देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठशैक्षणिक

लोकशाहीस आवश्यक गोष्टी

लोकशाहीची व्याख्या निरनिराळ्या ग्रंथकारांनी निरनिराळी केलेली आहे. _वॉल्टर बजेट याने “लोकशाही म्हणजे विचारविनिमय, चर्चा करून सरकार चालविणे” अशी केली आहे. तर अब्राहम लिंकन याने “लोकांचे लोकांनी व लोकांकरिता चालविलेले सरकार”_* अशी व्याख्या केली आहे. माझी लोकशाहीची व्याख्या निराळी आहे.
*_लोकशाही म्हणजे जिच्यामुळे रक्तपात न होता आर्थिक व सामाजिक क्षेत्रात बदल घडून आणता येतात अशी पद्धत किंवा सरकार होय. ही गोष्ट घडून आली तरच ती खरी लोकशाही होय._*

*_लोकशाहीस आवश्यक गोष्टी._*
लोकशाहीमध्ये खालील गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत :

*१. वर्गभेद नकोत*
_लोकशाही विशिष्ट अधिकार असलेला, पिळवणूक झालेला, दबलेला असे वर्ग नसावे. वर्ग विग्रहावर आधारलेले समाज अस्तित्वात असेल तर रक्तमय क्रांती होईल. *दुभंगलेले घर एकटे उभे राहू शकत नाही, असे लिंकन म्हणतो. लोकशाहीला हे भेद म्हणजे मोठी अडसर आहे.*_

*२. विरोधी पक्ष हवाच*
_*लोकशाही यशस्वी होण्यास चांगला विरोधी पक्ष हवा.* इंग्लडमध्ये पक्षनिष्ठ राजकारणास कमी भाव आहे. आपल्याकडे दर पाच वर्षांनी मतदारांकडे जाण्याची सवलत ठेवली आहे. *विरोधी पक्षाला सरकारने कृत्याची खात्री करून दिली पाहिजे. आपल्याकडील विरोधी पक्षाला कमी प्रसिद्ध देतात; व सरकारी पक्षाची फाजील प्रसिद्धी करतात.* हे कसे काय घडते ते समजत नाही. *लोकशाहीला हा पक्षपात पोषक ठरत नाही. शिवाय वृत्तपत्रे तर विरोधी पक्षाला अगदी तुच्छ लेखतात* याच्याउलट, इंग्लडमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्याला पगार देण्यात येतो. *विरोधी पक्षामुळे सरकार कुठे चुकते ते कळते.* त्यामुळे तिकडे त्यासाठी पैसे खर्च करण्यात येतात._

*३. शासन समता*
_*लोकशाहीत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कायद्यात व राज्यव्यवस्थेत समानता असली पाहिजे.* एखाद्याला व्यापार करावयाचा तर लायसेन्स हवे ते तत्व मान्य असते. एकदा इसम लायसेन्स मागण्यासाठी मंत्र्याकडे गेला तर तो मंत्री अगोदर त्याच्या टोपीकडे पाहतो. आपल्या पक्षाचा असला की त्याला चटकन लायसेन्स मिळते. दुसरा कोणी गेला तर मिळत नाही. तीच गोष्ट कायद्याच्या बाबतीत. आपल्या पक्षांच्या सभासदावर खटला असला तर तो काढून टाकावा किंवा दुसरीकडे चालवावा असे प्रयत्न होतात. *अशा गोष्टी झाल्या तर मोठा गोंधळ उडेल.* अमेरिकेतही पूर्वी अशी पद्धत होती पण ती लोकशाहिस पोषक नसल्याचे आढळून आल्याने ती बंद झाली आहे._

*४. तत्वांस नीती – धैर्याची जोड*
_*लोकशाहीला घटनात्मक पण नैतिक मूल्यांचा आदर असला पाहिजे.* अध्यक्षपदासाठी जॉर्ज वॉशिंग्टनने दुसऱ्या तिसऱ्यांदा उभे राहण्यास नकार दिला होता. तो म्हणाला, *वंशपरंपरेने मला अध्यक्ष व्हावयाचे नाही किंवा हुकूमशाही व्हावयाचे नाही. दरवर्षी मीच उभा राहिलो तर घटनेतील तत्वांना किंमत काय राहणार?”* लोकांच्या अलोट भक्तीमुळे जॉर्ज वॉशिंग्टन पुन्हा निवडून आला पण त्याने घटनेतील तत्वांचा विसर पडू दिला नाही._

५. बहुमतवाल्यांची अल्पमतवाल्यांवर हुकूमत नको
लोकशाही राबवायची असेल तर बहूमतवाल्या पक्षाची अल्पमतवाल्या पक्षावर सारखी हुकूमत असता कामा नये. अल्पमतावाल्यांना त्याबद्दल भयही वाटता कामा नये. आपण अल्पसंख्यांक असलो तरी सुरक्षित आहोत असे त्यांना वाटले पाहिजे.

   *६. सामाजिक नीतिमत्ता*
 _लोकशाहीस सामाजिक नितीमत्ताही लागते. सामाजिक जीवनात कायद्याची ढवळाढवळ नको असे लोकांना वाटते. *आपल्याकडे सामाजिक नीतिमत्ता पार गेलेली आहे.*_

   *७. अन्यायाविरुद्ध प्रतिकार*
 _*जनतेने नेहमी अन्यायाविरुद्ध जागरूकता दाखविली पाहिजे.* दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहात आज गोरेही सामील होतात, याचे कारण अन्यायाची चीड आहे. *ज्यांच्यावर अन्याय होत आहे, ते लोक अन्याय दूर न झाल्यास क्रांतीच्या मार्गाने जाण्याचे ठरवितात. तशी प्रवृत्ती होते.*_

संदर्भ :
प्रबुद्ध भारत ता. ०२/०३/१९५७ (पुणे येथे १९४५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण)

संकलन : महेश कांबळे
संविधान प्रचारक/प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!