तिरुपती लाडु प्रसाद

भूषण दिगंबर वेंगुर्ले
तिरुपती बालाजीच्या लाडु प्रसादात प्राण्यांची चरबी तुप म्हणुन वापरल्याचे मला अजिबात आश्चर्यवाटले नाही किंवा धक्काबसला नाही.
गेली अनेक वर्षे अनेक गोपालक,गव्यसिध्द,गो प्रेमी ,अनेक साधु संत महंत वारंवार कंठशोष करुन हेच सांगताहेत की भारतात जेवढे दुध उत्पादन होत नाही ( गाय,म्हैस,शेळी या सर्वांचे एकत्रित धरले तरी) त्याच्या जवळपास चौपट दुध वितरण होतेय . युरीया, गोडेतेल, डिटर्जंट सगळं आपल्या पोटात दुध म्हणुन जातंय
आता दुधाचे विरजण लावले की दही होते, दह्याचे ताक ,ताकाचे लोणी आणखी लोण्यापासुन तुप होते .जे घरात लोणी कढवतात त्यांना विचारा महिन्याभराची साय जमवली व तुप केले तर मध्यम आकाराचा डबा पूर्ण भरत नाही मग भारतात सर्व नामांकित ब्रॅण्ड चे तुप देशी गायीचे वगैरे वगैरे लेबल लावलेले सहा सातशे रुपयाला किलो मिळेल का? नाही मिळणार .मुळात जेवढे दुध उत्पादन नाही त्याचा अनेक पटीत दुधाची विक्री,दही,तुप, पनीर विक्री होतेय.हे आपण लक्षात घेत नाही
आपल्या शिक्षण व्यवस्थेमुळे गायी गुरे पाळणारे घरोघरी दुध विकणारे लोक हळुहळु लुप्त होत चाललेत.जे नालायक या धंद्यात घुसलेत ते गुरांना वेगवेगळी हार्मोन्स इंजेक्शन देऊन दुध वाढीसाठी क्रुर प्रयत्न करताहेत.या इंजेक्शन चे दुष्परिणाम आपल्या #लहानपोरींवरजाणवताहेत .पूर्वी मुली १५_१६ वर्षी वयात यायच्या त्या आता १०-१२वर्षांच्या वयात येऊ लागल्या आहेत.१०-१२ वर्षांची मुलगी कॉलेज युवती प्रमाणे दिसु लागलीय .
अगदी वासरे जन्मली की वासरांना ठार मारुन दुध फक्त आपल्याला कसे राहील याचा विचार करणारे नराधम धंदेवाईक पण यात आहेत .
तेलाचेहीतसेचआहे .गावागावातील_समाज जो घाण्यावर आपल्या डोळ्यासमोर शुद्ध तेल काढुन देत होता.आज तुरळक अपवाद वगळला तर हा व्यवसाय बंद झाला आता विदेशातील पामतेलात रसायने व अत्यल्प शेंग/ सूर्य फुल तेल घालुन आपणाला #ब्रॅंण्डेड नावाखाली भेसळ खावी लागतेय..
हा व्यवसाय बंद झाला शेंगदाणे,करडई, सूर्यफूल वगैरे पिकें कमी झाली ऊस भारंभार झाला
लोकांची दुध तेल गरज नित्य आहेच मग या भेसळ वाल्यांचे फावते.
आपण साधा विचार करतो का ? आपल्या घरी बटाटा भजी केली तर खर्च किती येतो व गटाराच्या कडेला उभा असलेला गाडीवाला २०₹ भजी किती देतो? हे तेल कुठचे येते त्याला परवडते असे?
हा सर्व जनावरांच्या चरबी चा प्रकार असतो.खाटीक खात्यात मारलेल्या जनावरांची चरबी वितळून हे स्वस्त तुप बनवले जाते.
तेव्हा सजग रहा.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत