देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

चक्रव्यूहात आजची तरुणाई

मानिक वानखेडे,

आजचा वर्तमानकाळ हे आधुनिक युगाचा आहे. ह्या आधुनिक युगात तंत्रज्ञान फारच आश्चर्यजनकरित्या प्रगत झालेले आहे. ह्यात सर्वात मोठा आश्चर्यजनक शोध म्हणजे आपल्या हातातील एंड्राईड / स्मार्टफोन होय. हे सर्व विश्व अगदी आपल्या जवळ आलेले आहे. जगातील कोणत्याही देशात असलेल्या आपल्या स्वकियांशी, नातेवाईकांसोबत समोर बसल्यासारखे एकदुसऱ्यांना पाहून संवाद करता येतो. इतकी सुविधा ह्याच स्मार्टफोन मुळे झाली आहे. कोणतीही आनंदाची किंवा दुःखद बातमी क्षणात देता येते. ज्याची कोणी कधीच कल्पना देखील केली नसेल. पण ह्याच सोबत अनेक, चांगल्या, वाईट, ज्ञानवर्धक, खेळ, मनोरंजन, देश विदेशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक घडामोडी सुद्धा माहित होतात, इतक्या सुविधा त्यामध्ये आहेत.‌ परंतु ह्याच स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक डोकेदुखी सुद्धा आहेत. जसे अनोळखी नवनवीन मित्र, फोनच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार ज्यामुळे अनेकांना आर्थिक व्यवहारांचे फार मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यातही आजच्या परिस्थितीत तरूण पिढीसाठी फारच घातक आहे. म्हणजे अनोळखी मुला-मुलींसोबत होत ओळख आणि ओळखीचे रूपांतर मैत्री ! ही फारच घातक ठरत आहे असे अनेक घटनांमधून आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहे. ह्या स्मार्टफोनची एकदा का चटक लागली तर ती काही केल्या सुटत नाही. त्यांचे शिक्षणात मन लागत नाही. ब्वाॅयफ्रेड, गर्लफ्रेंड सोबत बोलल्याशिवाय राहवत नाही. त्यामुळे समाजातील होतकरू मुलामुलींचे भविष्य बरबाद होताना दिसत आहे. आपल्या आईवडिलांची ऐपत नसतानाही कमीतकमी दहा हजार रूपये किंमतीचे स्मार्टफोन, घेऊन मागतात. त्याचा रिचार्ज करण्याचा दरमहा तिनशे रूपयाचा खर्च वेगळा. जर आपल्या वडिलांनी रिचार्ज करून दिला नाही तर ब्वायफ्रेंड कडून रिचार्ज करून घेतल्या जाते. त्या रिचार्ज करण्याचा मोबदला तो कोणत्या रूपात घेत असेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. एकंदरीत ज्या स्मार्टफोन मध्ये अनेक चांगल्या, उपयोगी महत्वपूर्ण गोष्टी आहेत, तरीही त्याचा योग्य उपयोग न करता फक्त ब्वाॅयफ्रेंड, गर्लफ्रेंड सोबत तासनतास गप्पा मारल्या जातात. ह्यामुळे शिक्षणाच्या महत्वपूर्ण वयात आजची तरुण पिढी भरकटलेली आहे असे दिसून येते. विद्यार्थी शिक्षणात लक्ष न देता रात्री बे रात्री बऱ्याच वेळ पर्यंत गप्पा गोष्टी करीत असतात. ह्या मैत्रीचे रुपांतर जीवलग मैत्रीत आणि जीवलग मैत्रीचे रुपांतर लग्न करण्यात होते. त्यामुळे आईवडिलांच्या नकळत हे सर्व घडून येते. जेंव्हा मुलगा आणि मुलगी दोघेही घरातून पळून जातात तेव्हा वेळ निघून गेलेली असते.‌ अशा अनपेक्षित घटनांमुळे आईवडील नैराश्याचे जीवन जगत असतात.‌ जर त्या मुलाचा आणि मुलीची जात आणि धर्म वेगळा असेल तर त्याचा परिणाम समाजात शत्रूता निर्माण होते. त्यामुळे देशात अनेक राज्यात भयानक प्रकार घडलेले आपण बातम्यांमध्ये वाचलेला आहे. तसेच मुलीची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. असे अनेकदा फारच भयानक परिणाम त्या मुलीला भोगावे लागतात. ह्याचा मानसिक आघात मुलींच्या आईवडिलांना आणि समाजाला सुद्धा भोगावा लागतो. अशा वेळी मुलामुलींच्या आईवडिलांनी, पालकांनी फारच दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या मोबाईल मध्ये काय चॅटिंग झाले आहे, ते वेळोवेळी पाहण्याची आवश्यकता आहे. कोणाला फोनवर बोलणे झाले आहे ते सुद्धा पाहण्याची आवश्यकता आहे. मुल मुली सुद्धा ह्या बाबतीत फारच सतर्क असतात. फोनवर बोलणे केले किंवा चॅटिंग केले ते तेंव्हाच डिलीट करतात त्यामुळे आईवडिलांच्या लक्षात येत नाही. म्हणून जेव्हा ते एकांतात बोलणे करतात त्यावेळी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.‌ जरी अशा घटना घडतात तरीही फारच अल्प प्रमाणात मुल मुली प्रामाणिक पण आहेत.‌ परंतू हे प्रमाण नगण्य आहे. म्हणून खरं तर ह्यावर मुलामुलींना स्वतः गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. की ते आपल्या आईवडिलांना धोक्यात ठेवून स्वतःला तर धोका देत नाही ना ! कारण शिक्षणाचे वय निघून गेल्यावर पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणून स्वतःच प्रामाणिक राहून त्यांनी आपल्या आईवडिलांच्या इच्छेची पूर्ती करणे आवश्यक आणि महत्वपूर्ण आहे.‌ नाही तर गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. शेवटी जीवनभर पश्चात्ताप करण्याची वेळ येते.‌ म्हणून जर Social media च्या विळख्यातून बाहेर पडायचे असेल तर आजपर्यंत घडलेल्या भयानक विपरीत परिणाम लक्षात घेऊन स्वतःच बाहेर पडले तरच ही तरूण पीढी स्वतःला बरबाद होण्यापासून वाचवू शकते, आणि हीच त्यांच्यासाठी खरी कसोटी आहे.‌ अशा कसोट्या वारंवार येत नाही जीवनात फक्त एकदाच येत असतात.‌

मानिक वानखेडे, जि .वर्धा
भ्रमणध्वनी-९८६०७६१८२६/
२२/९/२०२४-

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!