महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

५८ जातींच्या मतांच्या आधारावर राजकीय सत्तेची दिवास्वप्ने पाहणे बंद केले पाहिजे

शासनकर्ती जमात… एक दिवास्वप्न

शासनकर्ती जमात व्हा.
-डाॅ.बाबासाहेब आंबेडकर

होय!
अनुसूचित जातीचे घटक
शासनकर्ती जमात झालेले आहेत.

तुमच्यासमोर उद्दिष्ट काय आहे हे नीट समजून घ्या.शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे,हे तुमच्या मनात ठसू द्या.तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा.म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहिल की,ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत. ज्याच्यासाठी आपण लढत आहोत ते काही लहान सहान संकुचित ध्येय नाही थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही. अंतकरणातील आकांक्षा फार मोठ्या आहेत.शासनकर्ती जमात बनणे, हीच ती आकांक्षा होय.

२४ ऑक्टोबर १९४४ रोजी तत्कालीन मद्रासच्या (आताचे चेन्नई) पार्क टाऊनमध्ये मद्रास इलाखा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या जाहीर सभेतील भाषणात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हे विचार व्यक्त केले होते.

हे विचार फक्त तत्कालीन ५९ अनुसूचित जातीपैकी महाराष्ट्र राज्यात असलेल्या हिंदू महार समाजाला उद्देशून नव्हते तर ते विचार ५९ जातीतील समुदायाला उद्देशून होते.हा बाबासाहेबांचा शासनकर्ती जमात बनण्याचा विचार विद्यमान काळात फक्त नगण्य बौध्द मतपेटीच्या आधारे कदापि शक्य नाही.हे आंबेडकरवादी कधी समजून घेणार, हे एक अंकगणितीय कोडेच आहे.

जर बाबासाहेबांना अनुसूचित जातीच्या घटकांनी कृतज्ञतेच्या भावनेतून मतदान केले असते. तर, बाबासाहेबांचा लोकसभेच्या निवडणुकीत दोनदा पराभव झाला नसता! ज्या लोकांनी बाबासाहेबांना मतदान केले नाही,अशा कृतघ्न लोकांच्या भरवस्यावर आमदार व खासदार बनण्याची स्वप्ने दाखविणारे व अशी स्वप्ने बघणारे,ह्या दोहोंचाही दुर्दम्य आशावाद प्रशंसनीय आहे! ह्या आशावादातूनच शासनकर्ती जमात होणाऱ्या राजकीय आंबेडकरी संघटनांची मते वाढली नाहीत.पण, राजकीय संघटनांच्या बॅनरवर बाबासाहेबांच्या फोटोसोबत अठरापगड जातीतील आदर्शांच्या फोटोंची संख्या वाढली, वाढतच आहे.असो.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपण बौध्द धम्माची दीक्षा घेतली.साहजिकच आपण ५९ जातीसमुहातून बाहेर पडलो.आपले स्वत॔त्र आस्तित्व निर्माण झाले. त्यामुळे आपल्याला ५८ जाती सोडून गेल्या. सबब, शासनकर्ते जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. विद्यमान राजकीय परिस्थितीत हा बेेरजेेचा राजकीय विचार धर्मांतरीत बौध्द राजकीय संघटनांसाठी कालबाह्य झालेला आहे.

दिनांक १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी बौध्द धम्माची दीक्षा आपल्या अनुयायांनी घ्यावी अशी घोषणा केली त्यावेळेस मात्र फक्त पूर्वाश्रमीच्या हिंदू महार असलेल्या बाबासाहेबांच्या रक्ताच्या अनुयायांनीच बौध्द धम्माची दीक्षा घेतली. राजकीय सत्ता प्राप्त करण्याच्या लढ्यात शेड्युल्ड कास्टस फेडरेशनच्या ५८ जातीचे लोक बाबासाहेबांबरोबर होते.परंतु, धर्मांतराच्या वेळेस ह्या लोकांनी बाबासाहेबांची साथ सोडली,असे का घडले? ह्याचा आंबेडकरवाद्यांनी नीर क्षीर विवेकबुध्दीने विचार केला पाहिजे व ह्या ५८ जातींच्या मतांच्या आधारावर राजकीय सत्तेची दिवास्वप्ने पाहणे बंद केले पाहिजे.फक्त राजकीय सत्ता मिळाल्याने जीवनातील सर्व सुखे मिळतात, असेही नाही तसे असते तर राजकीय सत्ता धारण करणाऱ्यांच्या जातभाईंनी देशभर आम्हाला सरकारी नोकऱ्यांत आरक्षण मिळावे म्हणून लाखोंची आंदोलने केली नसती!

सध्या अनुसूचित जातीचे लोकसभेत ८४ व अनुसुचित जमातीचे ४७ असे एकुण १३१ खासदार आहेत आणि महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीचे २९ व अनुसुचित जमातीचे २५ असे एकुण ५४ आमदार आहेत.

शरद आढाव
मुंबई

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!