मला बुद्ध का आवडतात ?
एकमेव बुद्ध हे असे मार्गदाता आहेत की ज्यांच्या हाती शस्त्र नाही, किंवा जे हिंसक नाहीत, ज्यांनी कुणाचा वध किंवा हत्या केल्याचे प्रमाण नाही.
बुद्ध आशीर्वाद देत नाहीत, बुद्ध शापही देत नाहीत.
बुद्ध कोंबडे, बकरे खात नाहीत, बुद्ध नवसालाही पावत नाहीत. बुद्ध अगरबत्ती, मेणबत्तीही मागत नाहीत.
बुद्ध आस्तिक नाहीत, नास्तिकही नाहीत, बुद्ध वास्तववादी आहेत.
बुद्ध म्हणजे आचार, विचार, रित आहे, बुद्ध म्हणजे वास्तव आहे.
बुद्ध मार्ग दाता आहेत, जगण्याची आदर्श शैली म्हणजे बुद्ध.
बुद्ध कोणाला पावत नाहीत. कोणावर कोपतही नाहीत, बुद्ध कोणाला आशीर्वाद देत नाहीत. कोणाला शापही देत नाहीत.
बुद्ध कोणाच्या अंगातही येत नाहीत. अंगात येणारे देव,भूत, प्रेत आत्मा यांचं अस्तित्व मात्र नाकारतात. ते स्वतःला देव म्हणवून घेत नाहीत.
बुद्धांना पुजा नकोय. ते कुणालाही भीती दाखवत नाहीत, ते जगण्याचा मार्ग दाखवतात. कारण बुध्द मुक्तीदाता नसून, मार्गदाता आहेत.
कुणाचाही द्वेष न करणे म्हणजे बुद्ध, खरे बोलणे म्हणजे बुद्ध, द्वेषाला प्रेमाने उत्तर देऊन शांतता प्रस्थापित करायला बुद्ध सांगतात.
बुद्ध माणसाच्या मनाला महत्त्व देतात. मन चांगले करावे असे सांगतात. मनात वाईट विचार येऊ देऊ नयेत असे सांगतात.
बुद्ध कर्माला महत्त्व देतात. चांगले कर्म करा, वाईट कर्म करू नका असे बुद्ध सांगतात.
बुद्ध बुद्धीला महत्त्व देतात, पण बुद्धीपेक्षा शील, नैतिकतेला जास्त महत्त्व देतात.
अत्त दिप भव: याचा अर्थ कुणाचेही अनुकरण न करता स्वयंप्रकाशीत व्हा व माझेसुध्दा अनुकरण करु नका. चिकित्सक व्हा. सम्यक बुद्धीने विचार करा असे बुद्ध सांगतात.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत