नळदुर्ग येथे बौद्ध विहार , बसवेश्वर महाराज सृष्टी , वंसतराव नाईक स्मारका सह नळदुर्ग तालुक्याचा प्रश्न मार्गी लावणार : – राणा पाटील
लाडकी बहीण योजना ही कायम स्वरूपी : – अर्चनाताई पाटील
अर्चनाताई यांच्या हस्ते १००० साड्यांचे करण्यात आले वाटप
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या महिलांचा सन्मान वाढविण्याचे काम प्रामाणिक पणाने केलं आहे महिलांचा आत्मसन्मान वाढला पाहिजे हा हेतू लक्षात ठेऊन आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली आहे , ही योजना कायम स्वरूपी आसुन दरमहा १५०० रुपये प्रमाणे वर्षाला १८००० हजार रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहेत , विरोधक ही योजना बंद पडणार आहे अशा प्रकारचा भास नागरिकात पेरत आहेत परंतू महिलांच्या उत्कर्षासाठी अनेक योजना चालू करून नळदुर्ग इतिहासात १०,००० बेरोजागाराना त्यांच्या हाताला काम मिळणार आहे .
याच बरोबर बौद्ध विहार , महात्मा बसवेश्वर महाराज सृष्टी वसंतराव नाईक स्मारक , नविन पाईप लाईन , पाणी टाकी एम आय डी सी यांच्या सह नळदुर्ग तालुक्याचा प्रश्न मार्गी लावणार आहोत आसे परखड प्रतिपादन तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले .
नळदुर्ग येथे अंबाबाई मठात नळदुर्ग शहरात गरीब महिलांना राणा जगजितसिंह पाटील व अर्चनाताई पाटील यांच्या वतीने साड्या वाटप करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते .
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कदापी बंद होणार नाही कारण ही योजना महायुती सरकारने बंद पाडण्यासाठी चालू केली नाही माझ्या लाडक्या नंदानी घाबरून जायचं नाही
आसे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी केले तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील व अर्चनाताई पाटील यांचे आगमन होताच महिलांनी गुलाब पुष्पाची उधळण करत या दोघांचं स्वागत केले
यावेळी भाजपाचे नेते सुशांत भुमकर , नेते रणजितसिंह राजा ठाकुर , माजी नगरसेवक संजय बताले , माजी प्रभारी नगराध्यक्ष नय्यर जाहागीरदार , शहराध्यक्ष धिमाजी घुगे , पद्माकर घोडके , गणेश मोरडे माजी चेअरमन दत्तात्रय कोरे , संजय विठ्ठल जाधव , बबन चौधरी श्रमिक पोतदार , सागर हजारे , निरंजन राठोड , डॉ स्वातीताई जितेंद्र पाटील , कल्पनाताई गायकवाड , छमाबाई राठोड बबलू रणे , पांडु पुदाले , बंडु पुदाले , संभाजी कांबळे , सह महायुती चे भरगच्च कार्यकर्ते उपस्थित होते . कार्यक्रम संपल्यानंतर १००० महिलाना स्वःत अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आली .
सागर डुकरे यांनी रांगोळीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनांची प्रतिकृती काढली आसुन सागर डुकरे यांचे आमदार राणा पाटील यांनी डोक्यावर हात ठेवून कौतुक केले कार्यक्रमाच्या स्थळा समोरील रांगोळी हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माधुरी पद्माकर घोडके यांनी केले तर शेवटी आभार कल्पनाताई गायकवाड यांनी मानले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत