तिवस्याचे हरीभाऊ खाकसे आणि बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच वैचारिक नातं-
रवी दलाल
9960627818
हरिभाऊ मोतिराम खाकसे महारपुर्यातील पहिले शिक्षक–तेव्हा महारपुरा दोन भागात विभागल्या गेला होता खाल्याखेल आणि वरयाॅखेल जुन्या बसस्टैड पासुन मकेश्वर, दलाल, यावले, बन्नोरे, माहुरे, काळंबाडे, निकाळजे,सोनटक्के,गवळी, सोनोने, या आडनावाचे घर वरर्याखेळीत यायचे म्हणजे (बकईबुढीच्या) आताच्या अवधुत मंदीरा पर्यत वरर्याखेल होती- तर फुलनबाई शापामोहनच्या घरा पासुन तर (तुकाराम कौसारे) याच्या घरापर्यत म्हणजे जयभीम व्यायाम शाळेपर्यत खाल्याखेल होती.मोहल्याच्या जुन्या फाडणी नुसार हारीभाऊ खाकसे याचे घर खाल्याखेलीत यायचे– खाकसे ,शापामोहन, गवळी, रामटेके,कौसारे, कस्तुरे, माहोरे,दलाल,मेंढे,नागदेवते, या आडनावाची घरे खाल्याखेल मध्ये होती खाल्याखेल वरर्याखेल ही ओळख 1990 पर्यत तरी कायम होती-आणि मग हळुहळु नष्ट झाली–
हरीभाऊ यानी सातवा वर्ग पास करुन अमरावतीला ईटंरशिप परीक्षा दिली——
अमरावतीला शिक्षकी टैनिंग पुर्ण केल.आणि चांदा शहरात शिक्षक म्हणुन रुजु झाले महार समाजातील पहीले शिक्षक हरीभाऊ खाकसे आणि दुसरे शिक्षक महादेव यावले मास्तर यानी (हैद्राबाद) मराठवाडा क्रांती मोर्चा चळवळीत सक्रिय भूमिका घेतली विधानसभा निवडनुकीत उभ राहण्या करीता शिक्षकी पदाचा राजीनामा दिला.
यावर हरीभाऊनी- यावले मास्तरी समजुत घातली पण शेवटी महादेव मास्तरनी राजीनामा देवुन विधानसभा निवडनुक लढवीली
आणि यावले मास्तराचा निवडणुकीत स्पेशल पराभव झाला—–
बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे वडिल
देवाजी खोब्रागडे (चांदयाचे) गर्भश्रीमंत व्यक्ती -हरिभाऊ खाकसे याची तर्कशुध्द विद्वता पाहुन देवाजी खोब्रागडे याच्याशी मैत्री जुळली—हरीभाऊ खाकसे आणि देवाजी खोब्रागडे यांच वैचारिक नात मरे पर्यत टिकल–हरीभाऊ मोतीराम खाकसे म्हणजे (उंद्रु मास्तर) नैमके कोण आहेत आणखी लिहुन स्पष्ट करतो——
हरिभाऊ खाकसे हे जेष्ठकवी ईबाहिम खान याचे आजोबा
आणि देवाजी खोब्रागडे म्हणजे बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे याचे वडिल—-
देवाजी खोब्रागडे यांना मुलगा झाला तेव्हा जन्मपत्रिका-नामकरणविधी कार्यक्रम हरीभाऊ खाकसे याच्या हस्तेच पार पडला. हरिभाऊ खाकसे मास्तरानीच राजाभाऊची जन्मप्रत्रिका तयार करुन दिली होती जन्मपत्रिके नुसार मुलाचे नाव राजाभाऊ नाव ठेवण्यात आले-पुढे बेैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आंबेडकरी चळवळीत स्वताला वाहुन घेतल आणि डाॅ बाबासाहेब आबेडंराच्या वैचारिक चळवळीला बळ दिल-
-बैरीस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना डाॅ आंबेडकरानी उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवीले—अस आपण ऐैकतो पण ते खरे नाही
डाॅ बाबासाहेब आंबेडकरानी शिक्षणाकरीता पाठवीलेल्या सर्व मुलाची यादी मााझ्याकडे आहे. पण त्यामध्ये राजाभाऊ खोब्रागडे चे नाव नाही.राजाभाऊ खोब्रागडे श्रींमत असल्याने स्व:खर्चानेच शिक्षणासाठी ईग्लडला गेले होते.बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे परत आल्या नंतर- आंबेडकरी चळवळीत मोलाच भरीव योगदान दिल ते कधीही विसरण्या सारख नाही -पण डाॅ बाबासाहेबानी शिक्षणासाठी पाठविलेले सर्व तरुण बाबासाहेबाना बेहिमान झाले पण बैरिस्टर राजाभाऊ विषम परिस्थितीत डाॅ आबेडकरा सोबत उभे राहिले आणि आबेडंकरी चळवळ जनमानसात पर्यत पोहचविण्यास मदत केली -आबेडंकरी चळवळीत काम करताना जेव्हा- जेव्हा राजाभाऊना गरज वाटली तेव्हा सल्ला मसलत करण्यासाठी हरीभाऊ मास्तराच्या भेटीकरीता तिवस्याला यायचे.
हे गुरु शिष्याच नातं हरीभाऊ जिवंत असे पर्यत टिकल–
डाॅ आंबेडकरानी 1935 साली येवला येथे घोषणा केली-मी हिंदु म्हणून जन्मलो असलो तरी हिंदु म्हणुन मरणार नाही घोषणा केली
-पंरतु कोणता धर्म घेणार हे स्पष्ट केले नव्हते.
हरीभाऊ खाकसे यानी डाॅ आंबेडकराच्या घोषणेची सर्वात आधी दखल घेतली आणि 1935 सालीच चंद्रपुरच्या मझ्झीद मध्ये मुस्लिमधर्म स्विकारला
चांदा येथील जुन्या रकबीर मझ्झीदी मध्ये मौलाना हजरत हुसेैन याच्या कडुन मुस्लिम धर्म स्विकारल्याची नौंद आहे. रिटायरमेंट नंतर
हरीभाऊ मास्तर तिवस्यात आले आणि 1970 साला पर्यत जगले. ते त्याच्या पिढीतील सर्वात विद्वान म्हणुन त्याची नौंद करावी लागेल.कुशाग्र बुध्दीमत्ता सहाशास्त्र अठरा, पुराण भगवत गीता, ज्ञानेश्वरी, कुराण,अकबरनामा -बायबल त्याच्या मुखपाठ होते–ते वाचनात नेहमी मग्न असायचे एकपाठी असल्याने -उदु आणि इग्रजी भाषेवर त्याच विशेष प्रभुत्व होत- अवधुती संप्रदायावर -चर्चा करताना अवधुती ओैव्याचा निरुपम करीत असत-अवधुती भजनाच्या 18 ओैव्या त्याच्या मुखपाठ होत्या त्याच्या विद्वेत्तेला तोड नव्हती.1935 साली धर्मात्तर करुन मुस्लिम झाल्याने
हरीभाऊ खाकसे उफेॅ (अब्दुल रहेमान )झाले. आणि मुस्लिम धर्माच्या रीतिरिवाजा नुसार नमाज अदा करु लागले -त्यानी आपला पेहराव बदलविला डोक्यावर मुस्लिम टोपी दाढी वाढवीली-तिवस्याच्या मझ्झीद मध्ये न चुकता नमाज सुरु झाला — समकालीन मीत्रवर्गावर त्याचा वैचारीक प्रभाव दिसुन येतो – समकालीन मीत्र त्याना जगतगुरु म्हणायचे-हरिभाऊ खाकसे (अब्दुल रहेमान ) याच्या वैचारीक प्रभावातुन तिवस्यातील तीन महार कुंटुबीयानी मुस्लिमधर्म स्विकारला होता
1/महादेव यावले
(बडा मंहम्मद) झाले
2/धुसाजी मकेश्वर
(छोटा मंहम्मद) झाले
3)गणपत निकाळजे हे (गफुरभाई )झाले
यानी हरीभाऊ खाकसे
(मौलाना अब्दुल रहेमान) याच्या कडुन 1948 सालीच मुस्लिमधर्म स्विकारला होता
नवमुस्लिम म्हणुन याची नेरपिंगळाई च्या मझ्झीदी मध्ये शालश्रीफळ देवुन सत्कारही करण्यात आला –
हि डाॅ आबेडकराच्या धर्मात्तराच्या आधीची घटना आहे. म्हणुन महार समाजाने अजिबात दखल घेतली नाही
दि 14 आक्टौबर 1956 साली. डाॅ बाबासाहेब आबेडंकरानी हिंदु धर्म सोडला आणि बौध्द धर्माची दिक्षा घेतली.तेव्हा लाखो करोडो महार- हिंदुधर्म सोडुन बुध्दिस्ट झाले–त्यामध्ये
महादेव यावले,
धुसाजी मकेश्वर
गणपत निकाळजे
यानी मुस्लिम धर्माचा त्याग करुन पुन्हा बौध्दधर्म स्विकारला पण हरिभाऊ खाकसे मुस्लिम धर्मात कायम राहिले—–
ते शेवट पर्यत मुस्लिम म्हणुनच जगले आणि आपल्या मुला मुलीची नावे देखील मुस्लिम रीतिरिवाजा नुसार ठेवले–
मोठा मुलगा आेमप्रकाश
याचे नाव (ईल्हाईबक्स) तर लहान मुलगा याध्वलक्य याचे नाव (जंहागीर) ठेवले– हरिभाऊ खाकसे हे मुस्लिम धर्मीय झाल्याने नवबौध्दानी रोटीबेटी व्यवहार बंद केला
आेमप्रकाश (इलाहिबक्स) शिक्षण अधिकारी झाले आणि याल्कवध्ज्ञ खाकसे (जंहागीरखान चंद्रपुर प्राध्यापक म्हणुन लागले
असताना— देखील याना बौध्द समाजातील मुली मिळत नव्हत्या या संदर्भात एक उदाहरण माझ्या नातेवाईकात घडल्याचे मला माहीत आहे
तुकाराम कोसारे,धुसाजी मकेश्वर.सुर्यभान दलाल हे आेमप्रकाश खाकसे याच्या करीता- पुनाजी गाडगे याची मुलगी बघायला पारडीला गेले -मुलगी पाहण्याचा
कार्यक्रम आटोपला प्रचंड पाऊस पडल्याने- रात्र झाली म्हणुन पुनाजी गाडगे याच्याकडे मुक्काम झाला- सकाळी नमाजची वेळ झाली आणि हरीभाऊ नमाज पडायला लागले -पुनाजी गाडगे याचा संताप एकदम अनावर झाला आणि स्पष्ट सागीतले मी मुसलमानाच्या घरात पोरगी देणार नाही—
नमाज पडल्याने ओमप्रकाश खाकसे यांचा संबध पारडीत झाला नाही जवळपास महार पट्यात हरीभाऊ खाकसे याच्या घराशी संबध नाकारण्यात आला होता- पण शेवटी राजेराम अढावु यानी आपल्या दोन मुली आेमप्रकाश आणि याल्कवज्ञ यांना दिल्या- हरीभाऊ याची दोन मुल
ओमप्रकाश (ईलाहिबक्स)
2)याज्ञव्यल्क (जहांगीर) दोघे हि उच्चशिक्षीत होते
आेमप्रकाश हरीभाऊ खाकसे हे (शिक्षण अधिकारी) पदापर्यत पोहचले तर
याल्यवज्ञ हरीभाऊ खाकसे (प्रा जहाॅगीर खान )चद्रपुरला इग्रजीचे प्राध्यापक होते आेमप्रकाश खाकसे यांचा मोठा मुलगा म्हणजे प्रसिद्ध कवी इब्राहिमखान म्हणजे देवेद्र आेमप्रकाश खाकसे याची मुस्लिम महार कांदबरी 1990 च्या दशकात प्रकाशित झाली.
इब्राहिम खान यानी मुस्लिम महार कादंबरीतुन आजोबा हरीभाऊ खाकसे याच्या धम्मात्तरीत जीवनावर प्रकाश टाकला असुन मुस्लिम महार कांदबरी मराठी साहित्यातील उत्कुष्ट कांदबरी आहे
हरीभाऊ खाकसे याचा मुत्यु 17 नोहेबर 1970 साली झाला. त्याच्या तिरडीला खांदा देण्यासाठी बौध्द समाजातुन कुणीही पुढ आल नाही कारण–डाॅ आबेडंकरानी 14 आक्टोबर 1956साली धम्मात्तर केले आणि पूर्वाश्रमीचे महार बौध्द झाले. पण हरीभाऊ खाकसे यानी मुस्लिम धर्म सोडला नाही ते मुस्लिमूधमीॅ राहिल्याने बौध्द समाजात नाराजी पसरली होती म्हणुन तिवस्यातील नवबौध्दानी हरीभाऊच्या तिरडीला खांदा देण्यास नकार दिला–आम्ही मुसलमानाला खांदा देणार नाही-असी तीव्र प्रतिक्रिया समाजातुन पुढे आली होती– तर पांरपारीक मुसलमानानी हा आमच्या रक्ताचा मुसलमान नाही तो महार आहे -म्हणुन मुसलमान देखील मयतीला आले नाहीत शेवटी खाकसे कुंटुबीयानी हरीभाऊ याची मयत उचलुन शेतात नेली- आणि मुस्लिम रितीरिवाजा प्रमाणे कबरीत मध्ये दफन केले .
17 नौहेबर 1970 रोजी वयाच्या 85 व्या वषीॅ हरिभाऊ खाकसे उफेॅ (अब्दुल रहेमान) याचा मुत्यु झाला. त्याची कबर त्याच्या शेतात आहे.
लेखक
रवी दलाल
(आठवणीतले दिवस)
पुस्तकातुन
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत