राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थानी सेवा करून स्वःत कौशल्य विकास साधावा : प्राचार्य ढोकळे
भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
लोहारा येथील म.शि.प्र.मंडळ संचलित भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात “राष्ट्रीय सेवा योजना दिन” साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य पुरस्कार प्राप्त व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. रामदास ढोकळे यांनी विद्यार्थ्यांना रासेयोचे ध्येय, उद्दिष्ट, महत्त्व, नियम याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले व वर्षभरात होणाऱ्या नियमित कार्यक्रमाचा उहापोह केला. त्याचबरोबर स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्य शिक्षण हे सर्व स्वयं सेवकामध्ये रुजविण्यात रासेयो यशस्वी झाली असून, सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा तसेच राष्ट्र व समाजा प्रती जबाबदारीचे कार्य करणारा रासेयो हा अभिनव उपक्रम आहे, म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावर्षी वेगवेगळ्या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची उदाहरण देऊन येणाऱ्या काळात स्वयंसेवकाने प्रत्येक शिबिर व कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवून स्वतःचा कौशल्य विकास करावा. असे आव्हानही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
येणाऱ्या काळात वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही रासेयोची सुविधा महाविद्यालयात उपलब्ध करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवराच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर हे होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. अभिजीत सपाटे व अंतर्गत मूल्यांकन समन्वयक प्रा.डॉ.प्रशांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. मोरे एम. एस. यांनी तर सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र पात्रे व आभार प्रा. डॉ. सरवदे एस.टी.यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत