बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक दृष्टिकोन
दत्ता गायकवाड
सोलापूर 7588266710
मानवी उन्नयाचे याचे साधन म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाकडे पाहिले समाज परिवर्तनाचा विचार पारंपारिक शिक्षण पद्धतीत नसल्याने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुसटशाही स्पर्श झाला नाही मग व्यक्तीच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाचा प्रश्न तर दूरच राहील म्हणून मूल्याधिष्ठ शिक्षण हेच बाबासाहेबांचे ध्येय सूत्र होते विषमताधिक्षित शिक्षणाने देशाचे प्रचंड नुकसान झाले यांनी धर्मशास्त्र निर्माण केली त्यांनी नीतिशास्त्र चा अवलंब कधीही केला नाही शिक्षण व ज्ञान यांच्याशी तर नीतीशास्त्राचा घनिष्ठ संबंध आहे समान शिक्षण नीती शिवाय यांनी राष्ट्रसंकल्पनेच्या उद्धघोष केला तो वांझ ,होता असे म्हटले पाहिजे म्हणूनच बाबासाहेबांनी स्त्री-पुरुषासाठी समान शिक्षण या तत्त्वाचा पुरस्कार केला.
शिक्षण घेऊन उच्चपदी नोकरी करणाऱ्यांना बाबासाहेबांनी सुनावले की आपल्या दरिद्री व अज्ञानी बांधवांची सेवा करणे हे कर्तव्य आहे बडे हुद्द्याच्या जागी गेल्यावर त्या सुशिक्षितांना आपल्या अशिक्षित बांधवांचा विसार पडतो याचे कारण त्यांच्या स्वतःच्या समाजाविषयी आपुलकीची भावना नाही त्यांच्या ठिकाणी आपल्या बांधवाबद्दल कळकळ व तळमळ नाही जर त्याने आपले असंख्य बांधवाकडे योग्य लक्ष दिले नाही तर समाजाचा ऱ्हास होईल शिक्षण आणि समाज, शिक्षण आणि माणुसकी, शिक्षण आणि चारित्र्य असा परस्पर संबंध बाबासाहेबांना अभिप्रेत होता त्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही.
दत्ता गायकवाड
सोलापूर
7588266710
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत