बुद्धवासी ???
अनेक ठिकाणी आपण बघतो की, बुद्धवासी हा शब्द सर्रास बोलताना किंवा अनेक ठिकाणी पुण्यानुमोदन कार्यक्रमाच्या बॅनरवर आपल्याला दिसून येतो. पण याचा अर्थ विचारला तर कोणालाच सांगता येत नाही.
म्हणजेच अज्ञानामुळे हा शब्द बुद्धिजिवी वर्गाकडून वापरला जातो आणि इतर बांधव त्याचं अंधानुकरण करतांना दिसतात…..
आपण धम्माचे अनुयायी म्हणवतो व इतरांची नक्कल करतो, हे ठीक नाही. भटाळलेल्या लोकांमधे एखादा माणूस मयत झाला की: स्वर्गवासी, कैलासवासी बोलतात यामुळे बौद्ध समाजाचे लोक बुद्धवासी हा शब्द बोलायला लागले. भटाळलेल्या लोकांच्या मेंदूमधे ब्राम्हणांनी स्वर्ग, नरक या संकल्पना भरलेल्या असल्यामुळे ते कोणी मृत्यु पावलं की स्वर्गवासी झालं असं बोलतात किंवा कैलास हे एक शंकराचं ठिकाण आहे म्हणून कैलासवासी म्हणजे कैलासात म्हणजेच शंकराकडे गेला असं समजतात.
वास्तविक शंकर हा कृषी संस्कृतीचा, गण व्यवस्थेचा अवैदिक नायक होय. परंतु ब्राम्हणांनी त्याचं ब्राम्हणीकरण करून त्यांची व्यवस्थेला अनुकूल देवता म्हणून मांडणी केली. असो !
पण बौद्ध लोक हे सर्रास बुद्धवासी हा शब्द वापरू लागले. बुद्धवासी म्हणजे मयत माणूस हा बुद्धांकडे गेला की काय हा प्रश्न निर्माण होतो. भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे व्यक्तीचा मृत्यु झाला की, त्याच शरीर पंचतत्वात विलीन होते (पृथ्वी, आप, तेज, वायु व चेतना), तसेच बुद्धांनी स्वर्ग, नरक या संकल्पना नाकारल्या आहेत. यामुळे आपण स्वर्गवासी हा शब्दसुद्धा वापरू नये.
त्यामुळे बुद्धवासी हा शब्द वापरण्यापेक्षा त्या ठिकाणी “कालकथीत” किंवा “स्मृतीशेष” हे शब्द वापरणे योग्य ठरेल.
“कालकथीत” या शब्दाचा अर्थ असा की, जीवन जगून काळाच्या पडद्याआड गेलेला. “स्मृतीशेष” म्हणजे ज्या व्यक्तीच्या केवळ आठवणी शिल्लक आहेत.
म्हणून सर्वांनी चुकीच्या पद्धतीने वापरात आलेला शब्द काढून योग्य शब्द “कालकथीत” किंवा “स्मृतीशेष” शब्द वापरावा. तसेच आपण धम्मात जे तर्क न लावता घुसवण्याचा प्रयत्न करीत आहोत यावर कुठं तरी आळा घालण्याचं काम करणे आवश्यक आहे….✍️
लेख कुणाचा होता माहिती नाही पण त्यात धम्म संस्कार यानुसार पोस्टमध्ये किरकोळ दुरुस्ती करुन सदर लेख शेअर केला आहे.
याबद्दल उपासकांनी नोंद घ्यावी म्हणून गृपच्या सदस्यांनी आपल्या सर्व गृप वर व फेसबुकवर ही पोस्ट शेअर करावी, तसेच याबद्दल नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये प्रचार करावा.
= भीमराव तायडे,
नांदुरा (बुलडाणा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत