लातूरमध्ये संजय बनसोडेच्या घरापुढे छावा संघटनेची निदर्शने

राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारली आहे, त्यामुळं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया गेली आहेत. मराठवाड्यातही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात छावा संघटना आक्रमक झाली आहे. दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीनं मंत्री संजय बनसोडेंच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळाबाबत कोणताही निधी देण्यात आला नाही. यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पीक नाही, शिवारात पाणी नाही, यामुळं सरकारनं यावर गांभीर्याने विचार करत तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी छावा संघटनेनं केली आहे. मंत्री संजय बनसोडे हे ध्वजारोहणासाठी घरातून बाहेर निघाले होते. त्याच वेळेस छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर येऊन आंदोलन करत त्यांची गाडी अडवली. संजय बनसोडे यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत त्यांचे निवेदन स्वीकारलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत