मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून न्याय मिळत नाही…डॉ. कालिदास अंकुश शिंदे
मुंबई विद्यापीठ प्रशासन व शासनाने मला कामावर रुजू करून घेण्याचा आदेश 30 सप्टेंबर,2024 पर्यंत न दिल्यास महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचे कार्यक्रमा ठिकाणी आत्मदहन करणार…
आदरणीय सर्व क्षेत्रांतील मान्यवर, शासन प्रतिनिधी, सर्व पक्षांचे प्रतिनिधी, सर्व समाजातील समाज बांधव, बहिणींनी आवाहन…
गेले दीड महिना होत आहे, शासन दरबारी व मुंबई विद्यापीठ प्रशासन, राजकीय प्रतिनिधी यांना मी आवाहन करत आहे परंतु कोणीही माझी दखल घेत नाही, न्याय मिळत नाही यामुळे न्याय मिळण्यासाठी आत्मदहन करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरलेला नाही…
आपणास मी डॉ कालिदास अंकुश शिंदे, राहणार दिघांची तालुका- आटपाडी जिल्हा -सांगली येथील असून वरील विषयास अनुसरुन खालील प्रमाणे विनंती करत आहे की,
सहाय्यक प्राध्यापक कंत्राटी कामगार रुजू होण्याचा आदेश एका दिवसातच मुंबई विद्यापीठाने कोणतेही कारण न देता तो आदेश माघारी घेतल्याने झोळी घेऊन भिक्षा मागण्याची वेळ आली आहे….
पालावर राहून भटकंती करत शिक्षणाचा संघर्ष करत BA,MA,MSW, MPhil (टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई), डॉक्टरेट PhD देशातील अग्रगण्य विद्यापीठ( टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई) पूर्ण केली. इतक्या मोठया संघर्षातून उच्च शिक्षण घेऊनही शेवटी भिक्षा मागायला जाण्याची वेळ विद्यापीठाने माझ्यावर आणली आहे. माझे जिवन अनुभव व समाज जिवन झोळी आत्मकथन लिहून जगा समोर आणले आहेत, झोळी पुस्तकाला महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांचा मोठा पुरस्कार मिळाला आहे, त्याच बरोबर अन्य मानाचे 15 पुरस्कार मिळालेले आहेत. एक तर झोळी बाजूला ठेवून शिक्षण घेऊन जिवनात बदल करून माणूस म्हणून जिवन जगायचे ही अपेक्षा होती…
आजही मला न्याय मिळत नाही कोण दखल घेत नाही आम्हा भटक्या भिक्षेकरी कोणताच आवाज नाही, संघटन नाही जे या प्रश्नांवर लढेल. न्याय मिळवून देण्यासाठी कोण पुढेही येतं नाही. जगावं की मरावं हा प्रश्न माझ्या समोर उभा आहे. वयाची उच्च शिक्षण घेत घेत चाळीशी पूर्ण होत आहे, तरीही पूर्णवेळ काम नाही.
मी डॉ. कालिदास अंकुश शिंदे मुंबई विद्यापीठातील MSW विभागात 2020 पासून कार्यरत आहे.
मुंबई विद्यापीठ कुलसचिव कार्यालयाच्या माध्यमातून MSW विभागातून 6 ऑगस्ट,2024 रोजी order no.AAQA/ICD/2024-25/889 ने ईमेल द्वारे कामावर हजर राहण्यास आदेश मिळाला, तो आदेश एका दिवसातच 8 ऑगस्ट,2024 रोजी order no.AAQA/ICD/2024-25/978 ने दुपारी 2.30 वाजता माघारी घेण्यात आला आहे.
मला कामावर रूजू होणेसाठी पुरेसा अवधी मुंबई विद्यापीठाने दिलेला नाही. मला कामावर रूजू होणेसाठी पुरेसा अवधी न देता कामावर हजर होणे अगोदर तो कामावर रूजू होणेचा आदेश माघारी घेणेत आला आहे.
माझे सोबत कामावर रुजू होण्यासाठी आदेश मिळालेले श्री. महेंद्र ढोरे सहाय्यक प्राध्यापक, कंत्राटी हे 13 ऑगस्ट,2024 रोजी कामावर रुजू झाले आहेत. त्यांना ही कामावर रुजू होण्यासाठी माझ्या सोबत आदेश मिळाल्या नंतर त्यांना साधारणपणे 8 दिवस विलंबाने MSW विभागात कामावर रुजू करून घेतले आहे. मला मात्र कामावर रुजू होण्यासाठी एकच दिवसाचा वेळ विद्यापीठाकडून देणेत आलेला आहे. MSW विभागात कंत्राटी पद्धतीने भरणेत आलेल्या सहाय्यक प्राध्यापक यांना वेगवेगळा नियम लावणेत आलेला आहे.
मी अत्यंत मागास घटकातील भटक्या जमाती मधील आहेत. माझे कुटुंबीय भटकंती करून महाराष्ट्राची लोक संस्कृती गोंधळ, जागरण लोककला सादर करून उदरनिर्वाह करीत आहेत. मी भिक्षेकरी भटक्या समाजातून PhD पर्यंत उच्च शिक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथून पूर्ण करणारा एकमेव आहे.
1 एप्रिल,2024 पासून विद्यापीठाकडून आम्हाला कामाचा ब्रेक मिळाला असल्याने माझे कुटुंबीय यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या मला कामांवर रुजू करून घेतले नसल्याने अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत.
तरी आपले माध्यमातून मला कामावर रूजू करून घेणेबाबत आदेश मिळावेत ही नम्र विनंती.
डॉ. कालिदास शिंदे
काम करत होतो
Ad-hoc Assistant Professor
MSW Department
University of Mumbai
Kalina Campus,Santacruz
9823985351
सध्या गेल्या पाच महिन्यांपासून बेरोजगार असलेने उपासमारीची वेळ आली आहे…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत