महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला इंग्रजी धम्मग्रंथ दि बुद्धा अँड हिज धम्म कोणत्या बौद्ध वाङमयाच्या आधारावर लिहिला गेला आहे ?

मानिक वानखेडे,

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला दि बुद्धा अँड हिज धम्म हा इंग्रजी धम्मग्रंथ –
१) बुद्ध चरित्र, अश्वघोष ९०
२) अंगुत्तर निकाय २८
३) दीघनिकाय २७
४) मज्झिमनिकाय ४१
५) संयुक्त निकाय २२
६) खुद्दक निकाय २३२
७) धम्मपद २१०
८) इतर पुस्तके
(मिलिंद प्रश्न ) ‌ २२
९) धम्मपद समिक्षण ५
१०) विनय पिटक १९
————————
एकूण. ६९६
संदर्भ दिलेले आहेत.
हा पुरावा THE BUDDHA & HIS DHAMMA ह्या इंग्रजी धम्मग्रंथात D C Ahir ह्यांनी Foreward / 9
II
मध्ये उल्लेख करताना म्हणतात, वरील संदर्भ आदरणीय भदंत आनंद कौशल्यायन ह्यांनी १९६० मध्ये हिंदू अनुवाद करतांना मोठ्या परिश्रमाने ४६४ माध्यमातून शोधून काढले आहेत.‌
हे आपण स्वतः इंग्रजी धम्मग्रंथात दिलेल्या Foreward / 9 मध्ये पाहू शकता.
ह्यावरून लक्षात येते की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या इंग्रजी धम्मग्रंथात अभिधम्म ह्या ग्रंथातील एकही प्रकरण घेतलेले नाही.
दुसरे म्हणजे जरी वरील पुस्तकांतून घेतले असले तरीही ते सत्यच आहे असे समजून घेऊ नये. त्यात अनेक चमत्कारिक कपोलकल्पित प्रसंग टाकलेले आहेत. ते आपण स्वतः आपल्या जिज्ञासूपणा, चौकसपणा आणि विवेकबुद्धी ने तपासून घ्यायचे आहे. म्हणूनच ते त्या धम्मग्रंथातील परिचय ह्या सदरात अगदी दुसऱ्या पैराग्राफ मध्ये म्हणतात —
निकायांवर अवलंबून राहून बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे, असे आढळते. जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी अडचण निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतिशय युक्त ठरणार नाही.

मानिक वानखेडे, वर्धा
9860761826
धम्म संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!