ट्रोलर्स की विचारवंत ?
राजेंद्र पातोडे
‘वंचित बहुजन आघाडी’च्या ‘जवाब दो’ आंदोलन राज्यातील कथित विचारवंत आणि पुरोगामी व्यक्तींच्या घरांपर्यन्त पोहोचले असून राजकिय पक्षाचे जनप्रतिनिधी आणि राखीव जागेचे लाभार्थी ह्यांना देखील जाब विचारला जात आहे.संदर्भ आहे संवैधानिक हक्क अर्थात् आरक्षणाचा.त्याचा प्रतिवाद करु शकत नसल्याने वंचीतचे कार्यकर्ते ह्यांची आंदोलने लक्ष्य करून उलट सुलट लिखाण केले जाते आहे.
मुळात कुठ्ल्याही आंदोलनात तोडफोड, शिवीगाळ, काळे फासणे, धमकावणे असे काहीही घडले नाही. अचानक उठून कार्यकर्ते कुणाच्या घरी गेले नाहीत तर आंदोलन जाहीर करून कथित विचारवंत आणि पुरोगामी व्यक्तींच्या घरी गेलेत. अपेक्षित होते की ही मंडळींनी लोकशाही पद्धतीने त्यांची भूमिका मांडावी. राहुल गांधींच्या आरक्षण संपविण्या विषयक वक्तव्य, कर्नाटक आणि तेलंगणा मध्ये काँग्रेसच्या सरकारांनी अनुसुचित जाती जमातीचा हक्काचा १४००० कोटी निधी वळविणे, अनुसूचीत जाती जमाती आरक्षण मध्ये वर्गीकरण आणि क्रिमीलेयर लागू करण्यासाठी नेमलेल्या समिती पासून ते लोकशाही संविधान बचाव साठी काँग्रेसला मतदान करा ही भूमिका ह्यावर चर्चा आणि उत्तरे अपेक्षित होती.कारण लोकसभे पासून ही मंडळी सातत्याने वंचीतला भाजपची बी टीम ठरवत होते.माञ हेच लोक कधीच शरद पवारांनी २०१४ साली बाहेरून पाठिंबा देवून भाजप सरकार कायम ठेवले होते, २०१९ मध्ये पहाटे भाजप सोबत गेलेले अजित पवारांनी उपमुख्यमंत्री होत सिंचन घोटाळ्यात क्लीन चीट मिळवली आणि पुन्हा परत येवून मवीआ मध्ये उपमुख्यमंत्री बनले त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही. सिंचन घोटाळ्यात वापरलेला निधी अनुसुचित जाती जमातीचा हक्काचा निधी होता.शिवाय मविआ मध्ये असलेल्या शिवसेना ही २५ वर्षे भाजप सोबत होती.त्यांनीच भाजप वाढविण्याचे काम केले.भाजपचे खासदार असलेले नाना पटोले परत येवून विधानसभा अध्यक्ष होतात.अचानक राजीनामा दिल्याने मविआ सरकार कोसळते, पक्ष फुटतात.पटोले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होतात. काँगेस आमदार खासदार भाजपला राज्य सभा लोकसभेत मतदान करतात.मात्र त्यावर कार्यवाही तर सोडा त्याचीं नावे देखील सार्वजनिक होत नाही.सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्याचें थेट भाजपपूरक राजकारणावर ह्या कथित विचारवंत आणि पुरोगामी ह्यांना कुठलेच ऑब्जेकशन नाही.भाजप सोबत गेलेल्या आणि तीन टर्म केंद्रीय मंत्री असलेल्या रामदास आठवले किंवा आता शिंदे सेने बरोबर असलेल्या जोगेंद्र कवाडे बद्दल आपण कधी लिहिले आहे का? केवळ वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांचे विरूद्ध टोकाची भूमिका आणि विखारी मांडणी त्यामुळे हे विचारवंत आणि पुरोगामी कुठ्ल्याही पद्धतीने विचारवंत किंवा पुरोगामी उरले नाहीत तर ते संधीसाधू ट्रोलर्स बनले आहेत.वंचितचे आंदोलनाने हे उघडे पडले म्हणून त्यांनी कांगावा करायला सुरुवात केली आहे.त्या साठी ते पार स्त्री दाक्षिण्य,स्त्रियांना टार्गेट केले जाते वगेरे मायलेज घेत आहेत.विचारवंत निदान इतक्या कोत्या मानसिकतेचे असू नये.तुम्हाला प्रश्न केले जातात ते तुमची राजकीय भूमिका एकांगी आणि वर्तन पाहून.तुम्ही महिला की पुरुष ह्यासाठी नाही.खोटा नरेटीव्ह सेट करता म्हणुन खुलासा करावा.वास्तविक पाहता भाजप विरोधात लढणारे (नुसते मविआ नव्हे) सर्वांना पाठबळ देणे आणि पंक्ति प्रपंच न करता चिकित्सक पद्धतीने देशातील लोकशाही संविधान बचाव साठी प्रामाणिक भूमिका अपेक्षित आहे.ते सोडुन काँग्रेसी राजकीय प्रवक्ते असल्याचे थाटात केले जाणारे लिखाण आणि आरोप ह्या दोन्ही मुळे आपण एका विशिष्ठ पक्षाचे आणि घराणेशाहीच्या सत्तेचे जाणीवपूर्वक पुरस्कर्ते झालात. ही मंडळी कुठ्ल्याही पद्धतीने विचारवंत नाहीत किंवा पुरोगामी नाही.विचारवंत पुरोगामी असल्याची एक कसोटी असते.
विचारवंत हे विविध क्षेत्रातील विधायक, सर्जनशील विचार मांडणाऱ्या व्यक्तीमत्वाचा वर्ग असून यात सामाजिक, राजकीय, आर्थिक, पर्यावरण, ग्रामीण, कृषी, आदिवासी, पुरोगामी, समाजवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी विचारवंत असे उपप्रकार आहेत.स्वतंत्र विचाराने कुठल्याही मतप्रणालीने प्रेरित न होता विविध पुरोगामी, विचारवंतांनी आपल्या विषयाची योग्य प्रकारे, सर्वसामान्यांना समजेल या पद्धतीने मांडणी केली पाहिजे. कोणताही अभिनिवेश त्यांच्या लेखांमध्ये जाणवायला नको.प्रत्येक विषयाला न्याय देण्याची प्रवृत्ती व सर्वसमावेशक दृष्टिकोन सर्व विचारवंत, पुरोगामी ह्यांनी दाखवीला पाहिजे.अनेक प्रसंगी त्यांनी स्वत:च्या लेखा मार्फत त्यांची रोखठोक भूमिका सुद्धा जनते समोर नीरक्षीरन्यायाने मांडली पाहिजे.त्यांनी सिलेकटिव्ह होता कामा नये.
कारण हे विचारवंत, पुरोगामी समस्यांचे निराकरण करण्यासाठी तथ्ये, कारण, तर्कशास्त्र आणि संशोधन वापरतात .त्यांना त्यांची मते सामायिक करण्यात कोणतीही अडचण येत नाही.त्यांना त्यांचे विचार बदलायला लावण्यासाठी कठोर डेटा — आणि तर्कसंगत, विचारपूर्वक युक्तिवाद लागतो. तो असला कि ते मान्य करण्यात कमीपणा वाटून घेत नाही.ह्या उलट असतात ते असतात पेड आणि उस्फुर्त ट्रोलर्स.
ट्रोलिंगमध्ये, एखाद्या व्यक्तीचा उद्देश सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मद्वारे लोकांना भडकवणे, चिडवणे, उचकावणे आणि एखाद्या विषयाशी संबंधित सामान्य चर्चेत वाईट वर्तन करणे हा असतो. बहुतेक ट्रोलिंगची सुरुवात खिल्ली उडवण्याने होते, पण शेवटी ही समस्या भयंकर रूप धारण करते, जिथे लोकांना शिवीगाळ आणि धमक्याही दिल्या जातात. हया कथित विचारवंत आणि पुरोगामी ह्यांनी अशीच सुरुवात केली होती.अगदी वंचितला मतदान करू नका, वंचितला मत म्हणजे भाजपला मत असा विखार मांडला गेला. तो सभा, बैठका आणि लिखाणातून होत राहिला.असाच न्याय त्यांनी कधीही माविआ काँगेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना ह्या घटक पक्षाच्या राजकीय भूमिका आणि त्यांच्या भाजप सोबत असलेले लागेबांधे ह्यावर प्रश्न उभे केले नाहीत. उलट देशात भाजप आणि संघाला उत्तर म्हणून घराणेशाही, हिंदुत्व घेवून राजकारण करणारे काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना ह्यांना मतदान करण्याचे आवाहन केले गेले.हे कुठले पुरोगामित्व ? हयात कुठे उरला आहे विचार ? म्हणून ह्यांना या पुढे विचारवंत पुरोगामी समजले जावू नये जो पर्यंत हे सिलेकटीव्ह मांडणी बंद करीत नाहीत.सबब अशीच सिलेकटीव्ह मांडणी असेल तर त्याची उत्तरे मागितलीच जातील.त्यासाठी कथित विचारवंत आणि पुरोगामी बुरखे घालून स्वत:ला उत्तरे देण्यापासून पळ काढला येणार नाही.आता तुम्ही ठरवा की विचारवंत आणि पुरोगामी म्हणून रहायचे की ट्रोलर म्हणून राजकीय विशिष्ठ राजकीय पक्षाची गुलामी करणार आहात.कारण लोकशाहीत सर्वांना समान अधिकार आहेत.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश.
9422160101.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत