ता असती.आमच्यावर मागण्याची,उपोषण करण्याची वेळ आली नसती.खाजगीकरणामुळे आमच्या नोक-या संपल्या नसत्या,मोफत शिक्षण विकत मिळाले नसते.कौंटुबिक समस्या निर्माण झाल्या नसत्या….बहुजनानी स्वतः व स्वतःची तरुण पिढी सुरक्षित कोषात ठेवली.आज दुर्देवाने हा सुरक्षित कोष टराटरा फाटत चालला आहे.ही वस्तुस्थिती पाहुन हृद्य विदिर्ण होत आहे
🍀बहुजनहो,अजुनही वेळ गेलेली नाही..
या ब्राम्हणी व्यवस्थे विरोधात काही संघटना ,काही बहुजन प्राणपणाने लढत आहेत.राष्ट्रीय पातळीवर संघटित शक्ती निर्माण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करीत आहेत.त्यांना यशही प्राप्त होत आहे.बहुजन समाज या संघटनांच्या कार्यकर्त्यांकडे व नेतृत्वाकडे आशेने व अपेक्षेने पहात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत